Crime News: मुंबईत गर्लफ्रेंडसोबत लिव्ह-इनमध्ये राहत होता पती, इकडे पत्नीने मामाविरोधात दिली तक्रार, समोर आलं असं कारण
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 25, 2022 20:45 IST2022-03-25T20:44:35+5:302022-03-25T20:45:16+5:30
Crime News:

Crime News: मुंबईत गर्लफ्रेंडसोबत लिव्ह-इनमध्ये राहत होता पती, इकडे पत्नीने मामाविरोधात दिली तक्रार, समोर आलं असं कारण
जयपूर - राजस्थानमधील बांसवाडा येथे एका महिलेने आपल्या नातेवाईकांवर गंभीर आरोप केले आहेत. या महिलेचा पती हा मेकअप आर्टिस्ट आहे. तसेच तो पत्नी आणि तीन मुलांना सोडून मुंबईत आला. येथे तो त्याच्या गर्लफ्रेंडसोबत राहू लागला. हळूहळू या तरुणावर कुटुंबीयांकडून दबाव वाढू लागला, तेव्हा त्याने परत आलो तर आपली गर्लफ्रेंड आत्महत्या करेल, अशी भीती व्यक्त केली. दरम्यान, या अजब प्रेमकहाणीमध्ये या महिलेने तिच्या पतीसह मामा आणि चार जणांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. तक्रार मिळाल्यानंतर आता पोलीस या प्रकरणाची चौकशी करत आहे.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार महिलेने आपल्या तक्रारीत सांगितले की, तिचा पती मेकअप आर्टिस्ट आहे. २०१५ मध्ये आयोजित केलेल्या सामुहिक विवाहामध्ये त्यांचा विवाह झाला होता. हे लग्न मामाने ठरवले होते. लग्नानंतर काही वर्षे सारे काही ठिक होते. तीन मुलेही झाली. मात्र मुलांच्या जन्मानंतर पतीचं वर्तन बदललं. भांडणे होऊ लगाली. याचदरम्यान, पतीची ओळख चित्तोडगडमधील एका तरुणीशी झाली. दोघांमध्ये गाढ मैत्री झाली. हळूहळू त्यांच्यात प्रेम झाले. तसेच पती कुटुंबापासून दूर जाऊ लागला.
दरम्यान, हे नाते कायम ठेवण्यासाठी या दोघांमध्ये एक करार झाला होता. त्यानुसार पती सहा महिन्यात कुटुंबाला घेऊन मुंबईत येईल. त्यांना भेटण्यासाठी येईल. तसेच अन्य कुठल्या नात्यात राहणार नाही आणि मासिक खर्चासाठी पैसे देईल, असे ठरले. मात्र पतीने या सर्व बाबींचे उल्लंघन केले असा आरोप या महिलेने केला.
दरम्यान, त्या दोघांचे नाते मामाने जोडले होते. दुसऱ्या तरुणीसोबत पतीची भेट मामाने घालून दिली होती. त्यामुळे मामाविरोधात या महिलेने पोलिसांत तक्रार दिली आहे.