शहरं
Join us  
Trending Stories
1
आता मनसे काँग्रेसचे चिन्ह पंजा काढून घेणार? निवडणूक आयोगाकडे धाव, प्रकरण काय?
2
शांतीगिरी महाराजांनी शिवसेनेच्या नावाने उमेदवारी अर्ज भरला; भुजबळांची पहिली प्रतिक्रिया
3
निवडणूक आली की मोदींना महाराष्ट्र आठवला का, गुजरातला उद्योग नेताना...; काँग्रेसची टीका
4
"नरेंद्र मोदींच्या जागी राहुल गांधी पंतप्रधान असते तर..."; नेमकं काय म्हणाले आसामचे मुख्यमंत्री?
5
"माझं एक लग्न पंतप्रधान मोदींमुळे मोडलं..."! पाकिस्तानातील मुफ्तीचा दावा, व्हिडिओ व्हायरल
6
'त्यांना कशाला घेता, आम्हीच तुमच्यासोबत येतो; उद्धव ठाकरेंचा दिल्लीला फोन'; शिंदेंचा गौप्यस्फोट
7
तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंथ रेड्डींना पोलिसांनी थेट दिल्लीला बोलवले, सोबत फोनही घेऊन येण्याच्या सूचना
8
'निवडणूक आयोगाला आम्ही आदेश देऊ शकत नाही'; हायकोर्टाने फेटाळली मोंदींविरोधातील याचिका
9
Vastu Shastra: कणभर मोहरीचे मणभर फायदे; घराच्या प्रवेश द्वाराशी मोहरी ठेवा आणि वास्तु दोष घालवा!
10
तिहार जेलमधून अरविंद केजरीवाल यांची महिलांसाठी मोठी घोषणा; आतिशी यांनी दिला मेसेज
11
उदयनराजे म्हणाले, संकेत समजून घ्या! कॉलर उडवून शरद पवार सांगत आहेत की...
12
४ मे! राणेंसाठी राज ठाकरे कणकवलीत येणार; तिथेच काही वर्षांपूर्वी राज यांची कार माघारी फिरलेली
13
ठाकरेंचे 13 पैकी 5-6 आमदार शिंदेंच्या संपर्कात, खासदारही; फसलेल्या सभेवरून उदय सामंतांचा दावा
14
अमेठीमध्ये बसपाने उतरवला उमेदवार? भाजपा की काँग्रेस, कुणाचं गणित बिघडवणार?  
15
PHOTOS: IPS पदाचा राजीनामा देऊन लोकसभेच्या 'रिंगणात', सामाजिक कार्यासाठी मैदानात!
16
भाजपाकडून उज्ज्वल निकम उमेदवार; प्रकाश आंबेडकर म्हणाले, “व्यक्ती म्हणून आक्षेप...”
17
Akshaya Tritiya 2024: अक्षय्य तृतीयेच्या दिवशी लावा नवीन तुळस; होतील अगणित फायदे!
18
'महाराष्ट्राची हास्यजत्रा' फेम शिवाली परबची गगनभरारी, अभिनेत्रीने खरेदी केलं हक्काचं घर
19
फडणवीसांच्या भेटीनंतर अभिजीत पाटलांचं ठरलं?; सूचक वक्तव्याने चर्चांना उधाण
20
“तुम्ही मतांचा पाऊस पाडा, मी विकासाचा पाऊस पाडल्याशिवाय राहणार नाही”: पंकजा मुंडे

धक्कादायक! पत्नीने घरमालकासोबत संबंध ठेवण्यास दिला नकार, पती घटस्फोट देऊन झाला फरार

By ऑनलाइन लोकमत | Published: November 27, 2021 12:50 PM

UP Crime News : पीडितेच्या आरोपांनुसार, तिचा पती बऱ्याच महिन्यांपासून तिच्यावर चुकीचं काम करण्यासाठी दबाव टाकत होता आणि यासाठी तो तिला अनेकदा मारहाणही करत होता.

उत्तर प्रदेशच्या (Uttar Pradesh) मेरठमध्ये (Meerut) एका व्यक्तीने आपल्या पत्नीसोबत लाजिरवाणा प्रकार तर केलाच, त्यानंतर तिला तीन तलाकही दिला. या महिलेचं तीन वर्षाआधी लिसाडी गेट येथे राहणाऱ्या व्यक्तीसोबत लग्न झालं होतं. पत्नीच्या आरोपांनुसार, आरोपी पती घराचं भाडं माफ करण्यासाठी तिच्यावर घरमालकासोबत शारीरिक संबंध ठेवण्यासाठी दबाव टाकत होता.

भाड्याच्या बदल्यात पत्नी

पीडितेच्या आरोपांनुसार, तिचा पती बऱ्याच महिन्यांपासून तिच्यावर चुकीचं काम करण्यासाठी दबाव टाकत होता आणि यासाठी तो तिला अनेकदा मारहाणही करत होता. पीडितेने पोलिसांना दिलेल्या तक्रारीनुसार, आरोपी पती तिला म्हणाला होता की, तिने घरमालकासोबत संबंध ठेवावे, जेणेकरून घरमालक घराच्या भाड्याने थकीत पैसे माफ करेल. यानंतर पीडितेने जेव्हा यास नकार दिला तेव्हा तो तीन तलाक देऊन फरार झाला.

पीडितेची पोलिसात तक्रार

पीडिता यानंतर पोलिसांकडे गेली आणि पतीविरोधात तिने तक्रार दिली. पीडितेला दोन मुलं आहेत तर एका मुलीचा आधीच मृत्यू झाला आहे. आरोपीला नशेची लत आहे आणि त्यामुळे त्याने घरातील सगळं साहित्यही विकलं. पोलिसांनी आरोपी विरोधात तक्रार दाखल केली असून आपली चौकशी सुरू केली आहे. पोलीस महिलेच्या पतीचा शोध घेत आहेत. पीडितेने सासरच्या लोकांवरही मारहाण केल्याचा आरोप लावला आहे. 

टॅग्स :Uttar Pradeshउत्तर प्रदेशCrime Newsगुन्हेगारी