शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्धभागात १०,००० हून अधिक कर्मचारी! टाटा समूहाच्या ३० कंपन्यांच्या सीईओंना तयार राहण्याचे आदेश
2
पाकव्याप्त काश्मीर लवकरच भारतात समाविष्ट होणार; AIIO चे मुख्य इमाम उमर इलियासी यांची भविष्यवाणी
3
इराणकडून आखाती देशांच्या तोंडचं पाणी पळवण्याची तयारी, पाणी आणि गॅस प्रकल्पांवर हल्ले, नव्या चालीमुळे खळबळ
4
बच्चू कडूंनी रचला खुनाचा कट? आमदार प्रवीण तायडेंचा ऑडिओ क्लिपसह खळबळजनक दावा
5
SIP की एकरकमी गुंतवणूक? १ कोटींचा टप्पा गाठण्यासाठी सर्वात सोपा मार्ग कोणता? पाहा गणित
6
Chanakya Niti: शून्यातून विश्व निर्माण करायचंय? आचार्य चाणक्यांचे 'हे' १० विचार तुम्हाला नक्कीच दिशा देतील
7
९० दिवसांत २८ मृत्यू, मग पुजाऱ्याने दिला 'असा' सल्ला, संपूर्ण गाव झाला रिकामी, आता...  
8
काँग्रेस नेते राजेंद्र भारती यांची आमदारकी रद्द! २७ वर्षांपूर्वीचे प्रकरण काय, ज्यामुळे गमावले विधानसभा सदस्यत्व?
9
FASTag Annual Pass: "पैसे वाया घालवू नका! 'या' हायवेवर आता FASTag वार्षिक पास चालणार नाही; नवीन यादी जाहीर
10
आई वडिलांना न सांभाळणाऱ्या कर्मचाऱ्यांची खैर नाही; १५% पगार कापणार, तेलंगणा सरकारचा निर्णय
11
पगार झाला की खिशाला 'कात्री'? महिनाअखेरची ओढताण टाळण्यासाठी 'हे' ५ आर्थिक मंत्र नक्की पाळा
12
PSL 2026: भर मैदानात डेव्हिड वॉर्नर- मोईन अली यांच्यात तू-तू मैं-मैं; व्हिडीओ व्हायरल, नेमकं काय घडलं?
13
होर्मुझच्या 'टोलनाक्या'वरच अमेरिकेचा सर्जिकल स्ट्राईक! इराणच्या केशम बेटावर दणादण बॉम्बवर्षाव; सॅटेलाईट फोटोंनी फुटले भांडे
14
"मी झोपलेले, तो माझ्या खोलीत आला"; अब्रू वाचवण्यासाठी अभिनेत्रीने इमारतीतून मारली उडी
15
Amit Shah Helicopter: अमित शाहांच्या हेलिकॉप्टरमध्ये उतरत असतानाच तांत्रिक बिघाड, प्रचारसभा रद्द 
16
पार्शियन आखातात अडकलं जग, दक्षिण सुदानमध्ये भारतीयांची जबरदस्त कामगिरी: UN ने केले कौतुक
17
इनकम टॅक्स रिटर्न भरण्याची प्रक्रिया कधी सुरू होईल? ITR-1 फॉर्ममध्ये मोठा बदल? तुमच्यासाठी कोणता?
18
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
19
IPL 2026: आयपीएलमध्ये रिंकू सिंहनं इतिहास घडवला, आंद्रे रसेलसह स्टार क्रिकेटपटूंना टाकलं मागं! 
20
अन्नामलाईंना उमेदवारी नाकारली, तामिळनाडूत भाजपाचा धक्कादायक निर्णय, कारण काय? 
Daily Top 2Weekly Top 5

Crime News :'दृश्यम' स्टाईल बनाव फसला! सख्ख्या भावाची चाकू खुपसून हत्या; बुलढाण्यातील धक्कादायक घटना

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 6, 2026 13:45 IST

मिळालेल्या माहितीनुसार, मृतक देविदास महादेव गायकी (वय २८) हा ५ मार्च रोजी दुपारी ३ वाजेच्या सुमारास मित्रासह दारू पिऊन घरी आला होता.

बुलढाणा- खामगाव तालुक्यातील सुटाळा बुद्रुक येथे ५ मार्च रोजी कौटुंबिक वादातून एका तरुणाची त्याच्याच लहान भावाने हत्या केल्याची घटना घडली. दारू पिऊन आलेल्या मोठ्या भावाच्या मित्राला घरी जाण्यास सांगितल्याच्या किरकोळ कारणावरून हा वाद विकोपाला गेला होता.

मिळालेल्या माहितीनुसार, मृतक देविदास महादेव गायकी (वय २८) हा ५ मार्च रोजी दुपारी ३ वाजेच्या सुमारास मित्रासह दारू पिऊन घरी आला होता. लहान भाऊ मंगेश महादेव गायकी (वय २५) याने देविदासच्या मित्राला 'घरी जा' असे म्हटल्याने दोन्ही भावांमध्ये जोरदार भांडण सुरू झाले.

कर्नाटक सरकारचा मोठा निर्णय: 16 वर्षांखालील मुलांना सोशल मीडिया वापरण्यास बंदी

या वादात देविदासने मंगेशच्या डोक्यात हातातील कडे मारले. यामुळे संतप्त झालेल्या मंगेशने घरातील भाजी कापण्याच्या चाकूने देविदासच्या पोटात आणि कुशीत वार केले, या हल्ल्यात देविदासचा मृत्यू झाला.

पोलिसांची दिशाभूल करण्याचा 'दृश्यम' स्टाईल प्रयत्न

घटनेनंतर आरोपी आणि त्याच्या आई वडिलांनी पोलिसांना गुंगारा देण्यासाठी बनाव रचला होता. आईने सुरुवातीला "कोण्या अज्ञात व्यक्तीने वार केले" अशी माहिती देऊन पोलिसांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला.

शिवाजीनगर पोलीस ठाण्याचे सुरेंद्र अहेरकर यांनी रात्री २ वाजता घराची झडती घेतली असता, कुटुंबाकडून 'दृश्यम' चित्रपटाप्रमाणे बनावट घटनाक्रम मांडला जात होता.

पोलिसांना संशय आल्याने त्यांनी वडील आणि लहान भाऊ मंगेश यांना ताब्यात घेतले. पहाटेच्या सुमारास कसून चौकशी केल्यावर मंगेशने आपला गुन्हा कबूल केला.

कायदेशीर कारवाई

शिवाजीनगर पोलिसांनी आरोपी मंगेश गायकी विरुद्ध भारतीय न्याय संहिता कलम १०३(१) आणि ३५२ अन्वये गुन्हा दाखल करून त्याला अटक केली आहे. सध्या सहाय्यक पोलीस निरीक्षक मंदार पुरी या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.

English
हिंदी सारांश
Web Title : 'Drishyam' plot fails: Brother stabs brother to death in Buldhana.

Web Summary : In Buldhana, a man was stabbed to death by his brother after a drunken argument. The family attempted to mislead police with a 'Drishyam'-style cover-up, but the brother confessed. He has been arrested; investigation ongoing.
टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस