लग्नात विघ्न! वऱ्हाड्यांनी भरलेली नवरदेवाची गाडी उलटली, 3 जणांचा जागीच मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 19, 2022 15:08 IST2022-04-19T15:03:32+5:302022-04-19T15:08:42+5:30

Accident Case : ही दुर्घटना घडली आहे. गाडीतील सर्व लोक मिरवणुकीत आले होते, ते वराच्या गाडीने काही कामासाठी निघाले होते.

Disruption in marriage! Accident in janjgir champa three people died 3 injured | लग्नात विघ्न! वऱ्हाड्यांनी भरलेली नवरदेवाची गाडी उलटली, 3 जणांचा जागीच मृत्यू

लग्नात विघ्न! वऱ्हाड्यांनी भरलेली नवरदेवाची गाडी उलटली, 3 जणांचा जागीच मृत्यू

जांजगीर- चंपा : जांजगीर येथील एका कुटुंबात लग्नाच्या आनंदाचे वातावरण असताना अचानक शोककळा पसरली. मुलमुला पोलीस ठाण्याच्या हद्दीत एक भीषण रस्ता अपघात झाला असून यामध्ये ३ जणांचा जागीच मृत्यू झाला आहे. तर ३ जणांची प्रकृती चिंताजनक असल्याचे सांगण्यात येत आहे. वरातीतील कार अनियंत्रित झाल्याने पलटी झाल्याचे सांगण्यात येत आहे. त्यामुळे ही दुर्घटना घडली आहे. गाडीतील सर्व लोक लग्नाचे वऱ्हाडी होते, ते काही कामानिमित्त नवरदेवाच्या गाडीने निघाले होते.


मस्तुरीच्या पाचपेडी येथून  पकरिय झूलन येथे लग्नाला आलेले सर्वजण वराच्या गाडीने फिरायला गेले होते. सर्वजण दारूच्या नशेत असल्याचे सांगण्यात येत आहे. मात्र, याची माहिती मिळालेली नाही. प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार, कार किमान 2 ते 3 वेळा उलटली. जखमींना बिलासपूर येथे रेफर करण्यात आले आहे. मृतांचे मृतदेह पामगड सामुदायिक आरोग्य केंद्रात पाठवण्यात येत आहेत.


या घटनेनंतर पोलिसांनाही याबाबत माहिती देण्यात आली. घटनेची माहिती मिळताच पोलिसांचा ताफा घटनास्थळी पोहोचला. जवळचे लोकही मोठ्या संख्येने पोहोचले आहेत. या अपघातात जागीच मृत्यू झालेले तीनही तरुण बिलासपूरच्या पाचपेडी भागातील रहिवासी आहेत. सुनील कुमार नायक (34), शिवकुमार नायक (45) आणि संतोष नायक (36) अशी तिघांची नावे आहेत.

 

 

Web Title: Disruption in marriage! Accident in janjgir champa three people died 3 injured