शहरं
Join us  
Trending Stories
1
विधान परिषदेच्या एका जागेसाठी राष्ट्रवादी काग्रेसमध्ये ४ नावांवर चर्चा, विक्रम काकडे यांचं नाव आघाडीवर
2
वेगळ्या घोषणेची गरज नाही, भारत आधीपासूनच हिंदूराष्ट्र - सरसंघचालक मोहन भागवत
3
मुंबई सीएसएमटीवरून सोलापूरला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनचा डबा घसरला, सुदैवाने सर्व प्रवासी सुरक्षित!
4
Virat Kohli New Record : किंग कोहलीचा 'विराट' पराक्रम! IPL मध्ये ९००० धावांसह रचला नवा विक्रम
5
यवतमाळ जिल्हा बँकेचे मुदतवाढ मिळालेले संचालक मंडळ अखेर बरखास्त; उपनिबंधकांकडे कारभार : संचालक मंडळाच्या मनसुब्यावर पाणी 
6
विदर्भातील सहा शहरांमध्ये ‘सन’ताप कायम, आणखी २४ तास उष्णतेची लाट; मात्र अर्धे जिल्हे अवकाळीच्या सावटात
7
DC vs RCB : हिशोब चुकता! दिल्ली कॅपिटल्सच्या घरच्या मैदानात रॉयल चॅलेंजर्सनं ३९ चेंडूत संपवली मॅच
8
Top Marathi News Live: मुंबई सीएसएमटीवरुन सोलापूरला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनचा डबा पुणे स्थानकात घसरला
9
"५१ अंशांच्या उन्हातही काही होणार नाही, माझ्या गाडीत AC चालत नाही"; ज्योतिरादित्य शिंदेंनी सांगितला उष्णतेच्या लाटेपासून बचावाचा देशी उपाय!
10
महाराज आला रे! मोठ्या धक्क्यातून सावरण्यासाठी Mumbai Indians नं खेळली 'ही' चाल
11
१ मे पासून LPG गॅसचे नियम बदलणार? सिलिंडर हवा असेल तर 'DAC' कोड द्यावा लागणार; पाहा नवे बदल
12
DC vs RCB: ८ धावांत ६ विकेट्स! भुवी-हेजलवूडमध्ये विकेट घेण्याची स्पर्धा; दिल्लीकरांसाठी भयावह स्वप्न
13
भसाभस वाढतंय वीज बिल... एसी सोबत पंखा किती फायदेशीर? फक्त AC च्या 'या' आकड्याकडे लक्ष द्या; सरकारनं दिला खास 'मंत्र'
14
वॉशिंग मशीन लावून झाल्यानंतर ४० मिनिटांनी अंघोळ करायचे लक्षात ठेवा...; नाहीतर ठरू शकते जीवघेणे!
15
कोण आहे Sahil Parakh? दिल्ली कॅपिटल्सनं नाशिकच्या पठ्ठ्याला दिली IPL पदार्पणाची संधी
16
जाणून-बुजून तुमचा स्मार्टफोन स्लो केला जातोय; युरोप मोबाईल कंपन्यांवर भडकला, कंटाळून नवा घ्यावा म्हणून...
17
भारतापाठोपाठ आता 'या' देशालाही रशियन तेलासाठी सूट! ट्रम्प अचानक उदार का झाले?
18
चिखलफेकप्रकरणी नितेश राणे निर्दोष, मात्र शांतता भंग केल्याप्रकरणी दोषी; १ महिना कारावास अन्...
19
राज्यात वीज पुरेशा प्रमाणात उपलब्ध, मात्र व्यवस्थेतील कमतरतेमुळे नागरिकांना मन:स्ताप- चंद्रशेखर बावनकुळे
20
Video - अग्नितांडव! हापूरमध्ये आग; ७० झोपड्यांसह २ कारखाने जळून खाक, कोट्यवधींचं नुकसान
Daily Top 2Weekly Top 5

मसाज करतानाचा व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी देत शरीरसंबंधाची मागणी

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 16, 2021 15:01 IST

मार्केटयार्ड पोलिसांनी एका तरुणाला अटक केली.

पुणे : शहरातील अनेक ठिकाणी मसाज सेंटरच्या नावाखाली वेश्या व्यवसाय केला जात असल्याचे पोलिसांनी केलेल्या कारवाईत दिसून आले आहे. असे असले तरी अनेक ठिकाणी केवळ मसाजच केला जातो. तरीही तेथे काम करणार्‍या महिलांकडे वाकड्या नजरेने पाहिले जाते. त्यांच्याकडूनही तशाच अपेक्षा ठेवल्या जातात. असाच काहीसा प्रकार मार्केटयार्ड येथे घडला. महिलेचा मसाज करतानाची व्हिडिओ क्लिप तयार करुन ती व्हायरल करण्याची धमकी देऊन शरीरसंबंधाची मागणी करणार्‍यास मार्केटयार्ड पोलिसांनी एका तरुणाला अटक केली आहे.

मार्केटयार्ड पोलिसांनी सुरेश किसन माने (वय ३२, रा. धनकवडी) असे अटक केलेल्याचे नाव आहे. ही घटना मार्केटयार्डातील एका आयुर्वेदिक उपचार केंद्रात १३ ते १५ जानेवारी दरम्यान घडली. याप्रकरणी मसाज करणार्‍या एका महिलेने फिर्याद दिली आहे. ही महिला एका आयुर्वेदिक उपचार केंद्रात मसाज करण्याचे काम करते. सुरेश माने हा ग्राहक म्हणून या केंद्रात आला होता. त्याने तेथे मसाज करुन घेतला. मसाज करताना त्याने फिर्यादीचे व्हिडिओ रेकॉर्डिंग केले. हा व्हिडिओ व्हायरल करतो नाही तर माझ्यासोबत शरीर संबंध कर अशी धमकी या तरुणाने महिलेला दिली. त्याने मसाज करतानाचा व्हिडिओ तिच्या मोबाईलवर पाठवून शिवीगाळ केल्याचे तक्रारीत म्हटले आहे. 

या घटनेची माहिती मिळाल्यावर मार्केटयार्ड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक दुर्योधन पवार व पोलीस अधिकार्‍यांनी घटनास्थळाला भेट देऊन माहिती घेतली. पोलिसांनी धमकावणार्‍या सुरेश माने याला अटक केली असून पोलीस निरीक्षक ढमढेरे अधिक तपास करीत आहेत.

टॅग्स :PuneपुणेMarket Yardमार्केट यार्डWomenमहिलाPoliceपोलिसArrestअटक