मृतदेह बंद पेटीत आढळला; पत्नीची हत्या करून पती मेहुणीसोबत झाला फरार

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 16, 2021 14:23 IST2021-11-16T13:56:51+5:302021-11-16T14:23:25+5:30

Murder Case : २४ वर्षीय वर्षा कुमारी असं  मृत महिलेचे नाव आहे. आरोपी पतीचे नाव शनी पासवान असे आहे.

The Deadbody was found in a closed box; After killing his wife, the husband fled with his sister-in-law | मृतदेह बंद पेटीत आढळला; पत्नीची हत्या करून पती मेहुणीसोबत झाला फरार

मृतदेह बंद पेटीत आढळला; पत्नीची हत्या करून पती मेहुणीसोबत झाला फरार

बाढ : बिहारमधील बाढ जिल्ह्यातून पती-पत्नीच्या नात्याला काळीमा फासणारी घटना समोर आली आहे. या जिल्ह्यात पती आपल्या पत्नीची हत्या करुन मेहुणीसह पळून गेला आहे. या घटनेची माहिती मिळताच मोकामा पोलीस ठाण्याचे पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून त्यांनी मृतदेह ताब्यात घेतला. पुढील तपास सुरु केला. 


बंद पेटीतून मृतदेह काढला
मिळालेल्या माहितीनुसार, २४ वर्षीय वर्षा कुमारी असं  मृत महिलेचे नाव आहे. आरोपी पतीचे नाव शनी पासवान असे आहे. या घटनेची माहिती देताना मोकामाचे एसएचओ राजनंदन शर्मा म्हणाले, 'प्राथमिक तपासात हे हत्येचे प्रकरण आहे, कारण बंद पेटीतून मृतदेह बाहेर काढण्‍यात आला आहे. तपासात मृत महिलेचा शनी पासवान फरार असल्याचे निष्पन्न झाले आहे. इथे शनी पासवानने आपल्या पत्नीची हत्या केली असून हत्येनंतर तो आपल्या मेहुणीसह फरार असल्याची चर्चाही लोकांमध्ये सुरू आहे.


पोलीस या प्रकरणाच्या तपासात 
एसएचओच्या म्हणण्यानुसार, ४ वर्षांपूर्वी वर्षा कुमारी यांचे शनी पासवानसोबत लग्न झाले होते. मात्र, शनी पासवानचे पत्नी वर्षा हिच्या बहिणीशी अवैध संबंध होते. त्यामुळे पत्नीची हत्या करून शनी आपल्या मेहुणीसह फरार झाला. मात्र, पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेऊन तपास सुरू केला आहे.

Web Title: The Deadbody was found in a closed box; After killing his wife, the husband fled with his sister-in-law