Crime: भयंकर! १८ वर्षीय तरुणीचा सुटकेसमध्ये सापडला मृतदेह, पोलिसांनी काय सांगितले?

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 21, 2025 18:06 IST2025-05-21T18:04:50+5:302025-05-21T18:06:30+5:30

Crime News: बंगळुरूमधील एका रेल्वे स्टेशन उड्डाणपुलाजवळ एक सुटकेस मिळाली. यात अंदाजे १८ वर्ष वय असलेल्या एका तरुणाचा मृतदेह आढळून आला.

Crime: Horrible! The body of an 18-year-old girl was found in a suitcase, what did the police say? | Crime: भयंकर! १८ वर्षीय तरुणीचा सुटकेसमध्ये सापडला मृतदेह, पोलिसांनी काय सांगितले?

Crime: भयंकर! १८ वर्षीय तरुणीचा सुटकेसमध्ये सापडला मृतदेह, पोलिसांनी काय सांगितले?

रेल्वे उड्डाण पूलाजवळ सुटकेस बॅग पडलेली होती. ही सुटकेस संशयास्पद वाटल्याने तिची माहिती पोलिसांना दिली गेली. पोलिसांनी जेव्हा सुटकेस उघडली, तेव्हा त्यात एका तरुणाची मृतदेह होता. दक्षिण बंगळुरूतील जुना चंदनपुरा रेल्वे उड्डाण पूलाजवळ ही घटना घडली. या प्रकरणी पोलिसांनी आता तपास सुरू केला आहे.   

'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!

जुना चंदनपुरा रेल्वे उड्डाण पूलावर रेल्वे रुळा शेजारी एक सुटकेस बॅग सापडली. या बॅगेत एका तरुणीचा मृतदेह होता. तरुणीचे वय अंदाजे १८ वर्ष आहे, असे पोलिसांनी सांगितले. 

धावत्या ट्रेनमधून फेकली सुटकेस बॅग

होसूर मुख्य रस्त्याला लागून असलेल्या रेल्वे रुळाजवळच ही बॅग पडलेली होती. प्राथमिक तपासातून असे समोर आले की, आरोपीने मृतदेह सुटकेसमध्ये टाकला आणि त्यानंतर ही सुटकेस धावत्या रेल्वे गाडीतून फेकून दिली.

वाचा >>तुझ्या बापाला भिक लागली काय, मी तुला फुकट पोसणार काय ? शशांकने मागितले होते 2 कोटी 

सूर्यानगर पोलिसांनी घटनास्थळाची पाहणी केली. सुटकेस आणि सुटकेसमधील तरुणीची ओळख पटल्यानंतर तपासाला अधिक गती येईल, असेही सूत्रांनी सांगितले. 

पोलिसांनी काय सांगितले?

बंगळुरू ग्रामीणचे पोलीस अधीक्षक सीके बाबा म्हणाले, 'प्रथम दर्शनी असे दिसतेय की, सुटकेस धावत्या रेल्वे गाडीतून फेकण्यात आली. साधारणतः असे गुन्हे रेल्वे पोलिसांच्या अखत्यारित येतात, पण ही घटना आमच्या हद्दीत घडली आहे. त्यामुळे आम्हीही या तपासात सहभागी झालो आहोत. मयत तरुणीची ओळख अजून पटायची आहे. कारण बॅगेत तिचे ओळख पत्र किंवा इतर काहीही सापडलेलं नाही.'

सुटकेसची तपासणी केली जात असून, पोलिसांनी मयत तरुणीची ओळख पटवण्याच्या दृष्टीने तपास सुरू केला आहे. 

काही दिवसापूर्वी एका मुलीचा रेल्वे रुळाजवळ सापडला होता मृतदेह

काही दिवसांपूर्वी म्हणजे १२ मे रोजी १४ वर्षाच्या मूक आणि कर्णबधीर मुलीचा मृतदेह कर्नाटकातीलच रामनगर भागात सापडला होता. 

मुलीचा मृतदहे रेल्वे रुळाजवळ पडलेला होता. या प्रकरणातही पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपास सुरू केलेला आहे. दरम्यान, मयत मुलीच्या कुटुंबीयांची कर्नाटकचे मुख्यमंत्री डीके शिवकुमार यांनी भेट घेऊन सात्वंन केले. 

Web Title: Crime: Horrible! The body of an 18-year-old girl was found in a suitcase, what did the police say?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.