कुऱ्हाडीचे घाव घालत मोठ्या भावाची केली हत्या, घराच्या पाठीमागेच पुरला मृतदेह; नंतर ९ दिवस...

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 20, 2026 12:57 IST2026-02-20T12:56:21+5:302026-02-20T12:57:58+5:30

संपत्तीच्या हव्यासातून लहान भावाने मोठ्या भावाची कुऱ्हाडीनेच हत्या केल्याची घटना घडली. आरोपीने मोठ्या भावाची हत्या लपवण्यासाठी त्याचा मृतदेह घराच्या पाठीमागेच असलेल्या खड्ड्यात पुरला होता. 

Elder brother murdered with axe, body buried behind house; 9 days later... | कुऱ्हाडीचे घाव घालत मोठ्या भावाची केली हत्या, घराच्या पाठीमागेच पुरला मृतदेह; नंतर ९ दिवस...

कुऱ्हाडीचे घाव घालत मोठ्या भावाची केली हत्या, घराच्या पाठीमागेच पुरला मृतदेह; नंतर ९ दिवस...

भयंकर आणि धक्का देणारी एक घटना समोर आली आहे. लहान भावाने मोठ्या भावाची कुऱ्हाडीने हत्या केली. हत्येनंतर त्याचा मृतदेह घराच्याच पाठीमागे पुरला. निर्दयतेचा कळस म्हणजे त्यानंतर आरोपीने पोलीस ठाण्यात माझा मोठा भाऊ बेपत्ता झाल्याची तक्रार दिली होती. पोलिसांनी जेव्हा शोध घेतला तेव्हा त्याचा मृतदेहच मिळाला. आणि त्याची हत्या तक्रार देणाऱ्या सख्ख्या भावानेच केली असल्याचे समोर आले. 

उत्तर प्रदेशातील झांशीमधील बिहारीपुरा भागात ही घटना घडली आहे. लहान भावाने पोलिसांना तक्रार दिली होती की, त्याचा मोठा भाऊ बेपत्ता आहे. पोलिसांनी तक्रारीची दखल घेत तपास सुरू केला. पोलिसांना त्याचा मृतदेहच मिळाला, तोही घराच्या पाठीमागेच. 

मयत व्यक्ती तारीक बेग हा अविवाहित होता. त्याने बीबीएची पदवी घेतलेली होती. तर आरोपी असलेला लहान भाऊन मसारिक बेग याचे लग्न दोन महिन्यापूर्वीच झाले आहे. त्यांच्या वडिलांचे निधन झालेले आहे आणि त्यांची आई हल्ली तिच्या माहेरी असते. त्यामुळे घरी दोघे भाऊच राहत होते. 

मोठ्या भावाच्या संपत्तीवर होता डोळा

हत्येचे प्रकरण समोर आल्यानंतर मयताच्या नातेवाईकांनी दिलेल्या तक्रारीनुसार, तारीकचे लग्न झालेले नव्हते. त्याच्या वाट्याला येणाऱ्या संपत्तीवर मसारिकचा डोळा होता. १५ फेब्रुवारी रोजी मसारिक बेग याने प्रेमनगर पोलीस ठाण्यात तक्रार दिली की, माझा मोठा भाऊ ९-१० फेब्रुवारीपासून बेपत्ता आहे. 

पोलिसांनी तपास सुरू केला. त्याचे मोबाईल लोकेशन शोधल्यानंतर तारीकचा मोबाईल त्या रात्री घरातच बंद झाला होता, असे तांत्रिक तपासात दिसून आले. दरम्यान, मयत तारीकचा मामा मोहम्मद सलीम यांनी पोलिसांना संपत्तीचा वाद सुरू होता अशी माहिती दिली आणि छोट्या भावावर संशय असल्याचेही सांगितले. 

चौकशीत फुटले हत्येचे बिंग

पोलिसांनी मसारिक बेग याला ताब्यात घेतले आणि विचारणा केली. सुरूवातीला त्याने गोल गोल उत्तरे दिली. पण, पोलिसी खाक्या दाखवताच त्याने तोंड उघडले आणि हत्या केल्याची कबुली दिली. तारीक नसेल, तर सगळी संपत्ती आपल्याला मिळेल. त्यामुळे मोठ्या भावाची हत्या केल्याचे त्याने सांगितले. 

९-१० फेब्रुवारीच्या रात्री तारीक झोपेत असतानाच त्याच्या डोक्यात कुऱ्हाडीने वार केले आणि हत्या केली. त्यानंतर घराच्या पाठीमागे खड्ड्यात त्याचा मृतदेह पुरला, असे त्याने पोलिसांना सांगितले. पोलिसांनी पुन्हा खड्डा उकरून मृतदेह ताब्यात घेतला. ज्यादिवशी ही घटना घडली, त्यादिवशी त्यांची आई आणि मसारिकची पत्नीही घरी नव्हती. 

तारीख बद्दल विचारणा होऊ लागल्यावर नऊ दिवस मसारिकने त्याला शोधण्याचे नाटक केले. घरच्यांची दिशाभूल करत राहिला. इतकंच नाही, तर पोलीस ठाण्यात तक्रारही दिली होती. पोलिसांनी सगळे प्रकरण समोर आल्यानंतर त्याला अटक केली. 

Web Title : भाई ने कुल्हाड़ी से भाई को मारा, शव दफनाया, मासूमियत का नाटक किया।

Web Summary : उत्तर प्रदेश में, एक भाई ने संपत्ति के लिए अपने बड़े भाई की कुल्हाड़ी से हत्या कर दी। उसने शव को घर के पीछे दफना दिया और फिर झूठी गुमशुदगी की रिपोर्ट दर्ज कराई। पुलिस ने शव बरामद कर उसे गिरफ्तार कर लिया।

Web Title : Brother kills sibling with axe, buries body, feigns innocence.

Web Summary : In Uttar Pradesh, a brother murdered his older sibling with an axe over property. He buried the body behind their home and then filed a false missing person report. Police discovered the body and arrested him.