शहरं
Join us  
Trending Stories
1
अरविंद केजरीवालांना ठीक निवडणुकीपूर्वी का अटक केले? सुप्रीम कोर्टाचा ED ला थेट सवाल...
2
वैद्यकीय तज्ज्ञांकडून दिलासा! 'कोविशिल्ड' घेतलेल्यांनी चिंता करू नये; टीटीएस आजार होणे ही दुर्मीळ घटना
3
भाजपचा नवा गेमप्लान, टप्प्यानुसार वेगळे मुद्दे ! कमी मतदानानंतर चिंता वाढली; प्रचाराची नव्याने आखणी
4
महाविकास आघाडीचे मुंबईत 'मराठी कार्ड' सर्व सहाही उमेदवार मराठी; महायुतीकडून चार मराठी
5
भयंकर : प्रसूतीवेळी वीज गेली, टॉर्चच्या प्रकाशात सिझर; बाळासह आईचा मृत्यू
6
लखपतीचे झाले करोडपती पण, उमेदवाराकडे "ना बंगला, ना गाडी"
7
Controversial Decision? आयुष बदोनीची विकेट वादात अडकली, KL Rahul संतापला, MI च्या बाजूने झुकवलेला सामना, Video 
8
लखनौ सुपर जायंट्सचा विजय! Mumbai Indians प्ले ऑफसाठी आता दुसऱ्यांवर अवलंबून  
9
एका महिन्यानंतर पाऊसच पाऊस, भारतासह या शेजारील देशांनाही मिळणार दिलासा
10
आघाडीच्या फलंदाजांनी शस्त्र टाकल्यानंतर...! हार्दिक पांड्याचा रोख रोहित शर्माकडे? म्हणाला... 
11
भाजपच्या पीयूष गोयल यांच्याविरोधात भूषण पाटील; काँग्रेसकडून राज बब्बर यांनाही उमेदवारी...
12
₹42 च्या शेअरवर गुंतवणूकदारांची झुंबड, लागलं 20% चं अप्पर सर्किट; जपानमधून मिळाली आहे मोठी ऑर्डर!
13
मालेगाव ब्लास्ट प्रकरण : आरोपी समीर कुलकर्णी यांना सर्वोच्च न्यायालयाकडून मोठा दिलासा, खटल्याला स्थगिती
14
राशिद खानच्या नेतृत्वाखाली अफगाणिस्तान ट्वेंटी-२० वर्ल्ड कप खेळणार, युवा खेळाडूंना संधी 
15
गडचिरोली सीमेवर चकमक; १० नक्षलवाद्यांचा खात्मा 
16
Video: पाळीव कुत्र्याचा सहा वर्षीय चिमुकलीवर हल्ला; धक्कादायक व्हिडिओ व्हायरल...
17
आनंदाची बातमी...! ₹75000 पार जाणाऱ्या Gold Price मध्ये पुन्हा मोठी घसरण, पटा-पट चेक करा सोन्या-चांदीचा लेटेस्ट रेट 
18
देशात फक्त मोदी पॅटर्न चालतो, बाकी सगळे भंगारात; एकनाथ शिंदेंचा विरोधकांवर प्रहार
19
BANW vs INDW: भारताचा झंझावात कायम; पावसाची 'बॅटिंग' अन् बांगलादेशचा सलग दुसरा पराभव
20
दुर्दैवी! प्रसूती दरम्यान 'बत्ती गूल'; टॉर्चच्या प्रकाशात सिझर, पण बाळासह आईचा मृत्यू

भाजपा आमदार संगीता ठोंबरे आणि त्यांच्या पती विरोधात गुन्हा दाखल करण्याचे कोर्टाचे आदेश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 11, 2019 6:37 PM

आमदार ठोंबरे आणि त्यांचे पती डॉ.विजप्रकाश ठोंबरे यांच्या विरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्याचे कोर्टाचे आदेश

