शहरं
Join us  
Trending Stories
1
पश्चिम बंगालमध्ये निवडणूक निकालापूर्वीच 'हायव्होल्टेज ड्रामा'! स्ट्राँग रूम बाहेर पोहोचल्या CM ममता, EVM सोबत छेडछाडीचा आरोप
2
शिवाजीराव, तुमचे शिक्षण किती, पूर्वायुष्य काय..? मंत्री मुश्रीफ यांचे प्रत्युत्तर
3
'प्रिन्स'च्या विकेटनंतर 'किंग'चा जल्लोष; पण शेवटी RCB ला पराभवाचा धक्का देत GT नं मारली बाजी!
4
जबलपूर हादरले! वादळामुळे बर्गी धरणात क्रूझ उलटली; ४० पैकी ५ जणांचे मृतदेह सापडले
5
तो, ती आणि खळबळजनक पोस्ट! IPL मधील स्टार क्रिकेटर मैदानाबाहेरील गोष्टीमुळे चर्चेत, काय आहे प्रकरण?
6
धिरेंद्र कृष्ण शास्त्रीचा खरात होऊ शकतो! त्यांनी दिव्यशक्ती सिद्ध करावी, १० व्यक्ती अन् १०...; शाम मानव यांचं आव्हान
7
Exit Poll 2026: टुडेज चाणक्यचा एक्झिटपोल आला...! भाजपचं वादळ, ममतांसोबत 'खेला'; धक्कादायक आहे आकडेवारी
8
GT vs RCB : रजत पाटीदारच्या विकेटवरुन वाद; विराट कोहलीनं पंचांसोबत घातली हुज्जत! नेमकं काय घडलं?
9
म्हाडाने लॉटरीतील १२२१ घरांच्या किंमती ७.५ टक्क्यांनी कमी केल्या
10
जर कच्चे तेल नाही मिळाले तर चीन होर्मुझ ताब्यात घेणार? अमेरिकेच्या हातातून बाजी निसटणार, इराण अन्...
11
आता आरपारची लढाई! मोज्तबा खामेनेईंचा ट्रम्प यांना सज्जड इशारा; म्हणाले "समुद्रात गाडून टाकू..."
12
GT vs RCB : किंग कोहलीनं ५ चेंडूत केली गेलच्या विक्रमाशी बरोबरी; रबाडानं असा घेतला बदला (VIDEO)
13
रील स्टार पाटलाचा कारनामा, १२ वर्षांपूर्वीच्या अपहरण-खून प्रकरणाचा गुन्हे शाखेने केला उलगडा
14
“शिंदेंकडून मलाही ऑफर, पण मी फडणवीसांचा निष्ठावान कार्यकर्ता”; रवी राणांचा मोठा खुलासा
15
बुद्ध पौर्णिमा-पुष्टिपती विनायक जयंती २०२६: ९ राशींची इच्छा पूर्ण अन् धनलाभ; काळजी दूर होईल!
16
"उद्धव ठाकरेंनी स्वतःचा राजकीय बळी न देता.."; विधानपरिषद निवडणुकीवरून भाजपची घणाघाती टीका
17
‘मिसिंग लिंक’ नाव कसे पडले? ‘मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे’ची विशेष मार्गिका, वैशिष्ट्ये आहेत खास!
18
डाव उलटा पडलाय! प्रतिष्ठा जपायची असेल तर हार्दिक पांड्याला संघाबाहेर काढा; दिग्गजाचा MI ला सल्ला
19
पश्चिम बंगालच्या एक्झिट पोलवर CM ममता बॅनर्जी यांची पहिली प्रतिक्रिया; TMC ला किती जागा मिळणार? केली मोठी भविष्यवाणी
20
“पवारांविरुद्ध लढणार नाही”; सुप्रिया सुळेंच्या विधानावर सुनेत्रा पवारांचे एका वाक्यात भाष्य
Daily Top 2Weekly Top 5

कोपरीत भरदिवसा थरार; पूर्ववैमनस्यातून कुटुंबावर जीवघेणा हल्ला

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 20, 2021 16:48 IST

Fatal attack on family : तिघा भावंडांपैकी दोघांची प्रकृती चिंताजनक

ठळक मुद्देपोलीसांच्या निष्काळजीमुळे गुन्हेगाराला बळ मिळाल्याने त्यातूनच हा हल्ला घडल्याचा आरोप जखमींच्या कुटुंबीयांनी केला आहे.तिथे राहणाऱ्या रामदुलारी वैश्य कुटुंबाचे जवळच राहणाऱ्या प्रकाश अय्यर (श्रीनिवास) याच्यासोबत किरकोळ भांडण होते.

