मर्डर मिस्ट्री! दुबईवरून सुपारी, कर्नाटकमध्ये 'तिची' हत्या अन् उत्तर प्रदेश कनेक्शन; जाणून घ्या, 'हे' भयंकर प्रकरण

By ऑनलाइन लोकमत | Published: July 29, 2021 12:13 PM2021-07-29T12:13:32+5:302021-07-29T12:17:30+5:30

Crime News : पोलिसांनी आरोपीची अधिक कसून चौकशी केली असता हा भयंकर प्रकार समोर आला आहे.

Crime News gorakhpur murderer arrested dubai karnataka woman murder | मर्डर मिस्ट्री! दुबईवरून सुपारी, कर्नाटकमध्ये 'तिची' हत्या अन् उत्तर प्रदेश कनेक्शन; जाणून घ्या, 'हे' भयंकर प्रकरण

मर्डर मिस्ट्री! दुबईवरून सुपारी, कर्नाटकमध्ये 'तिची' हत्या अन् उत्तर प्रदेश कनेक्शन; जाणून घ्या, 'हे' भयंकर प्रकरण

Next

नवी दिल्ली - उत्तर प्रदेशच्या गोरखपूरमध्ये एक हैराण करणारी घटना घडली आहे. एका व्यक्तीने थेट दुबईवरून आपल्या पत्नीच्या हत्येची सुपारी दिली आहे. पत्नीच्या चारित्र्यावर संशय असल्याने त्याने हे टोकाचं पाऊल उचलल्याची माहिती मिळत आहे. त्याने दुबईवरून ऑनलाईन सुपारी दिली आणि त्यानंतर भारतात पत्नीची हत्या करण्यात आली आहे. हत्या करणारा आरोपी हा गोरखपूरचा रहिवासी आहे पण त्याने कर्नाटकमध्ये हत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. कर्नाटकपोलिसांनी गोरखपूर येथून स्वामीनाथ याला काही दिवसांपूर्वी अटक केली. 

पोलिसांनी आरोपीची अधिक कसून चौकशी केली असता हा भयंकर प्रकार समोर आला आहे. गोरखपूरचे वरिष्ठ पोलीस अधीक्षक दिनेश कुमार यांनी दिलेल्या माहितीनुसार, स्वामीनाथ दुबईमध्ये पेंट पॉलिशचं काम करत होता. तिथे त्याची मैत्री एका व्यक्तीसोबत झाली. त्याने स्वामीनाथ याला याबाबत सुपारी दिली होती. दुबईमध्ये राहणाऱ्या व्यक्तीने ऑनलाईन आपल्या पत्नीच्या हत्येची सुपारी दिली आणि त्यासाठी स्वामीनाथच्या अकाऊंटमध्ये तब्बल पाच लाख पाठवले आणि त्यानंतर या हत्येचा थरार पाहायला मिळाला. या घटनेने परिसरात खळबळ निर्माण झाली आहे. 

स्वामीनाथ आपल्या मुंबईच्या एका मित्रासह कर्नाटकमध्ये पोहोचला. पार्सलवाला म्हणून त्याने त्या महिलेच्या घरात प्रवेश केला. तिथेच त्याने गळा दाबून महिलेची हत्या केली. महिलेच्या शरीरावर असलेले सर्व दागिने काढून घेतले आणि बाहेरून दरवाजा लॉक करून घेतला. कर्नाटक पोलिसांनी अधिक तपास केला असता महिलेच्या पतीच्या अकाऊंटचे डिटेल्स मिळाले. सध्या पोलिसांनी हत्या करणाऱ्या स्वामीनाथला अटक केली आहे. तर दुबईतील पतीबाबत माहिती घेण्यात येत असून लवकरच त्याला देखील अटक करण्यात येऊ शकते. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. 

सैराटची पुनरावृत्ती! वाढदिवसाच्या बहाण्याने घरी बोलावून अपहरण करत वडिलांनीच केली लेकीची हत्या

हरियाणामध्ये नात्याला काळीमा फासणारी एक घटना घडली आहे. सैराटची पुनरावृत्ती झाली आहे. प्रेम विवाहामुळे नाराज झालेल्या एका वडिलांनी संतापाच्या भरात आपल्या मुलीची निर्घृण हत्या केली आहे. वाढदिवसाच्या बहाण्याने तिला घरी बोलावून अपहरण करत वडिलांनी मुलीची हत्या केल्याची भयंकर घटना उघड झाली आहे. सोनीपतमधील या घटनेने एकच खळबळ उडाली आहे. आरोपी वडिलांनी मुलीच्या हत्येनंतर तिचा मृतदेह मेरठजवळील एका कालव्यात फेकून दिला आहे. अखेर आरोपीला अटक करण्यात पोलिसांनी यश आलं आहे. राई पोलीस ठाण्याच्या क्षेत्रातील मुकीमपूर येथील ही धक्कादायक घटना आहे. तरुणीचा मृत्यूपूर्वीचा एक व्हिडीओ आता समोर आला आहे, ज्यात ती म्हणत आहे की तिचा मृत्यू झाल्यास याला जबाबदार तिचे वडील, भाऊ आणि मित्र असतील. पोलिसांनी याप्रकरणी मुलीच्या वडिलांना अटक केली आहे. 

Web Title: Crime News gorakhpur murderer arrested dubai karnataka woman murder

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

Open in app