शहरं
Join us  
Trending Stories
1
NATOबाबत अमेरिकेची मोठी चाल! इराण युद्धात मदत केली नाही; गंभीर परिणाम भोगावे लागणार, यादी तयार
2
जगातील ११ रिफायनरीमध्ये गुप्त हल्ले, भारतासह US मध्ये हाहाकार; मोदींचा दौरा टळला, योगायोग की कट?
3
इराणची कोंडी! अमेरिकेने समुद्रात उतरवला अवाढव्य ताफा; ३१ जहाजे ताब्यात घेतल्याने तणाव वाढला
4
"तो माझ्या छातीकडे टक लावून पाहायचा..."; नाशिक TCS प्रकरणात महिला टीम लीडरला आला विचित्र अनुभव
5
BMC: स्वच्छतेकडे दुर्लक्ष करणाऱ्या कंत्राटदारांवर कारवाई करा; महापालिका आयुक्तांचे अधिकाऱ्यांना निर्देश  
6
"२०२९ विधानसभा निवडणुकीत पुन्हा पवार विरुद्ध पवार लढाई होऊ शकते", रोहित पवारांचे मत
7
Top Marathi News LIVE Updates: बारामतीत ११ वाजेपर्यंत २०.५९ टक्के तर राहुरीमध्ये १८.२२ टक्के मतदान
8
Gold Silver Price Today : बाजार उघडताच चांदीत ₹६,००० ची घसरण, सोनंही झालं स्वस्त; चेक करा तुमच्या शहरातील २४K, २२K, १८K चा भाव
9
करणीबाधेची भीती दाखवून महिलेवर अत्याचार; भोंदू बाबा महेशगिरीवर लासलगाव पोलिसांत अखेर गुन्हा दाखल!
10
Mumbai Mithi River: ‘मिठी’ नदीच्या सफाईचा अहवाल द्या! स्थायी समिती अध्यक्षांच्या प्रशासनाला सूचना 
11
दमदार फॉर्म, कुशल कप्तानी, तरीही हैदराबाद ईशान किशनला कर्णधारपदावरून हटवणार, कारण काय?   
12
अमराठी वाहनचालकांसाठी मराठी संवाद अनिवार्य; प्रभावी अंमलबजावणीसाठी विशेष बैठक
13
१४ चौकार, ५ षटकार... लॉरा वूल्फार्टचा शतकी धमाका; स्मृती मानधानाच्या विश्वविक्रमाशी बरोबरी
14
Mumbai: 'हाजी नुराणी चाळवासीयांनो, उद्यापर्यंत घरे रिकामी करा! नाही तर...' एमएमआरडीएचा इशारा 
15
अक्कलकोटच्या स्वामींचा लाडका शिष्य: योगिराज शंकर महाराज पुण्यतिथीनिमित्त विशेष लेख
16
रितेश देशमुखसोबत सीन ते परदेशातून आलेली ॲक्शन टीम; 'राजा शिवाजी'मध्ये भूमिका साकारताना रामचंद्र गावकर भारावला
17
Share Market: उघडताच जोरदार आपटला शेअर बाजार! Sensex ७०० अंकांनी खाली, 'या' शेअर्स मध्ये मोठी घसरण
18
Stray Dogs: भटक्या श्वानांच्या घरासाठी पालिकेला कोणी जागा देता का?
19
MBA नंतर २५ लाखांची नोकरी सोडून चालवू लागला ओला कार; ३ वर्षात ६.५० लाख कमाई, खरेच शक्य आहे?
20
'या' लोकांना दर महिन्याला ₹१०,००० पेन्शन देण्याचा विचार करतेय सरकार; कोणती आहे योजना, जाणून घ्या
Daily Top 2Weekly Top 5

"कुटुंबाला सांगू नका, लोकांकडून पैसे घेऊन अंत्यसंस्कार करा"; मनातील वेदना कागदावर लिहून तरुणाने संपवलं आयुष्य

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 25, 2025 18:43 IST

आपल्या मनातील वेदना एका कागदावर लिहून तरुणाने आपले आयुष्य संपवल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.

बेरोजगारी आणि आर्थिक अडचणींनी ग्रासलेल्या एका तरुणाने गाझीपूर येथील एका हॉटेलमध्ये विष प्राशन करून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून तपास सुरू केला असून, पोलिसांना घटनास्थळी एक सुसाईड नोट मिळाली आहे.

या सुसाईड नोटमध्ये तरुणाने अत्यंत वेदनादायक मागणी केली आहे. त्याने लिहिले आहे की, "माझा अंत्यसंस्कार वर्गणी गोळा करून करावा, पण माझा मृतदेह माझ्या काकांकडे किंवा कुटुंबातील इतर कोणत्याही सदस्याला देऊ नये."

हॉटेलमध्ये काय घडले?ही घटना सदर कोतवाली पोलीस ठाण्याच्या हद्दीतील एका हॉटेलमध्ये घडली. हॉटेल कर्मचाऱ्यांनी एका खोलीचा दरवाजा बराच वेळ बंद असल्याचे पाहिले, तेव्हा त्यांना संशय आला. त्यांनी तात्काळ पोलिसांना माहिती दिली. पोलिसांनी व्हिडिओग्राफीच्या मदतीने खिडकीतून आत पाहण्याचा प्रयत्न केला. तेव्हा त्यांना तरुण जमिनीवर पडलेला आणि त्याच्या तोंडातून फेस येत असल्याचे दिसले. पोलिसांनी दरवाजा तोडून तरुणाला तातडीने रुग्णालयात दाखल केले, परंतु डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले.

मृत्यूचे कारण: आर्थिक अडचणपोलिसांना घटनास्थळी जी सुसाईड नोट मिळाली, त्यात तरुणाने आपल्या बेरोजगारी आणि आर्थिक अडचणींचा उल्लेख केला आहे. त्याने लिहिले आहे की, त्याचा अंत्यसंस्कार वर्गणी गोळा करून करण्यात यावा आणि त्याचे मृत्यू प्रमाणपत्र त्याच्या सासरच्या मंडळींना देण्यात यावे. या संदर्भात, अतिरिक्त पोलीस अधीक्षक ज्ञानेंद्र प्रसाद यांनी सांगितले की, "सदर तरुण आर्थिक अडचणींना सामोरे जात होता. आम्हाला सुसाईड नोट मिळाली असून, मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला आहे. अहवाल आल्यानंतर पुढील कायदेशीर कारवाई केली जाईल."

मृत तरुण बिहारचा रहिवासीमृत तरुणाची ओळख ओम प्रकाश राय, बिहारचा रहिवासी, अशी झाली आहे. त्याचे सासर मोहम्मदाबादच्या तमलपूर येथे होते. तो एका सिमेंट फॅक्टरीत काम करत होता, मात्र २०२१ मध्ये त्याच्या पत्नीचे निधन झाले. काही महिन्यांपूर्वी त्याची नोकरीही गेली, ज्यामुळे तो प्रचंड तणावात होता. त्याच्याकडे खोलीचे भाडे देण्यासाठीही पैसे नव्हते, असे सांगितले जाते.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीUttar Pradeshउत्तर प्रदेश