डबल मर्डर! घरगुती वादातून मुलाकडून आई वडिलांचा डोक्यात काठी घालून हत्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 21, 2022 20:23 IST2022-06-21T20:22:19+5:302022-06-21T20:23:12+5:30

Double Murder : वादातून मंगळवारी सकाळी रामदास आनाजी सुडके (६०) व  सरुबाई रामदास घोडके (६५) या आई वडिलांचा डोक्यात काठी घालून खून केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे.

Double Murder! Murder of a father and mother by a child in a domestic dispute | डबल मर्डर! घरगुती वादातून मुलाकडून आई वडिलांचा डोक्यात काठी घालून हत्या

डबल मर्डर! घरगुती वादातून मुलाकडून आई वडिलांचा डोक्यात काठी घालून हत्या

लासलगाव (नाशिक) : घरगुती वादातून जन्मदात्यांचा खून करणाऱ्या माथेफिरू मुलास पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. निफाड तालुक्यातील खडक माळेगाव येथील दत्तात्रय रामदास सूडके (३५) या माथेफिरू मुलाने घरात सुरू असलेल्या वादातून मंगळवारी सकाळी रामदास आनाजी सुडके (६०) व  सरुबाई रामदास घोडके (६५) या आई वडिलांचा डोक्यात काठी घालून खून केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे.

घटना समजताच लासलगावचे सहाय्यक पोलीस निरीक्षक राहुल वाघ यांनी कर्मचारी प्रदीप आजगे, कैलास महाजन ,योगेश शिंदे यांचेसह घटना स्थळी दाखल झाले. पोलिसांनी या गुन्ह्यात वापरलेली काठी जप्त केली आहे. दत्तात्रय रामदास सूडके यास ताब्यात घेतले आहे . घरात वाद सुरू असल्याने रामदास याचे दुसरे लग्न झाले असून तिला तीन महिन्यांपूर्वी माहेरी परभनी येथे सोडले आहे. सर्व व्यवहार आईचे हातात होते. ते आपल्या हाती यावेत म्हणून रामदास वाद घालत होता अशी माहिती असून घटनास्थळी निफाडचे पोलीस उपअधीक्षक सोमनाथ तांबे दाखल झाले आहेत.

Web Title: Double Murder! Murder of a father and mother by a child in a domestic dispute