Delhi Blast : २६ जानेवारी, दिवाळीला स्फोट करण्याचा होता प्लॅन, पण...; दिल्ली स्फोट प्रकरणात मुझम्मिलचा मोठा खुलासा
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 12, 2025 12:13 IST2025-11-12T12:12:32+5:302025-11-12T12:13:34+5:30
Delhi Blast : दिल्ली स्फोट प्रकरणाचा तपास एनआयए अधिक वेगाने करत आहे आणि आता याप्रकरणात मोठे खुलासे समोर येत आहेत.

Delhi Blast : २६ जानेवारी, दिवाळीला स्फोट करण्याचा होता प्लॅन, पण...; दिल्ली स्फोट प्रकरणात मुझम्मिलचा मोठा खुलासा
दिल्लीस्फोट प्रकरणाचा तपास एनआयए अधिक वेगाने करत आहे आणि आता याप्रकरणात मोठे खुलासे समोर येत आहेत. हरियाणातील फरीदाबाद येथील डॉ. मुझम्मिल शकीलच्या दोन खोल्यांमधून २९०० किलो स्फोटकं जप्त करण्यात आली. यानंतर आता त्याच्या फोनची तपासणी केली असता धक्कादायक माहिती समोर आली. २६ जानेवारी आणि दिवाळीला लाल किल्ल्यावर स्फोट घडवण्याचा त्याचा प्लॅन होता. तसेच डॉ. मुझम्मिल आणि डॉ. उमर यांनी लाल किल्ल्याची रेकी केली होती.
मिळालेल्या माहितीनुसार, डॉ. मुझम्मिलच्या फोनमधील डंप डेटावरून २६ जानेवारी आणि दिवाळीला स्फोट घडवण्याचा प्लॅन असल्याची माहिती मिळाली आहे. तपास यंत्रणेच्या चौकशीत पुष्टी झाली की, या दोन महत्त्वाच्या दिवशी लाल किल्ल्याला टार्गेट करणं हा त्यांच्या प्लॅनचा भाग होता. जास्तीत जास्त गर्दी असेल अशी संधी शोधण्याचा त्यांचा हेतू होता. पण ते हल्ला करू शकले नाहीत.
हृदयद्रावक! आई-वडिलांसाठी खास टॅटू, त्यावरुनच मृतदेहाची ओळख; दिल्ली स्फोटात अमरचा मृत्यू
दिल्ली बॉम्बस्फोटांचा संबंध केवळ फरिदाबादशीच नाही तर हरियाणातील मेवातशीही असल्याचं दिसून येत आहे. मौलवी इस्ताकला येथून ताब्यात घेण्यात आलं आहे. त्याला जम्मू आणि काश्मीरला नेण्यात आलं. एनआयए आणि जम्मू आणि काश्मीर पोलीस चौकशी करत आहेत.
वडिलांचं निधन, आईची कॅन्सरशी झुंज, ४ बहिणींचा एकच भाऊ; शिवाची मन हेलावून टाकणारी गोष्ट
मौलवी इस्ताकने त्याची खोली डॉ. मुझम्मिलला भाड्याने दिल्याची माहिती मिळत आहे. फरिदाबादच्या फतेहपूर टागा गावात या खोलीत २५०० किलोपेक्षा जास्त स्फोटकं आढळली. मुझम्मिलने दोन खोल्या भाड्याने घेतल्या होत्या, जिथे एकूण २९०० किलोपेक्षा जास्त स्फोटकं जप्त करण्यात आली. तपास संस्था, एनआयए, आता मौलवीची चौकशी करत आहे.
देशभरात हायअलर्ट! दिल्ली कार स्फोटाचा तपास NIA करणार; गृह मंत्रालयाचा मोठा निर्णय
"४ वर्षांपूर्वी घरातून निघून गेला, आम्हाला..."; अटक केलेल्या डॉक्टरच्या आईचा धक्कादायक खुलासा
राजधानी दिल्लीतील लाल किल्ला मेट्रो स्टेशनजवळ उभ्या असलेल्या एका कारमध्ये सोमवारी मोठा स्फोट झाला. मृतांचा आकडा वाढला आहे. मृतांची संख्या १२ झाली आहे आणि जखमींची संख्या २५ झाली आहे. कार स्फोटाची तीव्रता इतकी होती की जवळपासच्या अनेक वाहनांची जळून राख झाली, ज्यामुळे रस्त्यावर मोठा गोंधळ उडाला. प्रत्यक्षदर्शींच्या मते, परिसर आगीने वेढला गेला आणि जखमी झालेले लोक मदतीसाठी ओरडत होते.