Disha Salian Case: New twist; Video of suicide 1 hour before was revealed | Disha Salian Case : नवं वळण; आत्महत्येच्या १ तासपूर्वीचा व्हिडीओ झाला उघड

Disha Salian Case : नवं वळण; आत्महत्येच्या १ तासपूर्वीचा व्हिडीओ झाला उघड

ठळक मुद्देदिशा सालियनने साजरी केलेल्या शेवटच्या पार्टीचा व्हिडिओ आता समोर आला आहे. या व्हिडिओत ती आनंदी असल्याचं दिसत आहे. दिशानेच हा व्हिडिओ आपल्या मित्रांना व्हॉट्स अ‍ॅपवर शेअर केला होता. आता हा व्हिडीओ नक्की आत्महत्येच्या १ तास आधीचा आहे का ? याबाबत पोलीस तपास करतील.

अभिनेता सुशांत सिंग राजपूतची असिस्टंट मॅनेजर दिशा सालियन आत्महत्या प्रकरण आता वेगळ्या वळणावर आले आहे. दिशा सालियनने साजरी केलेल्या शेवटच्या पार्टीचा व्हिडिओ आता समोर आला आहे. या व्हिडिओत ती आनंदी असल्याचं दिसत आहे. ८ जूनला झालेल्या या पार्टीनंतर तिने इमारतीवरून उडी मारून आत्महत्या केली असल्याची माहिती आहे. याबाबत अपमृत्यूची नोंद मालवणी पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे.

हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. ८ जूनला ही पार्टी झाली होती. या पार्टीनंतर दिशाने आत्महत्या केली होती. आत्महत्येच्या एक तास आधीचा हा  व्हिडिओ आहे. या व्हिडिओमध्ये दिशा आणि तिचे मित्र मिशन काश्मिर चित्रपटातील गाण्यावर नाचत आहे. दिशाही आनंदी असल्याचे आणि डान्स करत असल्याचे या व्हिडिओत दिसत आहे.  दिशानेच हा व्हिडिओ आपल्या मित्रांना व्हॉट्स अ‍ॅपवर शेअर केला होता. आता हा व्हिडीओ नक्की आत्महत्येच्या १ तास आधीचा आहे का ? याबाबत पोलीस तपास करतील. तसेच या व्हिडिओबाबत सत्यता मुंबई पोलीस समोर आणतील. कारण दिशाच्या आत्महत्येबाबत तिच्या आई - वडिलांनी मुंबईपोलिसांच्या तपासावर विश्वास असल्याचं म्हटलं आहे. तसेच दिशाबाबत उलटसुलट चर्चा केवळ आपल्या फायद्यासाठी करत असल्याचं दिशांच्या आईनं म्हटलं आहे.  

दिशाच्या शवविच्छेदन अहवालाबाबत देखील वेगवेगळ्या चर्चा सुरु आहेत. दिशावर बलात्कार करुन तिची हत्या केली आहे असा आरोप केला जात आहे. हे सर्व चुकीचं आहे. आम्ही दोनदा पोलिसांना जबाब दिला आहे. मालवणी पोलिसांकडे याचा रेकॉर्ड आहे. आम्ही शवविच्छेदन अहवाल पाहिला आहे. मुंबई पोलीस योग्यरितीने काम करत आहे. त्यामुळे मुंबई पोलिसांवर आमचा विश्वास आहे. आम्ही शांत आहोत पण मीडिया आमच्या मुलीची बदनामी करत आहे. आम्ही आता सहन करु शकत नाही. लोकांनी सत्य स्वीकारावं अशी विनंती दिशाच्या आई-वडिलांनी केली आहे. त्यामुळे आता दिशाच्या सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडीओमुळे देखील अनेक आरोप - प्रत्यारोप होण्याची शक्यता आहे. लॉकडाऊनमध्ये दिशा आमच्यासोबतच होती. ती कुठल्याही पार्टीला गेली नव्हती असे तिच्या आईचे म्हणणे आहे. त्यामुळे हा व्हिडीओ आत्महत्येपूर्वी आहे की जुना आहे याबाबत पोलीस खुलासा करतील.

 

अन्य महत्वाच्या बातम्या...

 

...चांगला मेसेज गेला नाही; बिहार पोलीस अधिकाऱ्याला क्वारंटाईन केल्याबद्दल SC ने कान खेचले!

 

Disha Salian Case: नारायण राणेंच्या गंभीर आरोपानंतर पोलिसांचं पुराव्यांसाठी आवाहन

 

खळबळजनक! कारागृहात कैद्याने गळफास लावून केली आत्महत्या 

 

सुशांत राजपूत प्रकरणाच्या तपासासाठी मुंबईत आलेले बिहारचे पोलीस परतले; १२ जणांची केली चौकशी

 

सुशांतच्या डायरीची शेवटची पाने महत्वाची, सुगावा लागू शकतो मारेकऱ्याचा

 

Breaking : वलसाडमधील बायोकेमिकल कंपनीला भीषण आग

 

भीषण! उल्हासनगरात नाश्त्याच्या हॉटेलमध्ये सिलेंडरचा स्फोट, एकाचा मृत्यू तर ११ जण जखमी

Web Title: Disha Salian Case: New twist; Video of suicide 1 hour before was revealed

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.