घृणास्पद! आठ वर्षाच्या चिमुकलीवर गँगरेप; नंतर केली गळा दाबून हत्या

By ऑनलाइन लोकमत | Published: November 24, 2021 10:21 PM2021-11-24T22:21:11+5:302021-11-24T22:21:42+5:30

Rape And Murder case : याप्रकरणी कर्नाटक पोलिसांनी चार जणांच्या मुसक्या आवळल्या आहेत. जैबान(२१), मुकेश सिंग(२०), मुनीम सिंग(२०), मनिष तिर्की(३३) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत.

Disgusting! Gangrape on eight-year-old girl; Kelly was then strangled to death | घृणास्पद! आठ वर्षाच्या चिमुकलीवर गँगरेप; नंतर केली गळा दाबून हत्या

घृणास्पद! आठ वर्षाच्या चिमुकलीवर गँगरेप; नंतर केली गळा दाबून हत्या

Next

एका आठ वर्षाच्या बालिकेवर सामूहिक अत्याचार करुन तिची हत्या केल्याची घृणास्पद घटना मंगळुरुमध्ये उघडकीस आली आहे. मुलीची गळा दाबून हत्या केल्यानंतर तिचा मृतदेह नाल्यात फेकून देण्यात आला. याप्रकरणी कर्नाटकपोलिसांनी चार जणांच्या मुसक्या आवळल्या आहेत. जैबान(२१), मुकेश सिंग(२०), मुनीम सिंग(२०), मनिष तिर्की(३३) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत.

पीडित मुलीचे कुटुंब मूळचे झारखंड येथील असून मंगळुरुमध्ये कामानिमित्त वास्तव्य करीत आहेत. पीडित मुलीचे आई-वडिल आणि आरोपी एकाच टाईल्सच्या कारखान्यात मजूर म्हणून काम करीत होते. मनिष तिर्की हा ११ महिन्यांपासून टाईल्सच्या कारखान्यात काम करत होता, तर जैबन आणि मुकेश हे तीन महिन्यांपूर्वी रुजू झाले होते. आरोपी मुनीम सिंग हा पुत्तूर येथे मजुरीचे काम करत होता आणि घटनेच्या दिवशी मनिषला भेटायला आला होता. ८ वर्षाची चिमुकली दुपारी १२ वाजताच्या सुमारास खेळण्यास बाहेर गेली होती. मात्र, बराच वेळ घरी न परतल्याने मुलीच्या पालकांनी पोलिसात हरवल्याची तक्रार दाखल केली होती. 

रविवारी दुपारी पीडित मुलगी तिच्या भावासोबत कारखान्याच्या कॉम्प्लेक्समध्ये खेळत होती. यावेळी जैबानने तिचे अपहरण केले आणि तिला कारखान्याच्या परिसरातील त्याच्या खोलीत नेले. त्यानंतर आरोपीने मुलीचे सामूहिक लैंगिक शोषण केले. जैबानने तिचा गळा दाबून खून केला. त्यांनी पीडितेचा मृतदेह नाल्यात फेकल्याचे पोलिसांनी सांगितले. याप्रकरणी पोलिसांनी पॉक्सो कायद्याच्या कलमांनुसार आणि आयपीसीच्या कलम ३७६ आणि भादंवि कलम ३०२ अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे.

Web Title: Disgusting! Gangrape on eight-year-old girl; Kelly was then strangled to death

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

Open in app