...अन् प्रेमाचा झाला दुर्दैवी अंत! लग्न न झाल्याने प्रेमीयुगुलाची आत्महत्या; एकाच झाडाला घेतला गळफास

By ऑनलाइन लोकमत | Published: September 27, 2021 06:02 PM2021-09-27T18:02:06+5:302021-09-27T18:05:31+5:30

Crime News : एकमेकांसोबत लग्न होऊ न शकल्याने या दोघांनी टोकाचा निर्णय घेतल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.

dungarpur crime couple found commits suicide by hanging | ...अन् प्रेमाचा झाला दुर्दैवी अंत! लग्न न झाल्याने प्रेमीयुगुलाची आत्महत्या; एकाच झाडाला घेतला गळफास

...अन् प्रेमाचा झाला दुर्दैवी अंत! लग्न न झाल्याने प्रेमीयुगुलाची आत्महत्या; एकाच झाडाला घेतला गळफास

Next

नवी दिल्ली - राजस्थानच्या डूंगरपूरमध्ये एक धक्कादायक घटना समोर आली आहे. एका प्रेमीयुगुलाने लग्न करणं शक्य नसल्याने टोकाचं पाऊल उचललं आहे. आत्महत्या करून जीवन संपवल्याची भयंकर घटना समोर आली आहे. ज्याच्यावर प्रेम करतो, त्याच्यासोबत लग्न होण्याची शक्यता दिसत नसल्यामुळे प्रियकर आणि प्रेयसी यांनी एकत्र गळफास घेतल्याची घटना घडली आहे. दोघांनी एकाच ओढणीने कंबरेला बांधून आणि नंतर झाडाला गळफास घेऊन आपलं आयुष्य संपवलं आहे. एकमेकांसोबत लग्न होऊ न शकल्याने या दोघांनी टोकाचा निर्णय घेतल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, राजस्थानमधील डुंगरपूरमध्ये राहणाऱ्या प्रवीणचं रिना या तरुणीसोबत प्रेमसंबंध होते. दोघांचं एकमेकांवर खूप प्रेम होतं. मात्र त्यांच्या प्रेमप्रकरणात मोठा अडथळा निर्माण झाला होता. दोघांना एकमेकांशी लग्न करण्याची इच्छा असताना घरच्यांचा विरोध असल्यामुळे ते लग्न करू शकत नव्हते. त्यामुळेच शेवटी निराश झालेल्या दोघांनी अखेर एकत्र फाशी घेऊन आयुष्य संपवण्याचा निर्णय घेतला. घरापासून काही अंतरावर असणाऱ्या रस्त्यावरील झाडाला लटकून गळफास घेतला. या घटनेने एकच खळबळ उडाली आहे. 

गावकऱ्यांना अचानक झाडावर लटकणारे दोन मृतदेह दिसल्यानंतर धक्का बसला. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत दोघांचेही मृतदेह खाली उतरवले आणि घरच्यांना याची कल्पना दिली. मृतदेह पोस्टमॉर्टेमसाठी पाठवण्याचा निर्णय पोलिसांनी घेतला. दोघांचं अनेक दिवसांपासून प्रेमप्रकरण सुरू असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. लग्न करणं शक्य नसणं हेच आत्महत्येमागचं कारण सध्या समोर येत असल्याचं पोलिसांनी सांगितलं आहे. पोलीस या प्रकरणी अधिक तपास करत आहेत. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. 

नात्याला काळीमा! बहीण घराबाहेर पडत असल्याने संतप्त भावाने कात्रीने वार करून केला जीवघेणा हल्ला

 छत्तीसगडच्या कोरबामध्ये बहीण भावाच्या नात्याला काळीमा फासणारी एक घटना समोर आली आहे. बहिणीने घराबाहेर पडण्यावरून झालेला वाद टोकाला गेला आहे. संतप्त झालेल्या भावाने थेट बहिणीवर कात्रीने जीवघेणा हल्ला केल्याची भयंकर घटना घडली आहे. बहिणीने घराबाहेर पडणं मान्य नसलेल्या भावाने तिच्यावर हल्ला केल्याची माहिती मिळत आहे. यामध्ये बहीण गंभीररित्या जखमी झाली आहे. मुलाविरोधात पोलिसांत तक्रार दाखल करण्यात आली असून पोलीस याचा अधिक तपास करत आहेत. 

Web Title: dungarpur crime couple found commits suicide by hanging

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

Open in app