बापरे! पोलीस अधिकाऱ्याच्या लग्नात चोरांनी मारला डल्ला; सोन्याचे दागिने, पैसे केले लंपास

By ऑनलाइन लोकमत | Published: December 8, 2021 09:54 PM2021-12-08T21:54:44+5:302021-12-08T22:06:39+5:30

Crime News : लग्नमंडपात चोरांनी डाव साधला असून अधिकाऱ्याच्या नातेवाईकांचे दागिने घेऊन ते पसार झाले आहेत.

Crime News shivpuri ips narendra singh rawat wedding thieves took away jewelry and cash amid marriage | बापरे! पोलीस अधिकाऱ्याच्या लग्नात चोरांनी मारला डल्ला; सोन्याचे दागिने, पैसे केले लंपास

बापरे! पोलीस अधिकाऱ्याच्या लग्नात चोरांनी मारला डल्ला; सोन्याचे दागिने, पैसे केले लंपास

Next

नवी दिल्ली - मध्य प्रदेशमध्ये एक धक्कादायक घटना समोर आली आहे. पोलीस अधिकाऱ्याच्या लग्नात चोरांनी डल्ला मारला आहे. सोन्याचे दागिने आणि पैसे चोरांनी लंपास केले आहेत. लग्नमंडपात चोरांनी डाव साधला असून अधिकाऱ्याच्या नातेवाईकांचे दागिने घेऊन ते पसार झाले आहेत. या घटनेने एकच खळबळ उडाली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, मध्यप्रदेशातील शिवपुरी या शहरात गेल्या काही महिन्यांपासून चोरीच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. याच दरम्यान पोलीस अधिकारी नरेंद्र सिंह रावत यांच्या लग्नामध्ये चोरांनी नवरीचे दागिने चोरी केले आहेत. 

शिवपुरी शहरातील महल कॉलनीमध्ये नरेंद्र सिंह रावत राहतात. 6 डिसेंबर रोजी त्याचा विवाहसोहळा मोठ्या थाटामाटात संपन्न झाला. ज्यावेळी स्टेजवर लग्नाचे विधी सुरू होते, त्यावेळी चोर लग्नात घुसले आणि त्यांनी वधूपक्षाच्या खोल्यांमध्ये प्रवेश केला. लग्नाचे विधी सुरू झाल्यानंतर सर्व मंडळी कार्यक्रमात व्यस्त होती. वधूकडील बहुतांश मंडळी स्टेजवर किंवा स्टेजच्या आजूबाजूला होती. या संधीचा फायदा घेत काही चोर वधू पक्षाकडे असणाऱ्या खोल्यांमध्ये शिरले.

दागिने आणि पैसे घेऊन चोर पसार 

नातेवाईकांच्या बॅगा आणि कपाटांमध्ये असणारे दागिने आणि पैसे घेऊन चोर पसार झाले. घटना लक्षात आली, तेव्हा फारच उशीर झाला होता. पोलिसांनी या घटनेची दखल घेतली असून तपास सुरू केला आहे. घटनेच्या वेळी खोलीत शिरलेल्या चोरांचे चेहरे सीसीटीव्हीत कैद झाले आहेत. त्यामुळे वर आणि वधू या दोन्ही पक्षाकडील लोक एकमेकांवर संशय घेत असल्याचं चित्र आहे. पोलिसांच्या लग्नातच चोरी होत असेल, तर सामान्य माणसाने काय करावं, असा प्रश्न सध्या विचारण्यात येत आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. 
 

Web Title: Crime News shivpuri ips narendra singh rawat wedding thieves took away jewelry and cash amid marriage

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

Open in app