भयंकर! गर्लफ्रेंडला भेटणं जीवावर बेतलं, तिच्या कुटुंबीयांनी चोर समजून धू-धू धुतलं; तरुणाचा मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 14, 2021 10:07 IST2021-08-14T09:59:08+5:302021-08-14T10:07:08+5:30

Crime News : तरुण रात्री आपल्या गर्लफ्रेंडला भेटण्यासाठी तिच्या घरी गेला होता. मात्र येथे चोर समजून त्याला गर्लफ्रेंडच्या वडिलांसह स्थानिकांनी बेदम मारहाण केली.

Crime News gorakhpur lover who went to meet girlfriend was killed girls family members were accused of murder | भयंकर! गर्लफ्रेंडला भेटणं जीवावर बेतलं, तिच्या कुटुंबीयांनी चोर समजून धू-धू धुतलं; तरुणाचा मृत्यू

भयंकर! गर्लफ्रेंडला भेटणं जीवावर बेतलं, तिच्या कुटुंबीयांनी चोर समजून धू-धू धुतलं; तरुणाचा मृत्यू

नवी दिल्ली - गर्लफ्रेंडला भेटणं एका तरुणाला चांगलंच महागात पडलं असून त्याने जीव गमावला आहे. मुलीच्या कुटुंबीयांनी चोर त्याला समजून बेदम मारहाण केली आहे. यामध्ये तरुणाचा मृत्यू झाला आहे. मारहाणीनंतर तरुणाला उपचारासाठी तातडीने जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आलं. पण उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत असून मुलीच्या वडिलांना अटक करण्यात आली आहे. मुलीच्या कुटुंबीयांनी पोलिसांना घरामध्ये चोर शिरल्याची माहिती दिली होती. मात्र अधिक चौकशीनंतर हे प्रेमप्रकरण असल्याचं समोर आलं. 

मिळालेल्या माहितीनुसार, तरुण रात्री आपल्या गर्लफ्रेंडला भेटण्यासाठी तिच्या घरी गेला होता. मात्र येथे चोर समजून त्याला गर्लफ्रेंडच्या वडिलांसह स्थानिकांनी बेदम मारहाण केली. घटनास्थळी पोलीस दाखल झाल्यानंतर त्यांनी तरुणाची सुटका केली व त्याला रुग्णालयात दाखल केलं. त्याला इतकी मारहाण करण्यात आली होती की यातच त्याचा मृत्यू झाला. मृत तरुणाच्या कुटुंबीयांनी हत्येचा गंभीर आरोप केला आहे. पोलिसांनी मुलीचे वडील, भाऊ आणि अन्य 8 ते 10 लोकांविरोधात तक्रार दाखल केली आहे. तरुणाच्या वडिलांना याबबात पोलिसांना महत्त्वाची माहिती दिली आहे. 

"गौतम सिंह असं या 20 वर्षीय तरुणाचं नाव होतं. तो कामानिमित्ता त्या ठिकाणी गेला होता. त्यावेळी परशुराम यादव आणि त्यांचा मुलगा आकाश यादव आणि परिसरातील आठ ते दहा जणांनी गौतमला बेदम मारहाण केली. याची माहिती मिळताच आम्ही तातडीने त्याठिकाणी पोहोचलो तेव्हा गौतमला काही लोक चोर चोर असं म्हमून बेदम मारहाण करत होते. त्यानंतर लगेचच पोलिसांना याबाबत माहिती देण्यात आली" अशी माहिती तरुणाच्या वडिलांनी पोलिसांना दिली आहे. 

पोलिसांनी प्राथमिक तपासाबाबत सांगितलं की, मृत तरुणाचं परशुराम यादव यांच्या मुलीसोबत प्रेमप्रकरण होतं. रात्री उशीरा तो गर्लफ्रेंडला भेटण्यासाठी तिच्या घरी पोहोचला होता. मात्र त्याला चोर समजून मुलीच्या वडिलांनी मारहाण केली. त्यांनी आरडाओरडा केल्यानंतर परिसरातील लोक जमा झाले व त्यांनीही तरुणाला मारहाण केली. पोलिसांना याबाबत कळताच ते घटनास्थळी दाखल झाले व जखमी तरुणाला रुग्णालयात दाखल करण्यात आलं मात्र गंभीर जखमी झालेल्या तरुणाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. 

Web Title: Crime News gorakhpur lover who went to meet girlfriend was killed girls family members were accused of murder