भयंकर! पत्नी नांदायला येत नाही म्हणून संतापलेल्या पतीने घराला लावली आग, 7 जण होरपळले

By ऑनलाइन लोकमत | Published: January 15, 2021 04:11 PM2021-01-15T16:11:10+5:302021-01-15T16:24:45+5:30

Crime News : पत्नीला नांदायला पाठवण्यास नकार दिल्याने नाराज झालेल्या पतीने आपली सासरचे मंडळी राहत असलेल्या घरालाच आग लावली.

Crime News son in law set home wife in fire at kanpur | भयंकर! पत्नी नांदायला येत नाही म्हणून संतापलेल्या पतीने घराला लावली आग, 7 जण होरपळले

भयंकर! पत्नी नांदायला येत नाही म्हणून संतापलेल्या पतीने घराला लावली आग, 7 जण होरपळले

Next

कानपूर - देशातील अनेक धक्कादायक घटना या सातत्याने समोर येत आहेत. अशीच एक घटना उत्तर प्रदेशच्या कानपूरमध्ये घडली आहे. पत्नी नांदायला येत नाही म्हणून संतापलेल्या पतीने तिच्या घराला आग लावल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या धक्कादायक घटनेत सात जण होरपळले असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. यातील तीन जणांचा प्रकृती अत्यंत गंभीर असल्याची माहिती मिळत आहे. पत्नी माहेरी राहत असल्याने रागाच्या भरात पतीने हे कृत्य केलं आहे. 

उत्तर प्रदेशच्या कानपूर जिल्ह्यात शुक्रवारी पहाटे ही घटना घडली आहे. पत्नीला नांदायला पाठवण्यास नकार दिल्याने नाराज झालेल्या पतीने आपली सासरचे मंडळी राहत असलेल्या घरालाच आग लावली. या आगीत सात जण होरपळले आहेत. सर्व जखमींना तातडीने उर्सला रुग्णालयात दाखल करण्यात आलं असून त्यांच्यावर सध्या उपचार सुरू आहेत. यापैकी तिघांची प्रकृती चिंताजनक आहे. मिळालेल्या माहितीनुसार, हरदोईचा रहिवासी असलेल्या मुकेशसोबत मनिषाचं लग्न झालं आहे. 

मुकेश आणि मनिषाला एक महिन्याचा मुलगा देखील आहे. मात्र पतिकडून वारंवार होणाऱ्या मारहाणीला मनिषा कंटाळली होती. त्यामुळे ती मुलासह आपल्या माहेरी राहायला आली होती. जावय मुलीला सारखा त्रास देत असल्याने तिचे वडील हिरालाल देखील त्याला कंटाळले होते. त्याच्या त्रासाला कंटाळून त्यांनी पोलीस स्टेशन गाठून तक्रार केली होती. त्यावेळी पोलिसांनी मुलीला तिच्या सासरी जायचं असल्यास पाठवून द्या किंवा तिला जायचं नसल्यास पाठवू नका असा सल्ला त्यांना दिला होता.

शुक्रवारी पहाटे चार वाजता मुकेश मनिषाच्या माहेरी पोहचला. त्याने दरवाजा उघडण्यासाठी आरडा-ओरडा केला. दरवाजा न उघडल्याने त्याने बाहेरच शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. याच दरम्यान त्याने घराच्या चारही बाजुंना पेट्रोल टाकून आग लावली. आग लागल्याचं पाहून घरात असलेल्या मंडळींनी मदतीसाठी आरडाओरडा केला, शेजाऱ्यांकडे मदत मागितली. घराबाहेर येईपर्यंत सात जण होरपळले. शेजाऱ्यांनी त्यांना उपचारासाठी तातडीने जवळच्या रुग्णालयात दाखल केले. पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. 

Web Title: Crime News son in law set home wife in fire at kanpur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.