शहरं
Join us  
Trending Stories
1
'त्या' ५ जागांबाबत राजनाथ सिंह आणि शरद पवारांमध्ये फोनवरून चर्चा; प्रकाश आंबेडकरांचा दावा
2
पवार वि. पवार वादाला मतदार कंटाळला; बारामतीत टक्का घसरला
3
आजचे राशीभविष्य - ८ मे २०२४; धन - मान - सन्मान मिळतील, सरकार कडून फायदा होईल
4
ऐन लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर भाजप सरकार कोसळणार? हरयाणामध्ये तीन अपक्ष आमदारांनी काढला पाठिंबा
5
तीन ईव्हीएम जाळण्याचा प्रयत्न; तरुणावर गुन्हा दाखल; सोलापूर जिल्ह्यातील बागलवाडी येथील बूथवरील प्रकार
6
‘सेक्स स्कँडल’च्या २५,००० पेन ड्राइव्हचे पोलिसांनीच वाटप केले; कुमारस्वामी यांचा आरोप, मोदीही प्रथमच बोलले
7
अरविंद केजरीवाल यांना जामीन देण्यास सुप्रीम कोर्ट अनुकूल; पण...
8
'तुला सहानंतर कोण आहे? बारामतीचा कोण येत नाही'; आमदार दत्ता भरणेंची शरद पवार गटाच्या कार्यकर्त्याला शिवीगाळ
9
मतदानाच्या दिवशी बारामतीत नात्यांचा ट्विस्ट, सुप्रिया सुळेंनी घेतली अजित पवारांच्या आईची भेट; तर अजित पवार म्हणाले... मेरी माँ मेरे साथ है!
10
‘मुस्लीम आरक्षण’ नवा मुद्दा; प्रचारात होतोय वारंवार उल्लेख, मोदींच्या जाळ्यात विरोधक अडकले
11
१० लाख इनाम असलेल्या बासित दारसह ४ अतिरेकी चकमकीत ठार
12
४ जून ‘इंडिया आघाडी’ची एक्स्पायरी डेट : पंतप्रधान मोदी 
13
घराण्याचा वारसा जिंकणार की नव्या चेहऱ्याला कौल मिळणार? विखे-लंके लढत : महसूलमंत्र्यांची प्रतिष्ठा पणाला
14
‘बंगाली प्राइड’वर अन् विकास-अराजकतेमध्ये संघर्ष; दक्षिण बंगालच्या जागांवर तृणमूलची मदार
15
डाॅक्टरांच्या मनाईनंतरही धोनी खेळतोय आयपीएल; याच्या मांसपेशी फाटल्या
16
दिल्लीच्या प्ले ऑफच्या आशा कायम; राजस्थानचा २० धावांनी पराभव; संजू सॅमसनची अपयशी झुंज
17
बीअर शॉपीच्या परवान्यासाठी लाच; उत्पादन शुल्क अधीक्षकासह तीन अधिकारी जाळ्यात
18
‘मॅट’ने केले राज्य सरकारचे पोस्टमार्टेम; वैद्यकीय शिक्षण संचालकांची नियुक्ती तत्काळ संपुष्टात आणण्याचे आदेश; नवीन संचालक नेमा
19
उपनगरांतील मतदार दिलदार, शहरात कंजुषी; मुंबईतील सर्व मतदारसंघांचे आकडे काय सांगतात...
20
दौडा दौडा... भागा भागा सा... प्रचार करताना दमछाक

धक्कादायक! भाजपा नेत्याची गोळ्या घालून हत्या, गेल्या 8 दिवसांत हत्येच्या 7 घटनांनी खळबळ

By ऑनलाइन लोकमत | Published: April 03, 2021 4:24 PM

BJP Brijesh Singh Murder : गेल्या आठ दिवसांत हत्येच्या तब्बल सात घटना घडल्याने दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

गोरखपूर - उत्तर प्रदेशमध्ये एक भयंकर घटना समोर आली आहे. भाजप नेत्याची गोळ्या घालून हत्या करण्यात आली आहे. धक्कादायक बाब म्हणजे गेल्या 8 दिवसांत तब्बल हत्येच्या 7 घटना घडल्या आहेत. गोरखपूरमधील भाजपचे नेते आणि ग्रामपंचायत निवडणूक लढवण्याच्या तयारीत असलेले माजी सरपंच बृजेश सिंह (BJP Brijesh Singh) यांची गोळ्या घालून हत्या करण्यात आली. हत्येच्या वाढत्या घटनांमुळे पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. 

गेल्या आठ दिवसांत हत्येच्या तब्बल सात घटना घडल्याने गोरखपूरमध्ये दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे. पोलिसांनी या प्रकरणी आतापर्यंत दोन आरोपींना अटक केली असून अधिक तपास सुरू असल्याची माहिती मिळत आहे. मिळालेल्य़ा माहितीनुसार, गुलरिहा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील नारायणपूर गावातील बृजेश सिंह यांची शुक्रवारी रात्री दुचाकीवरून आलेल्या गुंडांनी गोळ्या घालून हत्या केली. ते निवडणूक प्रचार करून आपल्या गावातून गोरखपूरला परत जात होते. 

बृजेश सिंह हे गावाचे माजी सरपंच आणि भाजपचे सेक्टर प्रभारी होते. गावात प्रचार उरकून रात्री 11 वाजता ते गोरखपूर शहरातील आपल्या निवासस्थानी जात होते. त्याचदरम्यान गावाबाहेरच दबा धरून बसलेल्या दुचाकीस्वारांनी त्यांच्यावर गोळ्या झाडल्या. या घटनेची माहिती मिळताच खळबळ निर्माण झाली. घटनास्थळी मोठ्या संख्येने त्यांचे समर्थक आणि. कुटुंबीयही दाखल झाले. उपचारांसाठी त्यांना तातडीने जवळच्या रुग्णालयात नेण्यात आले मात्र डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.

दोन दिवसांपूर्वीच जमिनीवरून प्रॉपर्टी डीलरसोबत वाद झाला होता. त्यामुळे त्या दिशेनेही तपास सुरू आहे. पोलिसांनी या प्रकरणी सुनील श्रीवास्तव आणि रामसमुझ या दोघांना अटक केली आहे. तर अन्य दोघांचा शोध घेतला जात आहे. गोरखपूरमध्ये गेल्या आठ दिवसांत सात हत्येच्या घटना घडल्या आहेत. त्यामुळे गोरखपूरमध्ये भीतीचे वातावरण आहे. गोरखपूर जिल्हा प्रशासन आणि पोलीस गुन्हेगारी घटना रोखण्यासाठी प्रयत्न करत आहेत. मात्र, तरीही हत्यांच्या घटना घडत आहेत. त्यामुळे त्यांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहेत. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. 

टॅग्स :BJPभाजपाUttar Pradeshउत्तर प्रदेशGorakhpurगोरखपूरPoliceपोलिसFiringगोळीबारDeathमृत्यूCrime Newsगुन्हेगारी