शहरं
Join us  
Trending Stories
1
धमक्या कशाला देता? ४ जूनला जनताच तुम्हाला बघून घेईल - संजय राऊत
2
Sunita Kejriwal : "प्रत्येकजण हुकूमशाही हटवण्यासाठी आणि लोकशाही..."; सुनीता केजरीवाल यांचा रोड शो
3
काँग्रेसला मोठा धक्का; अरविंदर सिंग लवली यांचा राजीनामा
4
"रावणानं सीतेचं हरण केलं आणि नरेंद्र मोदी यांनी…” काँग्रेसच्या महिला नेत्याची बोचरी टीका
5
वर्षा गायकवाडांविरोधात कसं लढणार? उज्ज्वल निकम म्हणाले, ‘कोर्टात समोरच्याला…’
6
Sahil Khan : अभिनेता साहिल खानच्या अडचणीत वाढ; महादेव बेटिंग App प्रकरणी मुंबई पोलिसांची मोठी कारवाई
7
J P Nadda : "ही ममता बॅनर्जींची सर्वात मोठी चूक, तुम्ही बंगालचं काय केलं?"; जेपी नड्डा यांचा हल्लाबोल
8
नरेंद्र मोदी आज कर्नाटकात करणार वादळी प्रचार, दिवसभरात 4 सभांचे आयोजन
9
'आम्ही नरेंद्र मोदींचं तुतारी वाजवून स्वागत करू', पुण्यातील सभेवरून सुप्रिया सुळे यांचा टोला
10
‘अमित शाह, योगी आदित्यनाथ यांनी कोकणात यायच्या भानगडीत पडू नये, इथे आल्यास…’, भास्कर जाधव यांचा इशारा
11
"ते म्हणतात की, मी अपवित्र आहे, कारण...", कंगनाचा विक्रमादित्य यांच्यावर जोरदार हल्लाबोल
12
सांगलीच्या ‘करेक्ट’ कार्यक्रमामुळे राष्ट्रवादी काॅंग्रेसची घसरगुंडी !
13
प्रचाराच्या रणधुमाळीदरम्यान मुंबईतील भांडुपमधून तीन कोटींची रोकड जप्त, तपास सुरू
14
महायुतीची डोकेदुखी वाढली, पाच जागांचा तिढा कायम; आपसांतच रस्सीखेच
15
आजचे राशीभविष्य - २८ एप्रिल २०२४, सार्वजनिक जीवनात मान-प्रतिष्ठा वाढेल
16
आमिरला पहिल्या पत्नीने लगावली होती कानशिलात, नेमकं काय घडलं होतं? अभिनेत्याने केला खुलासा
17
ईश्वराप्पा यांच्या बंडाने शिवमोग्गात लढत रंगतदार; पक्षातून सहा वर्षासाठी हकालपट्टी
18
राज्यात पारा चाळिशी पार; मुंबई ३६, तर ठाणे ४१, उष्माघाताच्या रुग्णांची संख्या १८४ वर
19
या झोपडीत राहतो लोकसभेचा उमेदवार, रावेरमधून लढणार; लोकांनी वर्गणी काढून भरले डिपॉझिट
20
राजस्थान रॉयल्सची प्ले ऑफमधील जागा निश्चित! संजू सॅमसन, ध्रुव जुरेल यांची मॅच विनिंग खेळी 

पुण्यात दत्तवाडी पोलिसांनी केले ३ कोटी ५० लाखांचे हस्तिदंत जप्त

By ऑनलाइन लोकमत | Published: June 27, 2019 12:32 PM

सिंहगड रस्त्यावरील पु.ल.देशपांडे गार्डनजवळ पीएमपी बस स्टॉपवर चार इसम हस्तिदंत विक्री करण्यासाठी येणार आहे, अशी माहिती पोलिसांना मिळाली होती

पुणे : दत्तवाडी पोलिसांनी बेकायदेशीररित्या हस्तिदंताची विक्री करणाऱ्या चार जणांच्या मुसक्या आवळल्या. त्यांच्याकडून तब्बल ३ कोटी ५० लाख रुपये किंमतीचे हस्तिदंत जप्त करण्यात आले. आदित्य संदीप खांडगे (वय १९ रा.देहूफाटा) ऋषिकेश हरिश्चंद्र गायकवाड (वय २८रा.विवेकानंद नगर,वाकड,पुणे) अनिकेत चंद्रकांत अष्टेकर (वय२६ रा.नगर- कल्याण रोड,अहमदनगर) आणि अमित अशोक पिस्का (वय २८ रा. सामलवाडा, अहमदनगर )अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत. पोलिसांना एका खबऱ्यामार्फत माहिती मिळाली की, सिंहगड रस्त्यावरील पु.ल.देशपांडे गार्डनजवळ पीएमपी बस स्टॉपवर चार इसम हस्तिदंत विक्री करण्यासाठी येणार आहे.  दत्तवाडी पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक देविदास घेवारे यांनी पो.उप निरीक्षक कुलदीप संकपाळ यांना कारवाई करण्याची सूचना दिली. वनविभाग पुणे यांना लेखी पत्राने माहिती कळवून दोन पंच बोलावून घेतले.खबर मिळाल्याप्रमाणे वनविभाग चे राउंड ऑफिसर,व पंच आणि पोलीस स्टाफ असे .ल.देशपांडे गार्डन जवळ जाऊन सापळा रचत चार इसमाना ताब्यात घेतले. त्यांच्याकडे दोन हस्तिदंत (दात) मिळून आले.त्यांचे प्रत्येकी वजन १)०.८८६ ग्रॅम वजन ३३सेंटीमीटर लांबी, २)०.९९८ ग्रॅम ३५ सेंटीमीटर लांब असे आहे. ह्या हस्तिदंताचे सध्याचे बाजार भाव ३ कोटी ५०लाख असल्याची माहिती दत्तवाडी पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक देविदास घेवारे यांनी दिली. वरील चार व्यक्तिविरोधात वन्य प्राणी संरक्षण कायद्यानुसार दत्तवाडी पोलीस स्टेशन गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुन्ह्याचा तपास पोलीस उपनिरीक्षक कुलदीप संकपाळ हे करत आहे.

टॅग्स :PuneपुणेPoliceपोलिसArrestअटकCrime Newsगुन्हेगारी