नवी मुंबई : जुन्या वादाचा बदल घेण्याच्या भावनेतून एका कुटुंबावर जीवघेणा हल्ला झाल्याची घटना कोपरी येथे घडली आहे. यामध्ये तिघे भावंडे गंभीर जखमी झाले असून दोघांची प्रकृती चिंताजनक आहे. दरम्यान पोलीसांच्या निष्काळजीमुळे गुन्हेगाराला बळ मिळाल्याने त्यातूनच हा हल्ला घडल्याचा आरोप जखमींच्या कुटुंबीयांनी केला आहे.बुधवारी सकाळी ११ वाजण्याच्या सुमारास कोपरी येथे हा थरार घडला. तिथे राहणाऱ्या रामदुलारी वैश्य कुटुंबाचे जवळच राहणाऱ्या प्रकाश अय्यर (श्रीनिवास) याच्यासोबत किरकोळ भांडण होते. काही दिवसांपूर्वी रामदुलारी यांची मुलगी काजल हिच्यासोबत देखील अय्यर याने किरकोळ कारणावरून भांडण केले होते. याप्रकरणी एपीएमसी पोलीसठाण्यात दोन्ही कुटुंबाविरोधात गुन्हा दाखल आहे. मात्र अय्यर हा जाणीवपूर्वक भांडण काढत असल्याची तक्रार वैश्य कुटुंबाने एपीएमसी पोलीसांना दिली होती. त्यानंतरही पोलीसांकडून त्याच्या विरोधात ठोस कारवाई केली नव्हती. परिणामी अय्यर हा वैश्य कुटुंबाचा काटा काढण्याच्या उद्देशाने ४ ते ५ सहकाऱ्यांसह बुधवारी सकाळी दबा धरून बसला होता. यावेळी अमित वैश्य (२६) हा कामानिमित्ताने घराबाहेर निघाला असता सोसायटीतच त्याच्यावर धारदार शस्त्राने वार करण्यात आले. यावेळी त्याठिकाणी त्याची बहीण काजल (२७) व भाऊ हृतिक (१६) त्याठिकाणी आले असता त्यांच्यावर देखील वार करण्यात आले. यादरम्यान झालेल्या आरडा ओरडा मुळे तिथे जमाव जमलं असता मारेकरूनी तिथून पळ काढला. या घटनेनंतर तिघाही जखमींना वाशीच्या पालिका रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र काजल व अमित यांची प्रकृती चिंताजनक असल्याचे डॉक्टरांकडून सांगण्यात आले. तिघांच्याही गळ्यावर व पोटावर वार झाले असल्याने त्यांची प्रकृती चिंताजनक आहे.अटकेनंतरही धमकी हल्ल्याच्या घटनेनंतर अय्यर याला ताब्यात घेऊन पोलिस ठाण्यात आणण्यात आले. यावेळी तिथे उपस्थित असलेल्या रामदुलारी वैश्य यांना अय्यर याने "तू वाचला असून, तुला नंतर बघून घेतो" अशी धमकी दिली. त्यामुळे तिथला जमाव अधिकच भडकला होता.पोलीस ठाण्याबाहेर आक्रोशवैश्य कुटुंबावर झालेल्या हल्ल्यात तिघे भावंडे गंभीर जखमी झाल्याचे समजताच त्यांच्या सुमारे २०० परिचितांनी एपीएमसी पोलीस ठाण्याबाहेर गर्दी केली. यावेळी जखमींच्या प्रकृतीवरून चिंता व्यक्त करत त्यांच्याकडून टाहो फोडला जात होता. तर मारेकरू प्रकाश अय्यर विरोधात अनेकदा तक्रार करूनही त्याला पोलीसांनी पाठीशी घातल्यानेच हा प्रसंग घडल्याचा आरोप रामदुलारी वैश्य यांनी केला आहे.मारेकरू सराईत गुन्हेगार प्रकाश अय्यर हा सराईत गुन्हेगार असून सतत नशेत असतो. त्याला कोनी विरोध केल्यास सूड उगवण्याच्या भावनेतून तो हल्ला करतो किंवा खोट्या तक्रारी करत असतो. यापूर्वी त्याने स्वतःवर वार करून नितीन भोईर व नातेवाईकांवर खोटी तक्रार केली होती. यानंतरही अय्यर याच्यावर ठोस कारवाई होत नसल्याचे आश्चर्य व्यक्त होत आहे.

 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीNavi Mumbaiनवी मुंबईPoliceपोलिस