शहरं
Join us  
Trending Stories
1
पश्चिम बंगालमध्ये निवडणूक निकालापूर्वीच 'हायव्होल्टेज ड्रामा'! स्ट्राँग रूम बाहेर पोहोचल्या CM ममता, EVM सोबत छेडछाडीचा आरोप
2
शिवाजीराव, तुमचे शिक्षण किती, पूर्वायुष्य काय..? मंत्री मुश्रीफ यांचे प्रत्युत्तर
3
'प्रिन्स'च्या विकेटनंतर 'किंग'चा जल्लोष; पण शेवटी RCB ला पराभवाचा धक्का देत GT नं मारली बाजी!
4
जबलपूर हादरले! वादळामुळे बर्गी धरणात क्रूझ उलटली; ४० पैकी ५ जणांचे मृतदेह सापडले
5
तो, ती आणि खळबळजनक पोस्ट! IPL मधील स्टार क्रिकेटर मैदानाबाहेरील गोष्टीमुळे चर्चेत, काय आहे प्रकरण?
6
धिरेंद्र कृष्ण शास्त्रीचा खरात होऊ शकतो! त्यांनी दिव्यशक्ती सिद्ध करावी, १० व्यक्ती अन् १०...; शाम मानव यांचं आव्हान
7
Exit Poll 2026: टुडेज चाणक्यचा एक्झिटपोल आला...! भाजपचं वादळ, ममतांसोबत 'खेला'; धक्कादायक आहे आकडेवारी
8
GT vs RCB : रजत पाटीदारच्या विकेटवरुन वाद; विराट कोहलीनं पंचांसोबत घातली हुज्जत! नेमकं काय घडलं?
9
म्हाडाने लॉटरीतील १२२१ घरांच्या किंमती ७.५ टक्क्यांनी कमी केल्या
10
जर कच्चे तेल नाही मिळाले तर चीन होर्मुझ ताब्यात घेणार? अमेरिकेच्या हातातून बाजी निसटणार, इराण अन्...
11
आता आरपारची लढाई! मोज्तबा खामेनेईंचा ट्रम्प यांना सज्जड इशारा; म्हणाले "समुद्रात गाडून टाकू..."
12
GT vs RCB : किंग कोहलीनं ५ चेंडूत केली गेलच्या विक्रमाशी बरोबरी; रबाडानं असा घेतला बदला (VIDEO)
13
रील स्टार पाटलाचा कारनामा, १२ वर्षांपूर्वीच्या अपहरण-खून प्रकरणाचा गुन्हे शाखेने केला उलगडा
14
“शिंदेंकडून मलाही ऑफर, पण मी फडणवीसांचा निष्ठावान कार्यकर्ता”; रवी राणांचा मोठा खुलासा
15
बुद्ध पौर्णिमा-पुष्टिपती विनायक जयंती २०२६: ९ राशींची इच्छा पूर्ण अन् धनलाभ; काळजी दूर होईल!
16
"उद्धव ठाकरेंनी स्वतःचा राजकीय बळी न देता.."; विधानपरिषद निवडणुकीवरून भाजपची घणाघाती टीका
17
‘मिसिंग लिंक’ नाव कसे पडले? ‘मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे’ची विशेष मार्गिका, वैशिष्ट्ये आहेत खास!
18
डाव उलटा पडलाय! प्रतिष्ठा जपायची असेल तर हार्दिक पांड्याला संघाबाहेर काढा; दिग्गजाचा MI ला सल्ला
19
पश्चिम बंगालच्या एक्झिट पोलवर CM ममता बॅनर्जी यांची पहिली प्रतिक्रिया; TMC ला किती जागा मिळणार? केली मोठी भविष्यवाणी
20
“पवारांविरुद्ध लढणार नाही”; सुप्रिया सुळेंच्या विधानावर सुनेत्रा पवारांचे एका वाक्यात भाष्य
Daily Top 2Weekly Top 5

Coronavirus : शाहीन बागेतील आंदोलकांना कोरोनाचीही नाही भीती; आंदोलन मागे घेण्यास नकार

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 17, 2020 17:42 IST

Coronavirus : आंदोलक अजूनपर्यंत तरी त्यांच्या विनंतीला जुमानत असल्याची माहिती एएनआयने दिली आहे. 

ठळक मुद्देहे. कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे CAA विरोधातील आंदोलन मागे घेण्यासाठी रेसिडेंट वेल्फेअर असोसिएशन सदस्य आणि पोलीस हे शाहीन बागेतील आंदोलकांशी संवाद साधत आहेत. उल्लंघन करणाऱ्याविरुद्ध महामारी अधिनियमानुसार दोन वर्षे कारावास आणि दंड होऊ शकतो.

नवी दिल्ली - कोरोना व्हायरसच्या वाढत्या प्रभावाच्या पार्श्वभूमीवर दिल्ली सरकारने लग्न समारंभांसह एकावेळी ५० लोक एकत्र जमण्यावर देखील ३१ मार्चपर्यंत बंदी घातली आहे. या कालावधीत जीम, नाईटक्लब, थिएटर, स्पा सेंटर आणि आठवडे बाजार बंद राहणार आहेत. याचे उल्लंघन करणाऱ्याविरुद्ध महामारी अधिनियमानुसार दोन वर्षे कारावास आणि दंड होऊ शकतो. हा नियम शाहीन बागेतील आंदोलकांवर देखील लागू होणार आहे. कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे CAA विरोधातील आंदोलन मागे घेण्यासाठी रेसिडेंट वेल्फेअर असोसिएशन सदस्य आणि पोलीस हे शाहीन बागेतील आंदोलकांशी संवाद साधत आहेत. मात्र, आंदोलक अजूनपर्यंत तरी त्यांच्या विनंतीला जुमानत असल्याची माहिती एएनआयने दिली आहे. 

 

आज सकाळी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या नेतृत्वात झालेल्या उच्च स्तरीय बैठक पार पडली. या बैठकीला संबंधित विभागांचे अधिकारी उपस्थित होते. केजरीवाल म्हणाले की, सामाजिक, धार्मिक, संस्कृतिक आणि राजकीयसह आंदोलनासाठी ५० हून अधिक लोक एकत्र येऊ शकणार नाहीत. याआधी ही संख्या २०० होती. सध्या सरकारच्या अधिनियमातून लग्न समारंभ वगळण्यात आले आहे. मात्र जीम, नाईटक्लब, स्पा, आठवडे बाजार ३१ मार्चपर्यंत बंद राहतील. आवश्यकता भासल्यास यावर पुन्हा निर्णय घेण्यात येईल, असंही केजरीवाल म्हणाले होते.CAA विरुद्ध शाहीन बाग येथील आंदोलनासंदर्भात केजरीवाल यांना प्रश्न विचारण्यात आला होता. त्यावर केजरीवाल म्हणाले की, ५० हून अधिक लोक जमणाऱ्या सर्व कार्यक्रमांवर बंदी आहे. कोणी हे मान्य केल नाही तर संबंधितांवर कारवाई करण्यात येईल. कोरोना व्हायरस रोखण्यास दिल्ली सरकार प्राधान्य देत असल्याचे केजरीवाल यांनी स्पष्ट केले होते.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याdelhiदिल्लीagitationआंदोलनPoliceपोलिस