शहरं
Join us  
Trending Stories
1
राजस्थान रॉयल्सची प्ले ऑफमधील जागा निश्चित! संजू सॅमसन, ध्रुव जुरेल यांची मॅच विनिंग खेळी 
2
“मोदींनी १० वर्षांत एकही पत्रकार परिषद घेतली नाही, मनमोहन सिंग यांनी १११ घेतल्या”: शरद पवार
3
“पंतप्रधान मोदींना भारतरत्न द्या अन् प्रायश्चित करायला हिमालयात पाठवा”: मार्कंडेय काटजू
4
“देशाचे संविधान, कायदा अन् सुरक्षेलाच प्राधान्य देणार”; उज्ज्वल निकम यांची पहिली प्रतिक्रिया
5
इरफान पठाणने दाखवली MI ची मोठी चूक; हार्दिक पांड्या पराभवाचं भलतंच कारण सांगतोय... 
6
मत द्यायचे असेल तर कोणाला देऊ ? हा प्रश्न, कोणी कुठेही...; महेश मांजरेकरांचे राजकारणावर भाष्य
7
'मुंबईकरांचे योद्धे' संसदेत जाणार, उज्ज्वल निकमांचा विक्रमी मतांनी विजय होणार - शेलार
8
मुंबई इंडियन्स प्ले ऑफच्या शर्यतीतून बाद? दिल्ली कॅपिटल्सच्या विजयाने Point Table बदलले
9
“आईचे निधन पण मोदी तातडीने देशसेवेत, आईच्या पदराखाली राहून राजकारण करणारा नको”: CM शिंदे
10
KL Rahul ची रेकॉर्ड ब्रेकींग खेळी! राजस्थान रॉयल्ससमोर उभे केले तगडे आव्हान 
11
चार दिवसांपासून उत्तराखंडचे जंगल धुमसतेय; सैन्याच्या छावणीपर्यंत पोहोचला वणवा, हेलिकॉप्टर उडाली
12
ट्रोलिंग केल्यास, दोन महिने थेट तुरूंगात टाका! महेश मांजरेकरांचा सरकारला सल्ला
13
शरद पवारांचे साताऱ्याचे उमेदवार अडचणीत; शशिकांत शिंदेंवर आणखी एका घोटाळ्यात एफआयआर
14
शशिकांत शिंदेंना अटक झाली तर महाराष्ट्रात संघर्ष करू; शरद पवार यांचा इशारा
15
माझा 'भाव' विचारला, महिलांचा अपमान केला, मी श्वास घेते हेही काँग्रेसला त्रासदायक; कंगना भावूक
16
राहुल गांधी रामललाचे दर्शन घेणार? “लोकसभा निवडणुकांमुळे राम मंदिर आठवले”; भाजपाची टीका
17
“महाराष्ट्र काँग्रेस ठाकरे गटात विलीन झाल्यास आश्चर्य वाटायला नको”; संजय निरुपम यांची टीका
18
Ohh Shit! रोहित शर्माने धाव पूर्ण होताच रिषभ पंतला मारला जोरात धक्का अन्... 
19
रिषभ पंतवर मुंबईचा कर्णधार हार्दिक पांड्या खवळला, अम्पायरकडे तक्रार करताना दिसला
20
“PM मोदींनी शेतकऱ्यांसाठी मोठे निर्णय घेतले, काँग्रेसने फक्त चॉकलेट दाखवले”; फडणवीसांची टीका

ऐन लॉकडाऊनमध्ये काशिमिऱ्यात 'छमछम', मालकासह २१ जणांना अटक

By ऑनलाइन लोकमत | Published: May 09, 2021 5:13 AM

काशिमीराच्या मीरा गाव नाका येथील मानसी बारमध्ये नाचगाणी सुरू असल्याची माहिती काशिमीराचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय हजारे यांना मिळाली.

मीरा रोड : कोरोनाने हाहाकार माजवला असताना व लॉकडाऊन असतानाही काशिमीरा येथील मानसी ऑर्केस्ट्रा बारमध्ये आंबटशौकीन ग्राहकांची शनिवारी पहाटेपर्यंत मैफल रंगली होती. पोलिसांनी छापा टाकून ग्राहक व बार कर्मचारी अशा एकूण २१ जणांना अटक करून बारच्या दोन मालकांवर गुन्हा दाखल केला.काशिमीराच्या मीरा गाव नाका येथील मानसी बारमध्ये नाचगाणी सुरू असल्याची माहिती काशिमीराचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय हजारे यांना मिळाली. हजारे यांनी सहायक पोलीस निरीक्षक महेंद्र भामरे यांच्यासह राजेश पानसरे, दिनकर कोल्हे, जयदीप बडे, जयकुमार राठोड, अनिल नागरे, स्वाती देठे असे पथक शनिवारी पहाटे ३ च्या सुमारास मानसी बारवर कारवाईसाठी पाठवले. पथकाने बारच्या मागील दरवाजाने आत प्रवेश केला असता, तेथे बारबाला अश्लील नृत्य करीत होत्या, तर ग्राहक नोटा उडवत होते. पोलिसांच्या पथकास पाहून सर्वांची झिंग उतरली. बारच्या सहा कर्मचाऱ्यांसह १३ ग्राहकांना पोलिसांनी अटक केली. बारमधील सहा बारबाला व एक तृतीयपंथी यांची सुटका करण्यात आली. यापैकी चार बारबालांना एका लहानशा गुप्त खोलीत लपवून ठेवले होते. सध्या राज्यात लॉकडाऊन सुरु आहे. असे असले तरी हे डान्स बार कोणाच्या आशीर्वादाने सुरु आहेत, असा सवाल नागरिकांमधून विचारला जात आहे. 

२१ जणांविरुद्ध गुन्हा दाखल- पोलिसांनी बारचा मालक रवी शेट्टी आणि श्याम कोरडे यांनाही अटक केली असून एकूण २१ जणांविरुद्ध विविध कलमांखाली गुन्हा दाखल केला आहे. अटक केलेले ग्राहक हे मुंबईच्या विलेपार्ले, कांदिवली, अंधेरी, माटुंगा, एल्फिन्स्टन तसेच ठाणे भागातील रहिवासी आहेत. - आशिष जोशी, शैलेश झगडे, सुभाष झा, चिराग शाह, मयूर दाभोळकर, परेश मुजिंदरा, मौलिक शाह, जिग्नेश शाह, देविशंकर यादव, प्रकाश गनावत, रूपेश राठोड, भावेश पारेख, राजेश घारे अशी अटक केलेल्या ग्राहकांची नावे आहेत. बारमधून १ लाख ९१ हजारांची रोकड, दारूच्या बाटल्या पोलिसांनी जप्त केल्या. 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीdanceनृत्यPoliceपोलिस