नवरा कामासाठी दुबईला, भाच्याच्या प्रेमात वेडी झाली बायको; १० लाखांचे दागिने घेऊन गेली पळून
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 5, 2026 11:49 IST2026-01-05T11:48:51+5:302026-01-05T11:49:12+5:30
एक महिला आपल्या तीन वर्षांच्या मुलीला सोडून मानलेल्या भाच्यासोबत पळून गेल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.

नवरा कामासाठी दुबईला, भाच्याच्या प्रेमात वेडी झाली बायको; १० लाखांचे दागिने घेऊन गेली पळून
उत्तर प्रदेशातील देवरिया जिल्ह्यातून नात्याला काळिमा फासणारी एक घटना समोर आली आहे. एक महिला आपल्या तीन वर्षांच्या मुलीला सोडून मानलेल्या भाच्यासोबत पळून गेल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. तिचा पती आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करण्यासाठी दुबईत राहून मेहनत करत होता.
या दोघांचे प्रेमसंबंध उघड झाल्यानंतर घरच्यांनी त्यांना आक्षेपार्ह अवस्थेत पकडलं होतं आणि त्यांना समज देण्याचा प्रयत्नही केला होता. पतीला याची माहिती मिळताच त्याने दुबईतून फोन करून पत्नीला विनंती केली, तिचे पाय धरले, पण ती प्रेमात इतकी वेडी झाली की तिने कोणाचंही ऐकलं नाही. अखेर २४ डिसेंबरच्या रात्री ती घर सोडून पळून गेली.
१० लाखांचे दागिने आणि रोकड लंपास
पतीच्या दाव्यानुसार, पत्नी घरातून पळून जाताना सोबत सुमारे १० लाख रुपये किमतीचे दागिने आणि रोख रक्कम घेऊन गेली आहे. ३८ वर्षीय व्यक्तीचं ५ वर्षांपूर्वी लग्न झालं होतं. पत्नी आणि मुलीचं भविष्य उज्ज्वल व्हावं, यासाठी तो परदेशात काम करत होता. मात्र पत्नी स्वतःपेक्षा दोन वर्षांनी लहान असलेल्या तरुणाच्या प्रेमात इतकी आंधळी झाली की तिने समाजाची पर्वा केली नाही.
इन्स्टाग्रामवर शेअर केले लग्नाचे फोटो
मिळालेल्या माहितीनुसार, घरातून पळून गेल्यानंतर या दोघांनी लग्न केलं असून त्याचे फोटो इन्स्टाग्रामवर पोस्ट केले आहेत. घटनेची माहिती मिळताच २९ डिसेंबर रोजी पती दुबईहून आपल्या गावी परतला आणि त्याने बनकटा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. बनकटा पोलीस ठाण्याचे प्रभारी विशाल उपाध्याय यांनी सांगितलं की, पोलिसांनी बेपत्ता झाल्याची नोंद केली असून या प्रकरणाचा सखोल तपास सुरू आहे.