शहरं
Join us  
Trending Stories
1
ऐतिहासिक क्षण! ३४ वर्षांनी भेटलेल्या इजरायल-लेबनॉनमध्ये १० दिवसांसाठी युद्धबंदी; राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांची यशस्वी मध्यस्थी
2
MI vs PBKS : वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन सूर्याला बाकावर बसवणार? सलग चौथ्या पराभवानंतर काय म्हणाला पांड्या?
3
नाशिक TCS प्रकरण: आरोपीचा काका म्हणतोय, 'पीडित तरुणी आणि आरोपीत प्रेमप्रकरण...'; न्यायालय आवारात गोंधळ
4
MI vs PBKS : विकेट मिळेना; त्यात सोपा झेल सोडला! जिथं प्रभसिमरन चमकला, तिथं बुमराह ‘खलनायक' ठरला
5
रात्रभर तडफडत राहिले; राष्ट्रीय विधि विद्यापीठाच्या दोन विद्यार्थ्यांचा दुर्दैवी अंत
6
"उडता पंजाब..." सरपंच साब श्रेयससह प्रभसिमरनचा जलवा; मुंबई इंडियन्सला पराभूत करत पंजाब किंग्स अव्वल
7
"आमचे सैन्य पुन्हा युद्धासाठी सज्ज, डोनाल्ड ट्रम्प यांच्या आदेशाची वाट बघतोय", अमेरिकेच्या संरक्षण मंत्र्यांचे विधान
8
MI vs PBKS : श्रेयस अय्यर झाला सुपरमॅन! Unbelievable Relay Catch सह पांड्याचा खेळ खल्लास (VIDEO)
9
"आज चाणक्य असते तर तेही थक्क झाले असते..."; महिला आरक्षण विधेयकावरून प्रियंका गांधी यांचा थेट निशाणा
10
Quinton de Kock चा मोठा धमाका! चार सामन्यांत बाकावर बसवलं; संधी मिळताच ठोकली कडक सेंच्युरी
11
"संसदेत अनेकदा राहुल गांधींची खिल्ली उडवली जाते, पण...!"; प्रियंका गांधींचा भाजपवर घणाघात
12
MI vs PBKS : पॉवर प्लेमध्ये 'सिंग इज किंग' शो! सूर्यावर ओढावली 'गोल्डन डक'ची नामुष्की
13
खळबळजनक खुलासा! पाकिस्तानने भडकवली नोएडामधील हिंसा; तंत्र बघून सुरक्षा यंत्रणा हादरल्या
14
कोणी विचारेना...! किंमत होती ५.५० लाख, मारुतीवर आठ वर्षांतच कार बंद करण्याची वेळ आली...
15
नेपाळने लादला भारतावर कर! १०० रुपयांहून अधिकच्या खरेदीवर आता द्यावा लागणार 'भंसार' कर; बालेन सरकारचा मोठा निर्णय
16
BJP मंत्र्यांच्या मुलाने पाच जणांना उडवले, उलट त्यांच्यावरच ओरडला- मी सायरन वाजवले, बाजूला का सरकला नाहीत?
17
युट्यूबवर ५ लाख व्ह्यूज आले तर बँक खात्यात किती पैसे जमा होणार? जाणून घ्या कमाईचं नेमकं गणित
18
ममता बॅनर्जींचा मोठा विजय! 'ट्रिब्यूनल'कडून क्लीन चिट मिळालेल्यांना बंगालमध्ये मतदानाचा अधिकार; सुप्रीम कोर्टाचा कलम १४२ अंतर्गत विशेष आदेश
19
कोण आहे Mayank Rawat? मुंबई इडियन्सनं एका षटकात ५ षटकार मारणाऱ्या भिडूला दिली पदार्पणाची संधी
20
भयंकरच घडलं! वाद सोडवायला गेला आणि जीव गेला; मध्यस्थी करणाऱ्याची चाकूने वार करत हत्या
Daily Top 2Weekly Top 5

नागपुरात सुरू होणार सायबर पोलिस ठाणे; पोलिस निरीक्षकांसह ७४ अधिकारी कार्यरत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 6, 2020 23:09 IST

नागपुरात गेल्या काही दिवसांपासून सायबर गुन्हेगारी कमालीची वाढली आहे. रोज नवनव्या तक्रारी पोलिसांकडे येत आहेत. गुन्हे शाखेत सायबर सेल आहे.

नागपूर : नागपुरात झपाट्याने वाढत असलेल्या सायबर गुन्हेगारीवर अंकुश बसविण्यासाठी सायबर पोलिस ठाणे मंजूर झाले आहे. पुढच्या आठवड्यात हे पोलीस ठाणे कार्यरत होऊ शकते, अशी शक्यता संबंधित अधिकाऱ्यांनी वर्तविली आहे.

नागपुरात गेल्या काही दिवसांपासून सायबर गुन्हेगारी कमालीची वाढली आहे. रोज नवनव्या तक्रारी पोलिसांकडे येत आहेत. गुन्हे शाखेत सायबर सेल आहे. मात्र सायबर सेलला स्वतंत्र अधिकार आणि मनुष्यबळ नसल्याने या गुन्ह्यांना आळा घालण्यात अडसर निर्माण झाला आहे. ते लक्षात घेऊन नागपुरात सायबर पोलीस स्टेशन सुरू करावे, अशी मागणी वजा प्रस्ताव पोलीस आयुक्त डॉ. भूषणकुमार उपाध्याय यांनी पोलीस महासंचालनालयाकडे पाठविला होता. त्याला नुकतीच मंजुरी मिळाली असून मनुष्यबळही निश्चित झाले आहे. त्यानुसार नागपूरच्या सायबर पोलिस ठाण्यासाठी ४ पोलिस निरीक्षक,  ९ सहायक निरीक्षक, ३ उपनिरीक्षक, ३ सहाय्यक उपनिरीक्षक, १२ हवलदार १५ नायक, २६ पोलीस शिपाई आणि २ वाहन चालक अशी एकूण ७४ पदे मंजूर करण्यात आली आहेत.गुन्हे शाखेतून होणार नियंत्रितगुन्हे शाखेतील एक सहाय्यक पोलीस आयुक्त या सायबर पोलिस ठाण्याला नियंत्रित करणार आहेत. त्याचप्रमाणे आर्थिक गुन्हे शाखेचे पोलिस उपायुक्त परिमंडळ अधिकारी म्हणून आणि गुन्हे शाखेचे अतिरिक्त पोलिस आयुक्त प्रादेशिक विभाग प्रमुख म्हणून या पोलिस ठाण्याच्या कारभारावर नियंत्रण ठेवणार आहेत. शहरातील ३२ ही पोलीस ठाण्याचे कार्यक्षेत्र या सायबर पोलिस ठाण्याच्या अधिकारात राहणार आहे.गुन्हे शाखेत सुरू होणार सध्या गुन्हे शाखेच्या इमारतीत सायबर शाखेचा कारभार सुरू आहे. तेथे अत्याधुनिक यंत्रणा  लावण्यात आली आहे. केवळ पोलिस ठाण्याचा फलक तेवढा लावणे बाकी आहे. हा फलक लावण्यासोबतच येथील ठाणेदार म्हणून येत्या चार ते पाच दिवसात पोलीस आयुक्त संबंधित अधिकार्‍यांची नियुक्ती करणार आहेत. पुढच्या आठवड्यात सायबर ठाण्याचा कारभार सुरू होईल, असे संबंधित पोलिस अधिकाऱ्यांनी सांगितले आहे.

टॅग्स :Policeपोलिसcyber crimeसायबर क्राइम