शहरं
Join us  
Trending Stories
1
उमेदवारी अर्ज मागे घेऊन काँग्रेस उमेदवार भाजपत; तिसऱ्या जागी विजय निश्चित
2
एआयद्वारे फेक व्हिडीओ; अघटित घडविण्याचा डाव; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा विराेधकांवर हल्लाबाेल
3
सेक्स स्कँडल : प्रज्वलची पक्षातून हकालपट्टी; माजी पंतप्रधान देवेगौडांचे कुटुंब आरोपांनी घेरले
4
भाजप व रा. स्व. संघाची संविधान बदलण्याची योजना : राहुल गांधी
5
तीन विधानसभा निवडणुकीत मतांची टक्केवारी घसरली, तरीही राज ठाकरे महायुतीला का हवे आहेत?
6
पारा वाढता वाढे, देशभरात उकाडा; वाढत्या तापमानाने नागरिक हैराण, राज्यातही उष्णता वाढणार
7
राहुल शेवाळे यांच्या स्थावर मालमत्तेत सात कोटींची वाढ; २०१९'ला स्थावर मालमत्ता नसल्याचे नमूद होते
8
अरविंद सावंत यांच्याकडे एकच कार; संपत्ती पाच वर्षांत दुप्पट
9
अनिल देसाई यांच्या मालमत्तेत पावणेतीन कोटींची वाढ; स्थावर मालमत्तेत वाढ नाही
10
कांद्याची फसवी फाेडणी; सरकारचे शेतमाल निर्यातीचे धाेरण नेहमीच ग्राहकहिताचे
11
मुख्यमंत्री खूप दिवस गैरहजर राहू शकत नाहीत; विद्यार्थ्यांचे हक्क पायदळी तुडवता येणार नाहीत; दिल्ली हायकोर्ट
12
राजन विचारे यांच्या मालमत्तेत ११ कोटींची वाढ; रत्नागिरी जिल्ह्यात शेतजमीन
13
नागपूर विमानतळ उडविण्याची धमकी; ई-मेलनंतर प्रशासन अलर्ट मोडवर; सुरक्षा व्यवस्थेत वाढ
14
‘ठाण्या’चे नाक दाबून तीन मतदारसंघ भाजपने घेतले सोडवून
15
कोलकाता नाईट रायडर्सचा सहज विजय; दिल्ली कॅपिटल्सचे Play Off चे स्वप्न अधांतरी
16
"सुप्रिया बाहेरची असण्याचं कारण नाही, मी बारामतीत ज्या घरात राहतो ते तिचंच"; शरद पवारांनी स्पष्टच सांगितलं
17
भाजप नेते दुष्यंत गौतम यांच्या कारला अपघात, मणक्याला दुखापत
18
अस्वस्थ झालेल्या सत्ताधाऱ्यांकडून वैयक्तिक आरोप; सामान्य मतदारांना EVM वर शंका- शरद पवार
19
स्वप्न पूर्ण न झालेले आत्मे देशाला अस्थिर करत आहेत; PM मोदींचा नाव न घेता पवारांवर निशाणा
20
पुण्यात महायुतीच्या उमेदवारांसाठी मोदींची सभा; मंचावर दिसले मनसे नेते अमित ठाकरे

अभिनेत्री पायल रोहतगीला कोर्टाने केला जामीन मंजूर  

By ऑनलाइन लोकमत | Published: December 17, 2019 4:29 PM

१० ऑक्टोबर रोजी राजस्थानमधील बुंदी पोलीस ठाण्यात तिच्याविरुद्ध तक्रार दाखल करण्यात आली होती.

ठळक मुद्देअटक केल्यानंतर पायल हिने न्यायालयाकडे जामीन मिळविण्यासाठी अर्ज सादर केला होता.आज न्यायालयाने प्रत्येकी २५ हजार रुपये अशा दोन जातमुचलक्यांवर पायलची सुटका केली आहे. 

राजस्थान - सोशल मीडियावर भारताचे माजी पंतप्रधान जवाहरलाल नेहरूविषयी वादग्रस्त पोस्ट शेअर करणे अभिनेत्री पायल रोहतगी हिला चांगलेच महागात पडले होते. वादग्रस्त पोस्ट केल्याबद्दल पायल हिला बुंदी पोलिसांनी १५ डिसेंबरला अटक करण्यात आली होती. काल न्यायालयाने तिचा जामीन अर्ज फेटाळला असून तिचा कारागृहातील मुक्काम लांबला होता. मात्र, आज न्यायालयाने प्रत्येकी २५ हजार रुपये अशा दोन जातमुचलक्यांवर पायलची सुटका केली आहे. अटक केल्यानंतर पायल हिने न्यायालयाकडे जामीन मिळविण्यासाठी अर्ज सादर केला होता. मात्र, बुंदी न्यायालयाने तिचा अर्ज काल फेटाळला होता असून २४ डिसेंबरपर्यंत तिची रवानगी कारागृहात केली आहे. तिला रविवारी अहमदाबाद येथील तिच्या घरातून ताब्यात घेण्यात आले होते. त्यानंतर तिला अटक करण्यात आली. मोतीलाल नेहरू, जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी आणि गांधी-नेहरू कुटुंबातील सदस्यांसंदर्भात पायलने आपत्तीजनक पोस्ट शेअर केली होती.  त्यानंतर १० ऑक्टोबर रोजी राजस्थानमधील बुंदी पोलीस ठाण्यात तिच्याविरुद्ध तक्रार दाखल करण्यात आली होती. याच महिन्यात तिला एक नोटीस देखील देण्यात आली होती. दरम्यान, बुंदी पोलीसांनी पायलला एसीजेएम न्यायालयात हजर केले होते. उभयपक्षांचा युक्तिवाद ऐकून घेतल्यानंतर एसीजेएम हनुमान जाट यांनी पायलची याचिका फेटाळून लावली. तसेच २४ डिसेंबरपर्यंत तिची कारागृहात रवानगी केली. प्रदेश युवा काँग्रेसचे महासचिव आणि बुंदी येथील रहिवासी चर्मेश शर्मा यांनी पायलविरुद्ध तक्रार दाखल केली होती.

टॅग्स :Payal Rohatgiपायल रोहतगीCourtन्यायालयRajasthanराजस्थानSocial Mediaसोशल मीडिया