शहरं
Join us  
Trending Stories
1
Vaibhav Suryavanshi : फक्त १६ चेंडू खेळला अन् हवा करून गेला! वर्ल्ड रेकॉर्ड थोडक्यात हुकला, पण...
2
मोठी बातमी : भाजपचं धक्कातंत्र! विधान परिषद निवडणुकीसाठी ५ जणांची यादी जाहीर, कुणाला मिळाली संधी?
3
विदर्भकराचा इम्पॅक्ट! PBKS ला शह देण्यासाठी RR नं खेळलेली 'ती' चाल ठरली मॅचचा टर्निंग पॉइंट
4
नांदेड विमानतळ परिसरात ‘गूढ गोलाकार वस्तू’! उडती तबकडी की साधा बलून?
5
पोलीस आयुक्तांचा धडाकेबाज निर्णय, एकाच दिवसात ४० शस्त्र परवाने रद्द 
6
मंत्री उदय सामंत अंतरवाली सराटीत मनोज जरांगे यांच्या भेटीला, एक तास चर्चा; कारण काय?
7
बाबासाहेबांनी ध्वनी प्रदूषणाचे कधीच समर्थन केले नसते, हायकोर्टाने समाजाला विचार व तत्वज्ञानाची जाणिव करून दिली
8
निवडणूक संपताच पेट्रोल-डिझेल महागणार? केंद्र सरकारनं दिलं मोठं स्पष्टीकरण! काय होणार?
9
नागपूर भाजप शहराध्यक्ष तिवारींचा मोबाईल हॅक, आरोपींकडून लोकांना पैशांची मागणी
10
PBKS vs RR : वैभव-यशस्वीचा धमाका; फरेरा-दुबेचा फिनिशिंग टच! राजस्थानने रोखला पंजाबचा विजयरथ
11
भाजपचे धक्कातंत्र, विदर्भातून प्रस्थापितांऐवजी सहकारतज्ज्ञ संजय भेंडेंना संधी; ‘मायक्रो प्लॅनर’ म्हणून आहे ओळख
12
१ मे पासून खिशाला कात्री! बँकिंगसह 'हे' मोठे नियम बदलणार; गॅस सिलिंडर स्वस्त होणार की महागणार?
13
PBKS vs RR : 'वंडर बॉय' वैभव सूर्यवंशीनं धु धु धुतलं! मग अर्शदीपनं लो फुलटॉसवर हिशोब केला चुकता
14
‘मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे’ मिसिंग लिंकवर किती स्पीडने जाता येणार?; वेगमर्यादेची नियमावली आली!
15
विदर्भात १ मे पर्यंत पावसाळी ढग; पारा खाली येणार, पण उष्णतेची तीव्रता कायम राहणार
16
गुजरातमध्ये BJPचा डंका! १५ महानगरपालिकांवर कमळ फुलले; आप-काँग्रेस आपटले, कुणाला किती जागा?
17
PBKS vs RR: परफेक्ट सेटअप! १५० kmph वेगवान चेंडूसह पुन्हा प्रियांश आर्यवर भारी पडला जोफ्रा (VIDEO)
18
"हे 'सेल्फ रेडिकलायझेशन'चं प्रकरण, जिहाद करायचा म्हणजे..."; मिरा रोड हल्ल्यासंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्पष्टच बोलले
19
इराण-अमेरिका युद्धात UAE चा मोठा निर्णय; OPEC आणि OPEC+ गटातून बाहेर पडणार
20
म्हाडाच्या २६४० घरांच्या लॉटरीला मुदतवाढ; १४ मे पर्यंत अर्ज सादर करण्याची मुदत
Daily Top 2Weekly Top 5

मन हेलावून टाकणारी घटना; शौचास बसलेल्या चिमुकल्याचा विजेच्या धक्क्याने दुर्दैवी अंत

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 24, 2021 22:12 IST

उघड्या डीपीच्या तारेला झाला स्पर्श, उमरेड तालुक्यातील सिर्सी येथील घटना

उमरेड : शौचास बसलेल्या चिमुकल्याचा उघड्या विद्युत डीपीच्या तारेचा स्पर्श हाेऊन करुण अंत झाला. हृदय हेलावून टाकणारी ही घटना उमरेड तालुक्यातील सिर्सी येथील बाजार चौकात गुुरुवारी (दि.२४) दुपारी ४ वाजताच्या सुमारास घडली.

नैतिक पुजाराम बावणे (३ वर्ष) असे मृत चिमुकल्याचे नाव आहे. मृत नैतिकचे वडील पुजाराम हे मासेमारीचा व्यवसाय करतात. गुरुवारी नैतिकची प्रकृती बिघडली. अशातच त्याला डॉ. टिकेश तेलरांधे यांच्या दवाखान्यात उपचारासाठी नेले. नैतिकचे वडील बाहेर गेल्याने आजी पुष्पा वाघधरे या आपल्या नातवासोबत होत्या. डॉ. तेलरांधे दवाखान्यात नसल्याने पुष्पा काही वेळ थांबल्या. अशातच नैतिकला शौचास जायचे होते. त्याला उघड्यावर बसविण्यात आले. नैतिक शौचास बसला असतानाच तेथे गाय आली. आजी पुष्पा यांनी गाईला हाकलण्यासाठी धाव घेतली. दुसरीकडे नैतिकही उठला. अशातच त्याचा लगतच्या उघड्या डीपीच्या तारांचा स्पर्श झाला आणि नैतिक जागीच कोसळला. पुष्पा यांनी त्याला वाचविण्यासाठी प्रयत्न केला. त्यासुद्धा यात जखमी झाल्या. लागलीच नैतिकला सिर्सी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल करण्यात आले. त्यानंतर उमरेड येथील ग्रामीण रुग्णालयात रवाना केले. तिथे तपासणीअंती डाॅक्टरांनी नैतिकला मृत घोषित केले.

अधिकाऱ्यांवर कारवाई करासिर्सी येथील वर्दळीच्या ठिकाणी ही विद्युत डीपी आहे. अनेकदा डीपीचे झाकण उघडेच असते. आजही अशीच परिस्थिती होती. शिवाय, विद्युत वायरसुद्धा अस्ताव्यस्त होते. शॉर्टसर्कीटसुद्धा नेहमीच होत असतात. विद्युत विभागाच्या हलगर्जीपणामुळे ही घटना घडली असून, संबंधित दाेषी अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी अखिल रोडे, प्रदीप चिंदमवार आदींनी केली आहे.

टॅग्स :electricityवीज