Delhi Blast : व्हाईट कॉलर टेरर मॉड्यूल! दिल्ली स्फोट प्रकरणात आणखी एका डॉक्टरला घेतलं ताब्यात
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 13, 2025 11:21 IST2025-11-13T11:21:12+5:302025-11-13T11:21:45+5:30
Delhi Blast : दिल्ली हल्ल्याचं गूढ उकलण्यासाठी तपास यंत्रणा देशभरातील विविध राज्यांमध्ये छापे टाकत आहेत. याच दरम्यान दहशतवाद विरोधी पथकाने कानपूर येथून एका डॉक्टरला ताब्यात घेतलं.

Delhi Blast : व्हाईट कॉलर टेरर मॉड्यूल! दिल्ली स्फोट प्रकरणात आणखी एका डॉक्टरला घेतलं ताब्यात
दिल्ली हल्ल्याचं गूढ उकलण्यासाठी तपास यंत्रणा देशभरातील विविध राज्यांमध्ये छापे टाकत आहेत. याच दरम्यान दहशतवाद विरोधी पथकाने (एटीएस) बुधवारी संध्याकाळी कानपूर येथून एका डॉक्टरला ताब्यात घेतलं. डॉ. शाहीन शाहिद आणि त्यांचा भाऊ डॉ. परवेझ यांच्या चौकशीतून मिळालेल्या नवीन माहितीच्या आधारे ही कारवाई करण्यात आली. ताब्यात घेतलेल्या डॉक्टरने दिल्ली हल्ल्याच्या दिवशी परवेझ आणि शाहिन यांच्या संपर्कात असलेल्या लोकांशी संवाद साधला होता.
डॉ. शाहीनचे परदेशी संघटनांशी असलेले संभाव्य संबंध आणि जैश मॉड्यूलमधील तिची भूमिका याबद्दल चौकशीतून महत्त्वाचे खुलासे होऊ शकतात असं म्हटलं जात आहे. या हल्ल्याच्या संदर्भात तपास यंत्रणांनी आतापर्यंत ज्या सहा मोठ्या डॉक्टरांना अटक केली आहे, ते सर्व भारतातील सरकारी वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये शिक्षण घेत होते.
"दावत के लिए बिरयानी तैयार..."; दिल्ली स्फोटासाठी खास कोडवर्ड, चॅट बॉक्समध्ये धक्कादायक खुलासा
लाल रंगाची कार जप्त
फरिदाबाद पोलिसांनी खंडावली गावात दिल्ली कार स्फोटात सहभागी असल्याचा संशय असलेली लाल रंगाची कार जप्त केली. तपास यंत्रणांनी घटनास्थळावरून एका व्यक्तीला ताब्यात घेतलं. ही तीच कार आहे ज्याचा पोलीस शोध घेत होते. ती उमरच्या नावावर रजिस्टर्ड आहे. उत्तर प्रदेश आणि हरियाणामधील पोलिसांनाही संशयास्पद कारची माहिती देण्यात आली होती आणि आता पोलिसांनी ती फरिदाबादमध्ये शोधली आहे.
"मला डिस्टर्ब करू नका, महत्त्वाचं काम करतोय..."; कुटुंबाशी अनेक महिने बोलायचा नाही उमर
१० अधिकाऱ्यांचं विशेष पथक
एनआयएने दिल्ली स्फोटांच्या तपासासाठी १० अधिकाऱ्यांचं एक विशेष पथक तयार केलं आहे. बुधवारी सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, १० सदस्यांच्या या विशेष पथकाचं नेतृत्व एनआयएचे एडीजी विजय सखारे करतील. त्यात एक आयजी, दोन डीआयजी, तीन एसपी आणि उर्वरित डीएसपी अधिकारी असतील. तपास यंत्रणा सोशल मीडियावरील एक्टिव्हिटीवर लक्ष ठेवून दिल्लीतील अनेक ठिकाणांहून मोबाईल फोन डंप डेटा गोळा करत आहेत.
२६ जानेवारी, दिवाळीला स्फोट करण्याचा होता प्लॅन, पण...; दिल्ली स्फोट प्रकरणात मुझम्मिलचा मोठा खुलासा
हृदयद्रावक! आई-वडिलांसाठी खास टॅटू, त्यावरुनच मृतदेहाची ओळख; दिल्ली स्फोटात अमरचा मृत्यू
दिल्लीत सुरक्षा वाढवली
लाल किल्ल्याजवळ झालेल्या स्फोटानंतर, दिल्ली पोलिसांनी राजधानीत सुरक्षा वाढवली आहे. अधिकाऱ्यांनी नागरिकांना सतर्क राहण्याचे आणि कोणत्याही संशयास्पद वस्तू किंवा हालचालींची त्वरित पोलिसांना माहिती देण्याचं आवाहन केलं. संसद परिसर, कॅनॉट प्लेस आणि रेल्वे स्टेशनसारख्या संवेदनशील ठिकाणी अशा घोषणा ऐकू येत आहेत. गर्दीच्या बाजारपेठांमध्ये आणि बस टर्मिनल्समध्ये पोलीस पथकं लाऊडस्पीकर वापरत आहेत, ज्यात लोकांना सतर्क राहण्याचे आणि कोणत्याही बेवारस बॅगा किंवा संशयास्पद हालचालींची माहिती जवळच्या पोलीस स्टेशनला देण्याचे आवाहन करण्यात आलं.