वाकड परिसरात जन्मदात्यांनी ‘नकुशी’ला झुडुपात फेकलं
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 26, 2018 20:13 IST2018-12-26T19:14:52+5:302018-12-26T20:13:14+5:30
जगताप डेअरी क्षितिज कॉलनी परिसरातील झुडपात अवघ्या एक दोन दिवसांचे स्त्री जातीचे अर्भक बुधवारी (दि २६) पाचच्या सुमारास आढळून सापडले आहे.

वाकड परिसरात जन्मदात्यांनी ‘नकुशी’ला झुडुपात फेकलं
पिंपरी-चिंचवड (वाकड) : नकुशीला निर्दयी जन्मदात्यांनी झुडुपात फेकल्याची घटना समोर आली आहे. जगताप डेअरी क्षितिज कॉलनी परिसरातील झुडपात अवघ्या एक दोन दिवसांचे स्त्री जातीचे अर्भक बुधवारी (दि २६) पाचच्या सुमारास आढळून सापडले आहे. या नकुशीला पोलिसांनी ताब्यात घेऊन औंध येथील जिल्हा रुग्णालयात दाखल केले आहे.
याप्रकरणी सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, जगताप डेअरी येथील क्षितिज कॉलनी दोन जवळ छोट्याशे झुडूप आहे. यातुन एका बालकाचा रडण्याचा आवाज येत असल्याने तेथील काही रहिवाशांनी झुडुपात जाऊन पाहणी केली असता नवजात अर्भक उघड्यावर टाकल्याचे दिसले. यानंतर नागरिकांनी वाकडपोलिसांनी कळविले. वाकड पोलिसांनी जाऊन पाहणी करत १०८ क्रमांकाच्या रुग्णवाहिकेला पाचारण करून त्या नकुशीला औंध येथील जिल्हा रुग्णालयात दाखल केले असून तिच्यावर उपचार सुरू आहेत.