ठळक मुद्देबनावट दस्तऐवज तयार करून फसवणूक लोकनेते गोपीनाथ मुंडे मागासवर्गीय सहकारी सूतगिरणी फसवणूक प्रकरण

केज (बीड ) : लोकनेते गोपीनाथ मुंडे मागासवर्गीय सहकारी सूतगिरणी प्रकरणात कथीत संचालक गणपती सोनाप्पा कांबळे यांच्या बनावट स्वाक्षऱ्या करून संचालक पदावर नियुक्ती केल्याप्रकरणी तक्रार दाखल केली होती. त्यानुसार केज न्यायालयाने सूतगिरणीचे चेअरमन डॉ.विजप्रकाश ठोंबरे, आमदार संगिता ठोंबरे यांच्यावर गुन्हे दाखल करण्याचे आदेश आज केज न्यायालयाने दिले आहेत.

सूतगिरणीचे संचालक गणपती कांबळे यांनी त्या संबंधित तक्रार केज न्यायालयात दाखल करून सूतगिरणीचे चेअरमन विजय प्रकाश ठोंबरे व केज च्या आमदार संगिता ठोंबरे यांच्या विरोधात ४२० , ४६७, ४६८, ४७१ गुन्हे दाखल करण्याचे मा. न्यायालयाने १५६ /३ अन्वये गुन्हा दाखल करून चौकशी करून चार्जशीट दाखल करण्याचे आदेश दिले आहेत.

सदर गैर व्यवहारात आपल्या खोट्या सह्या चेअरमन व केजच्या आमदार यांनी करून शासनाची व जनतेची फसवणूक करून आपणास नाहक गोवण्यात आले आहे. सदर आर्थिक व्यवहारात आपला काही एक संबंध नसून पुराव्या दाखल त्यांनी आपल्या खोट्या सह्या केल्याचा श्रीमती आश्विनी पवार फॉरेन्सिक तज्ञाचा अहवाल व शपथ पत्र जोडून सूतगिरणीचे चेअरमन व आमदार यांच्या वरती १५३/३ नुसार गुन्हा दाखल करून चौकशी करावी व चार्जशीट दाखल करण्याचे आदेश केज प्रथम वर्ग न्यायालयाने दिले..

न्यायालयाच्या आदेशानुसार आ. संगीता ठोंबरे व चेअरमन विजयप्रकाश ठोंबरे यांच्या वर ४२०, ४६७, ४६८, ४७१ कलमा नुसार बनावट दस्तऐवज तयार करून ते माहिती असतानाही खरे दाखवून फसवणूक केली असल्याचा गुन्हे दाखल करून चौकशी करून न्यायालयात चार्जशीट दाखल करण्याचे आदेश देण्यात आल्याची माहिती अँड संतोष मुंडे यांनी दिली आहे.

न्याय व्यवस्थेवर माझा पूर्ण विश्वास : संगीता ठोंबरेमला विरोध करण्यासाठी राजकीय विरोधकांशी हातमिळवणी करून व निवडणूक डोळ्यासमोर ठेवून मला बदनाम करण्याचे हे षड्यंत्र आहे.  यापूर्वीही सूतगिरणी विरोधात अनेक तक्र ारी उच्च न्यायालय व वस्त्रोद्योग आयुक्त, नागपूर यांच्याकडे काही लोकांनी केलेल्या होत्या. त्या तक्र ारी उच्च न्यायालयाने फेटाळल्या होत्या. तसेच दाखल केलेल्या तक्र ारीसंदर्भात  आयुक्त (वस्त्रोद्योग नागपूर) यांनी त्यांच्या अहवालात या सूतगिरणीत कसल्याही प्रकारचे आर्थिक व इतर गैरव्यवहार झाले नसल्याचे नमूद केलेले आहे. माझा न्याय व्यवस्थेवर पूर्ण विश्वास आहे. -- संगीता ठोंबरे, आमदार, केज विधानसभा मतदारसंघ

टॅग्स :Sangeeta Thombareसंगीता ठोंबरेBJPभाजपाBeedबीडCrime Newsगुन्हेगारी