खळबळजनक!दहावीच्या विद्यार्थ्याचा मृत्यू, नेरूळच्या पोदार शाळेतली घटना
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 30, 2019 16:47 IST2019-08-30T16:46:21+5:302019-08-30T16:47:50+5:30
अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून पोलीस अधिक तपास करत आहेत.

खळबळजनक!दहावीच्या विद्यार्थ्याचा मृत्यू, नेरूळच्या पोदार शाळेतली घटना
नवी मुंबई - दहावीच्या विद्यार्थ्याचा शाळेत मृत्यू झाल्याची घटना शुक्रवारी सकाळी घडली. प्रकृती ठीक नसल्याने चक्कर येऊन पडल्याने त्याचा मृत्यू झाल्याचा अंदाज वर्तवला जात आहे. त्यानुसार अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून पोलीस अधिक तपास करत आहेत.
सौम्य संजय भटनागर (१५) असे मृत्यू झालेल्या मुलाचे नाव आहे. तो नेरूळच्या पोदार शाळेत दहावीत शिकत होता. शुक्रवारी सकाळी तो नेहमीप्रमाणे शाळेत गेला होता. यावेळी तो चक्कर येऊन पडल्याने बेशुद्ध झाला होता. यामुळे त्याला डी.वाय. पाटील रुग्णालयात आणले असता, डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. त्याची प्रकृती ठिक नसतानाही तो शाळेत गेला होता. यावेळी चक्कर आल्याने तो खाली कोसळून त्यातच मृत्यू झाल्याचा अंदाज वर्तवला जात आहे. त्यानुसार एनआरआय पोलीस ठाण्यात त्याच्या आकस्मित मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. तर मृतदेह शवविच्छेदनासाठी वाशीच्या पालिका रुग्णालयात पाठवण्यात आला आहे. याप्रकरणी पोलीस अधिक तपास करत आहेत.