महानगरपालिकेच्या कचरा गाडीला दुचाकीची जोरदार धडक ; आयटी अभियंत्याचा जागीच मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 1, 2019 17:12 IST2019-02-01T17:10:22+5:302019-02-01T17:12:07+5:30
नवले ब्रिज पासून काही अंतरावर असलेल्या वडगाव बुद्रुककडे जाणाऱ्या अरुंद वळणावर मनपाच्या कचरा गाडीला दुचाकीची जोरदार धडक बसली.

महानगरपालिकेच्या कचरा गाडीला दुचाकीची जोरदार धडक ; आयटी अभियंत्याचा जागीच मृत्यू
पुणे: वडगाव बुद्रुक येथील सदाशिव दांगट पाटील नगर जवळ पुणे महानगरपालिकेच्या कचरा गाडीला दुचाकीची जोरदार धडक बसून अपघात घडला. या अपघातात अंकित जितेंद्र शहा (सध्या रा.मानाजी नगर, मूळ- इचलकरंजी ) या २३ वर्षीय तरुणाचा जागीच मृत्यू झाला.
सकाळी नऊच्या सुमारास नवले ब्रिज पासून काही अंतरावर असलेल्या वडगाव बुद्रुककडे जाणाऱ्या अरुंद वळणावर मनपाच्या कचरा गाडीला दुचाकीची जोरदार धडक बसल्याने युवक गाडीवरून खाली पडला. त्याच्या डोक्याला जबर मार लागला. विशेष म्हणजे या युवकाने हेल्मेट घातलेले होते. मात्र , डोक्याला झालेल्या गंभीर दुखापतीमुळे युवकाचा जागीच मृत्यू झाला.