विकृत! लॉकडाऊनदरम्यान बापाने १३ वर्षीय मुलीवर केला बलात्कार, सावत्र आईने गाठले पोलीस स्टेशन
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 1, 2020 20:58 IST2020-06-01T20:54:45+5:302020-06-01T20:58:00+5:30
पीडित अल्पवयीन मुलगी दुसर्या जिल्ह्यातील एका धार्मिक शाळेत शिकत होती आणि मार्चमध्ये देशव्यापी लॉकडाऊन जारी करण्यापूर्वी ती घरी परतली होती.

विकृत! लॉकडाऊनदरम्यान बापाने १३ वर्षीय मुलीवर केला बलात्कार, सावत्र आईने गाठले पोलीस स्टेशन
हैदराबाद - तेलंगणात कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जारी केलेल्या लॉकडाऊनदरम्यान विकाराबाद जिल्ह्यात एका 13 वर्षीय मुलीवर तिच्या वडिलांनी अनेकदा बलात्कार केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. पीडित अल्पवयीन मुलगी दुसर्या जिल्ह्यातील एका धार्मिक शाळेत शिकत होती आणि मार्चमध्ये देशव्यापी लॉकडाऊन जारी करण्यापूर्वी ती घरी परतली होती.
ही घटना करणकोट पोलिस ठाण्याच्या हद्दीत घडली. रोजंदारी असलेल्या 35 वर्षीय आरोपीने चार वेळा लग्न केले होते. त्याचे पहिले दोन विवाह घटस्फोटासह संपले तर तिसर्या पत्नीचे निधन झाले. पीडित मुलगी त्याच्या तिसऱ्या पत्नीपासून जन्माला आली होती. सध्या तो आपली आई, त्यांची पत्नी, त्यांच्या मुलासह राहत होता. कोविड -१९ च्या साथीच्या आजारांमुळे मार्चमध्ये शैक्षणिक संस्था बंद केल्यामुळे ती अल्पवयीन मुलगी घरी परतली.
आरपीआय नेत्याच्या फार्महाऊसवर हल्ला, गार्डवर केला गोळीबार
खळबळजनक! भरदिवसा चाकूचा धाक दाखवून लुटले लाखो रुपये, आमदार निवासजवळील घटना
टाईम्स ऑफ इंडियाच्या वृत्तानुसार, अल्पवयीन मुलगी घरी परतल्यानंतर लॉकडाऊनदरम्यान बापाने अनेकदा बलात्कार केला. शिवाय आरोपीच्या या निर्दयी कृत्याबाबत घरच्यांना माहिती नव्हती. नुकत्याच एका सणाच्या आधी मुलीवर अखेरचे लैंगिक अत्याचार केल्याचे वृत्त आहे. तिने कोणालाही काही सांगितले तर तिला गंभीर परिणामांना सामोरं जावं लागण्याची धमकी आरोपीने दिली. काही दिवसांपूर्वी, मुलीने तिच्या सावत्र आईकडे तिच्यावर झालेल्या लैंगिक अत्याचाराबाबत माहिती दिली. त्यानंतर तिने पोलिसांकडे संपर्क साधला आणि त्याविरूद्ध तक्रार दाखल केली. आरोपीवर भारतीय दंड संहिता कलम ३७६ (बलात्कार) आणि पॉक्सो कायद्याच्या इतर संबंधित कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे.