माता न तू वैरिणी! आईनेच लेकाची हत्या करून 'त्याला' घरात पुरलं; नव्या फरशीने अशी केली पोलखोल

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 16, 2021 15:22 IST2021-08-16T15:16:47+5:302021-08-16T15:22:58+5:30

Crime News : आईने आपल्या लहान मुलाच्या मदतीने मोठ्या मुलाची हत्या करून त्याचा मृतदेह हा घरामध्येच पुरला होता.

Crime News haryana rohtak blind murder case mother brother killed brother | माता न तू वैरिणी! आईनेच लेकाची हत्या करून 'त्याला' घरात पुरलं; नव्या फरशीने अशी केली पोलखोल

माता न तू वैरिणी! आईनेच लेकाची हत्या करून 'त्याला' घरात पुरलं; नव्या फरशीने अशी केली पोलखोल

नवी दिल्ली - देशात अनेक धक्कादायक घटना समोर येत आहेत. अशीच एक नात्याला काळीमा फासणारी घटना समोर आली आहे. जन्मदात्या आईनेच आपल्या लेकाची हत्या करून 'त्याला' घरातच पुरल्याची भयंकर घटना समोर आली आहे. घरातील नवीन फरशीने या धक्कादायक प्रकाराची पोलखोल झाली आहे. हरियाणाच्या रोहतकमध्ये झालेल्या ब्लाइंड मर्डरचा पोलिसांनी खुलासा केला आहे. आईने आपल्या लहान मुलाच्या मदतीने मोठ्या मुलाची हत्या करून त्याचा मृतदेह हा घरामध्येच पुरला होता. मुलगा अनेक महिन्यांपासून बेपत्ता असल्याने काही नातेवाईकांना थोडा संशय आला होता.

मुलाच्या काकाने मुलगा बेपत्ता असल्याची पोलिसांत तक्रार दाखल केल्यावर हा प्रकार समोर आला आहे. आई आणि लहान भावाला याप्रकरणी अटक करण्यात आली आहे. तसेच घरातून मृतदेह ताब्यात घेण्यात आला आहे. कर्मपाल उर्फ राहुल असं हत्या झालेल्या 22 वर्षीय मुलाचं नाव होतं. दोन ते तीन महिन्यांपूर्वी त्याची हत्या करून त्याला पुरण्यात आलं होतं. राहुल दर 15 दिवसांनी आपल्या आत्या आणि काकाच्या घरी जात असे. मात्र गेल्या दोन महिन्यांपासून तो आला नसल्याने त्यांना त्याची काळजी वाटू लागली. 

राहुलला भेटण्यासाठी ते त्याच्या घरी आले तेव्हा घरातील एका रुमला नवीन फरशी बसवण्यात आली होता. यामुळे आत्या आणि काकाला घातपाताचा संशय आला. त्यांनी मुलाच्या आईविरुद्ध तक्रार दाखल केली. त्यानंतर पोलिसांनी राहुलच्या आईला आणि भावाला अटक केली आहे. तसेच फरशी तोडून त्याचा मृतदेह बाहेर काढण्यात आला असून तो शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला आहे. पोलीस या प्रकरणचा अधिक तपास करत आहेत. घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. 

संतापजनक! आजोबांनी केलं लैंगिक शोषण; मदतीसाठी 'ती' भाऊ अन् काकाकडे गेली तर त्यांनीही केले अत्याचार

नात्याला काळीमा फासणारी घटना घडली आहे. एका कुटुंबातील आजोबा, काका आणि भावाने चिमुकलीचं लैंगिक शोषण केल्याची संतापजनक घटना घडली आहे. धक्कादायक बाब म्हणजे रात्री झोपेत असताना आजोबांनी मुलीसोबत घृणास्पद कृत्य केलं. त्यानंतर मदतीसाठी काका आणि भावाकडे गेली असता त्या दोघांनी देखील अत्याचार केल्याचं समोर आलं आहे. तामिळनाडूमध्ये ही घटना घडल्याने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. पोलिसांनी या प्रकरणात एका 62 वर्षीय व्यक्तीला अटक केली आहे. या व्यक्तीनो सात वर्षांच्या नातीचं लैंगिक शोषण केल्याचा गंभीर आरोप आहे. तसेच मुलीला मारहाण देखील करण्यात आली. मारहाण केल्या प्रकरणात मुलीचा काका आणि मुलीच्या भावालाही अटक करण्यात आली आहे. ही घटना चेन्नईजवळील मडिप्पकममध्ये घडली आहे. 

Web Title: Crime News haryana rohtak blind murder case mother brother killed brother