इमारतीच्या बांधकामदरम्यान दोन कामगारांचा १० व्या मजल्यावरून पडून मृत्यू
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 30, 2018 16:42 IST2018-11-30T16:40:06+5:302018-11-30T16:42:11+5:30
या घटनेप्रकरणी गोवंडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी गोवंडी पोलिसांनी अधिक तपास सुरू आहे.

इमारतीच्या बांधकामदरम्यान दोन कामगारांचा १० व्या मजल्यावरून पडून मृत्यू
मुंबई - चेंबूर येथे एका बांधकाम सुरु असलेल्या इमारतीच्या दहाव्या मजल्यावरुन पडून २ कामगारांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना सकाळी ८.३० वाजताच्या सुमारास घडली आहे. अहमद शहादत शेख (वय ३२) आणि राजेंद्र कोल (वय ४५) अशी या घटनेत मृत्युमुखी पडलेल्या कामगारांची नावे आहेत. या घटनेप्रकरणी गोवंडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी गोवंडी पोलिसांनी अधिक तपास सुरू आहे.
चेंबूर येथील आर.के स्टुडिओनजीक मोतीबाग येथे शबरी पार्क इमारतीचे काम सध्या सुरू आहे. या इमारतीच्या कामासाठी काही कामगार दहाव्या मजल्यावर चढले होते. मात्र, काम सुरू असतानाच हे कामगार सकाळी ८.३० वाजताच्या सुमारास दहाव्या मजल्यावरुन खाली पडले. या जखमी दोन कामगारांना उपचारासाठी शताब्दी रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, रुग्णालयात दाखल करण्यापूर्वीच या दोघांचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले. या प्रकरणी गोवंडी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. पोलीस याचा तपास करत असल्याची माहिती पोलीस सूत्रांनी दिली.