Coronavirus : MLA arrested for making racist statements pda | Coronavirus : जातीयवादक वक्तव्य केल्याप्रकरणी आमदाराला अटक

Coronavirus : जातीयवादक वक्तव्य केल्याप्रकरणी आमदाराला अटक

ठळक मुद्देसरकार मुस्लिमांविरोधात षडयंत्र रचत आहेत आणि तबलिगी जमातीशी संबंधित लोकांना क्वारंटाईन सेंटर्समध्ये पाठवत आहेत. याबाबत भा.दं.वि. विविध कलमांखाली गुन्हा दाखल करून प्राथमिक चौकशी करून अमिनूल यांना अटक केली.

आसाम येथील ऑल इंडिया डेमॉक्रॅटिक यूनायटेड फ्रंटचे आमदार अमिनूल इस्लाम यांना जातीयवाचक वक्तव्य केल्याप्रकरणी पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत.अमीनुल इस्लाम हे ढिंग या विधानसभा मतदारसंघाचे आमदार आहेत. 

अमिनूल यांच्याविरोधात देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अमिनूल इस्लाम यांची एक क्लिप सोशल मीडियावर व्हायरल झाली होती. राज्यातील क्वारंटाईन सेंटर्सची अवस्था डिटेंशन सेंटरहून वाईट आहे. तसेच हे मुस्लिमांविरोधात रचलेले षडयंत्र आहे असे वक्तव्य वायरल क्लिपमध्ये अमिनूल यांनी केले आहे.सरकार मुस्लिमांविरोधात षडयंत्र रचत आहेत आणि  तबलिगी जमातीशी संबंधित लोकांना क्वारंटाईन सेंटर्समध्ये पाठवत आहेत. सरकार या क्वारंटाईन सेंटरमध्ये कोणालाही मारू शकते आणि मृत्यू करोनामुळे झाला असे सांगू शकते, असे खळबळजनक वक्तव्य या क्लिपमध्ये करण्यात आले आहे.

याबाबत भा.दं.वि. विविध कलमांखाली गुन्हा दाखल करून प्राथमिक चौकशी करून अमिनूल यांना अटक केली. त्यानंतर त्यांना कोर्टात हजर केले असता १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी देण्यात आली आहे.

Web Title: Coronavirus : MLA arrested for making racist statements pda

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.