Delhi Blast : दिल्ली स्फोटात खळबळजनक खुलासा; घटनास्थळी सापडली 9mm ची ३ काडतुसं, पण...
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 16, 2025 10:16 IST2025-11-16T10:15:41+5:302025-11-16T10:16:24+5:30
Delhi Blast : दिल्लीच्या लाल किल्ल्याजवळ झालेल्या कार स्फोटाच्या तपासात आणखी एक महत्त्वाची माहिती समोर आली आहे.

Delhi Blast : दिल्ली स्फोटात खळबळजनक खुलासा; घटनास्थळी सापडली 9mm ची ३ काडतुसं, पण...
दिल्लीच्या लाल किल्ल्याजवळ झालेल्या कारस्फोटाच्या तपासात आणखी एक महत्त्वाची माहिती समोर आली आहे. पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, घटनास्थळावरून 9mm कॅलिबरची तीन काडतुसं जप्त करण्यात आली आहेत. यामध्ये दोन जिवंत काडतुसं आणि एका रिकाम्या बॉक्सचा समावेश आहे. या घटनेनंतर तपास यंत्रणांची आणखी वेगाने तपास करत आहेत.
9mm कॅलिबर काडतुसं नागरी वापरासाठी प्रतिबंधित आहेत. याचाच अर्थ कोणताही नागरिक त्यांच्या कायदेशीर परवाना असलेल्या बंदुकीमध्ये ही काडतुसं वापरू शकत नाही. ही काडतुसं सामान्यतः सुरक्षा दल, पोलीस किंवा विशेष परवानगी असलेल्यांकडे असतात. यामुळे ही काडतुसं इतक्या संवेदनशील ठिकाणी कशी पोहोचली असा प्रश्न आता उपस्थित होत आहे.
दिल्ली स्फोटानंतर काश्मीरचा 'टिकिंग टाईम बॉम्ब' डॉक्टर बेपत्ता; उमरसोबत केलं होतं काम
काडतुसं सापडली, पण शस्त्र गायब
सर्वात धक्कादायक बाब म्हणजे घटनास्थळावरून कोणतेही पिस्तूल किंवा शस्त्रांचे भाग जप्त करण्यात आले नाहीत. काडतुसं सापडली असली तरी गोळीबार करण्यासाठी वापरलेलं शस्त्र गायब आहे. यामुळे तपास आणखी गुंतागुंतीचा झाला आहे, कारण ही काडतुसं स्फोटापूर्वीपासूनच तिथे होते की नंतर टाकण्यात आली हे अद्याप स्पष्ट झालेलं नाही.
दिल्लीसह देशभरात ३२ कार वापरुन साखळी बॉम्बस्फोटचं प्लॅनिंग? दहशतवाद्यांबद्दल मोठा दावा
"दावत के लिए बिरयानी तैयार..."; दिल्ली स्फोटासाठी खास कोडवर्ड, चॅट बॉक्समध्ये धक्कादायक खुलासा
कर्मचाऱ्यांच्या शस्त्रांची तपासणी
पोलीस सूत्रांनुसार, घटनास्थळी उपस्थित असलेल्या पोलीस कर्मचाऱ्यांची शस्त्रं आणि काडतुसं देखील तपासण्यात आली. तपासात असं दिसून आलं की कोणत्याही कर्मचाऱ्यांकडून काडतुसं गहाळ झालेली नाहीत. यामुळे ही काडतुसं बाहेरील व्यक्तीची असावीत असा संशय आणखी वाढला आहे.
व्हाईट कॉलर टेरर मॉड्यूल! दिल्ली स्फोट प्रकरणात आणखी एका डॉक्टरला घेतलं ताब्यात
'दहशतवादी डॉक्टरांना' कुठून मिळत होतं फंडिंग? शाहीनच्या अकाऊंटमधून धक्कादायक माहिती
दिल्ली पोलीस आता 9mm कॅलिबरची काडतुसं घटनास्थळी कशी आली याचा तपास करत आहेत. कार स्फोट आणि या काडतुसं यांच्यात थेट संबंध आहे का किंवा हा केवळ योगायोग आहे का याचाही तपास करत आहेत. फॉरेन्सिक टीम ही काडतुसं अलीकडेच वापरली गेली आहेत का याचा देखील तपास करत आहे.