Crime: ट्यूशनसाठी गेली, नंतर तुकड्या-तुकड्यांमध्ये मिळाला मुलीचा मृतदेह; आईवडिलांचा आक्रोश, शिक्षकानेच...

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 18, 2025 09:26 IST2025-09-18T09:25:04+5:302025-09-18T09:26:00+5:30

Student killed by teacher : ट्यूशनसाठी मुलगी घरातून बाहेर पडली, पण घरी परतलीच नाही. आईवडिलांनी बेपत्ता झाल्याची तक्रार दिली. पोलिसांनी तपास सुरू केला आणि अखेरीस जे समोर आले, त्याने पोलिसही हादरले. 

Crime: Girl's body found in pieces after going for tuition; Parents' outcry, teacher... | Crime: ट्यूशनसाठी गेली, नंतर तुकड्या-तुकड्यांमध्ये मिळाला मुलीचा मृतदेह; आईवडिलांचा आक्रोश, शिक्षकानेच...

Crime: ट्यूशनसाठी गेली, नंतर तुकड्या-तुकड्यांमध्ये मिळाला मुलीचा मृतदेह; आईवडिलांचा आक्रोश, शिक्षकानेच...

Teacher Killed student crime news : २० दिवसांपूर्वी म्हणजे २८ ऑगस्टला मुलगी घरून ट्यूशनसाठी गेली. पण, ती परत आलीच नाही. आईवडिलांनी चौकशी केली, तेव्हा ती ट्यूशनलाही आली नसल्याचे कळले आणि ते हादरले. त्यानंतर पोलिसांत तक्रार करण्यात आली. पोलिसांनी शोध सुरू केला आणि तिची हत्या झाल्याचे तपासाअंती समोर आले. घरातून बाहेर पडलेल्या मुलीच्या मृतदेहाचे तुकडेच घरी आले. मुलीची हत्या शिक्षकानेच केल्याचे तपासात आढळून आले. पोलिसांनी त्याला अटक केली असून, न्यायालयाने त्याला पोलीस कोठडी सुनावली आहे. 

'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!

पश्चिम बंगालमधील बीरभूमी जिल्ह्यात ही हादरवून टाकणारी घटना घडली आहे. हत्या करण्यात आलेली मुलगी रामपूरहाट परिसरात आईवडिलांसोबत राहते. श्यामपहाडी येथील शाळेत ती शिक्षण घेत होती. 

शाळा सुटल्यानंतर ती घरी यायची आणि नंतर ट्यूशनला जात होती. २८ ऑगस्ट रोजी नेहमीप्रमाणे ती ट्यूशनसाठी घरातून बाहेर पडली होती. पण, परत आलीच नाही. 

शिक्षकानेच मुलीचे अपहरण केले

मागील २० दिवसांपासून मुलगी बेपत्ता होती. तक्रार दाखल झाल्यानंतर पोलिसांनी तिचा शोध सुरू केला. तेव्हा शाळेतीलच मनोज कुमार पाल या शिक्षकाने तिचे अपहरण केल्याचे तपासातून समोर आले. पोलिसांनी लगेच शिक्षकाला अटक केली. 

हत्या करून मृतदेहाचे तुकडे केले आणि पाण्यात फेकले

पोलिसांनी शिक्षकाची चौकशी करत असतानाच पोलिसांकडून तिचा शोधही सुरू होता. रामपूरहाटमधीलच कालीडांगा गावात असलेल्या एका तलावात मृतदेहाचे तुकडे आढळून आले. हे तुकडे बेपत्ता विद्यार्थिीनेच असल्याचे निष्पन्न झाले. 

मुलीचा मृतदेह तुकड्या तुकड्यांमध्ये मिळाल्यानंतर पोलिसांनी शिक्षकावर अपहरणाबरोबरच हत्येचा गुन्हाही दाखल केला. शिक्षकाने बलात्कार करून तिची हत्या केली का? याचा तपासही पोलीस करत आहेत. 

मृतदेहाचे तुकडे सडायला लागलेले

पोलिसांनी तलावात शोध घेतला तेव्हा मुलीच्या मृतदेहाचे अनेक तुकडे मिळाले. अनेक दिवसांपूर्वी हत्या करून तुकडे पाण्यात फेकले गेले होते. त्यामुळे ते सडू लागले होते. शिक्षकाने मुलीची हत्या का केली आणि हत्या करण्यापूर्वी तिच्यावर अत्याचार करण्यात आले होते का? याचाही तपास पोलीस करत आहे. मृतदेहाचे तुकडे सडलेले असल्याने तपासणी करण्यात अडथळे येत असल्याचे पोलिसांनी सांगितले. 

Web Title: Crime: Girl's body found in pieces after going for tuition; Parents' outcry, teacher...

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.