सुशांत आणि दिशाच्या मृत्यूचा थेट संबंध, नितेश राणेंनी लिहिले अमित शहांना पत्र 

By ऑनलाइन लोकमत | Published: September 16, 2020 09:36 PM2020-09-16T21:36:05+5:302020-09-16T21:37:46+5:30

Sushant Singh Rajput Case : भाजप आमदार नितेश राणे यांनी दावा केला आहे की, दिशा सालियन आणि सुशांत सिंग राजपूतच्या आत्महत्येचा थेट संबंध आहे. या संदर्भात नितेश राणे यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांना पत्र लिहिलं आहे.

Direct connection between Sushant and Disha's death, Nitesh Rane wrote letter to Amit Shah | सुशांत आणि दिशाच्या मृत्यूचा थेट संबंध, नितेश राणेंनी लिहिले अमित शहांना पत्र 

सुशांत आणि दिशाच्या मृत्यूचा थेट संबंध, नितेश राणेंनी लिहिले अमित शहांना पत्र 

Next
ठळक मुद्देदिशा सालियनचा 'लिव्ह इन पार्टनर' रोहन रॉय याला सुरक्षा देण्यात द्यावी, अशी विनंती भाजप आमदार नितेश राणे यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांना केली आहे.

अभिनेता सुशांत सिंग राजपूत यानं आत्महत्या करून तीन महिने उलटले आहेत. त्याआधी सुशांतची असिस्टंट मॅनेजर दिशा सालियन हिने देखील आत्महत्या केल्याची मालवणी पोलिसांकडे नोंद आहे. सुशांत प्रकरणाचा तपास सीबीआय, ईडी, एनसीबी करत आहे. येत्या काही दिवसात एम्स रुग्णालयाच्या फॉरेन्सिक टीमचा व्हिसेरा रिपोर्ट समोर येणार आहे. या दरम्यान, भाजप आमदार नितेश राणे यांनी दावा केला आहे की, दिशा सालियन आणि सुशांत सिंग राजपूतच्या आत्महत्येचा थेट संबंध आहे. या संदर्भात नितेश राणे यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांना पत्र लिहिलं आहे.


दिशा सालियनचा 'लिव्ह इन पार्टनर' रोहन रॉय याला सुरक्षा देण्यात द्यावी, अशी विनंती भाजप आमदार नितेश राणे यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांना केली आहे. दिशा सालियनचा मृत्यू झाला त्यावेळी रोहन रॉय तिथे उपस्थित होता. त्यामुळे त्याचा जबाब दिशा सालियनच्या मृत्यूसाठी महत्त्वाचा आहे, असा दावा देखील नितेश राणे यांनी केला आहे. रोहन रॉय हा आपला जीव वाचवण्यासाठी मुंबईतून आपल्या गावी निघून गेला आहे. त्याचा सीबीआयच्या चौकशीत जबाब महत्त्वाचा असल्याचं नितेश राणे यांनी अमित शहा यांना लिहिलेल्या पत्रात नमूद केले आहे. सीबीआय आणि एनसीबीच्या चौकशीत सत्य बाहेर येईल, असा विश्वास देखील नितेश राणे यांनी व्यक्त केला आहे.

तेश राणे यांनी दिशा सालियन प्रकरणात देखील सीबीआय चौकशीची मागणी केली आहे. ते म्हणाले की, सीबीआयनेही दिशाच्या होणाऱ्या नवऱ्याची चौकशी केली पाहिजे. याप्रकरणी सीबीआय, एनसीबी आणि ईडीच्या चौकशीबद्दल राणे यांनी समाधान व्यक्त केले आणि या एजन्सीज चांगल्याप्रकारे चौकशी करत असल्याचा आत्मविश्वास त्यांनी दर्शविला आहे. पुढे नितेश राणे म्हणाले की, "8 जून रोजी काय घडले (दिशा सालियनची आत्महत्या) आणि 14 जून रोजी काय घडले (सुशांतचा कथित आत्महत्या) याचा थेट संबंध आहे. मी असे म्हणतो आहे की, ज्या पार्टीमध्ये दिशा 8 जून रोजी गेली होती होती. तिथे तिच्याबरोबर काहीतरी गडबड झाली असावी. तिथून निघताना तिने सुशांतला बोलावून काहीतरी सांगितले आणि दिशाचा होणारा जोडीदार तिथे उपस्थित होता आणि ती तिथून मालाडच्या घरी परतली आणि खाली पडली. तेव्हा रोहन रॉय ताबडतोब खाली आला असते, त्याने ते पाहिले पाहिजे होते दिशा जिवंत आहे की नाही, श्वास चालू आहे. ऍम्ब्युलन्स बोलवायला हवी होती ", मात्र तसे झाले नाही.  नितेश राणे पुढे म्हणाले, "रोहन रॉय २५ मिनिटांनी खाली आला. त्यामुळे रोहन रॉंयची चौकशी केली पाहिजे. सुशांत सिंग राजपूत प्रकरणात रिया चक्रवर्ती जशी सर्वात जवळची होती. अंकिता लोखंडे सर्वात जवळची होती. त्यांची चौकशी केली गेली. त्याचप्रमाणे रोहन रॉय हे सलियाच्या दिशेने सर्वात जवळचे आहेत. या प्रकरणात तो सर्वात महत्वाचा आहे." असा सवाल नितेश राणे यांनी उपस्थित केला. 

अन्य महत्वाच्या बातम्या...

 

शोविकचा मित्र सूर्यदीपचे बॉलिवूड, अंडरवर्ल्ड कनेक्शन असण्याची शक्यता 

 

प्रशांत भूषण यांनी भरला १ रुपयाचा दंड अन् सर्वोच्च न्यायालयात पुनर्विचार याचिका

 

दिशा सालियान आणि सुशांत राजपूत मृत्यू यामधील रोहन रॉय महत्त्वाचा दुवा; नितेश राणेंचा दावा

 

सुशांतची आत्महत्या की हत्या?, लवकरच पोस्टमॉर्टेम - व्हिसेरा अहवालातून होणार खुलासा

 

धक्कादायक! क्वारंटाईन सेंटरमध्ये अल्पवयीन मुलीचा विनयभंग

 

Breaking : शिक्षकाचा वेतन मिळत नसल्याने आमदार निवास येथे आत्महत्येचा प्रयत्न

 

 

Web Title: Direct connection between Sushant and Disha's death, Nitesh Rane wrote letter to Amit Shah

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.