धर्म परिवर्तन : पत्नी आणि मुलाला बनवायचे होते मुस्लिम, पोलिसांनी केली अटक
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 18, 2022 21:27 IST2022-01-18T21:26:00+5:302022-01-18T21:27:35+5:30
Conversion case : मिळालेल्या माहितीनुसार, कानपूरमध्ये गिरीशचंद श्रीवास्तव यांनी जावई धर्मेंद्र श्रीवास्तव याच्या विरोधात त्यांची मुलगी आणि नातवावर जबरदस्तीने मुस्लिम धर्म स्वीकारण्यासाठी मारहाण केल्याप्रकरणी एफआयआर दाखल केला आहे.

धर्म परिवर्तन : पत्नी आणि मुलाला बनवायचे होते मुस्लिम, पोलिसांनी केली अटक
उत्तर प्रदेशातील कानपूरमध्ये धर्मांतराचा प्रयत्न केल्याची खळबळजनक घटना समोर आली आहे. येथे एका व्यक्तीने पत्नी आणि मुलाला जबरदस्तीने मुस्लिम धर्मात बदलण्याचा प्रयत्न केला. हे प्रकरण पोलिसांपर्यंत पोहोचल्यानंतर त्या व्यक्तीला अटक करण्यात आली. हा तरुण असे का करत होता, या प्रकरणाच्या तळाशी जाण्याचा पोलिसांचा प्रयत्न आहे.
‘त्या’ हत्येचे गुढ उकलले, कर्ज फेडण्यासाठी उचलले चोरीचे पाऊल
खळबळ! प्रेयसीला भेटण्यासाठी प्रियकर दररोज घरी यायचा, रागाने वडिलांनी जिवंत जाळले
मिळालेल्या माहितीनुसार, कानपूरमध्ये गिरीशचंद श्रीवास्तव यांनी जावई धर्मेंद्र श्रीवास्तव याच्या विरोधात त्यांची मुलगी आणि नातवावर जबरदस्तीने मुस्लिम धर्म स्वीकारण्यासाठी मारहाण केल्याप्रकरणी एफआयआर दाखल केला आहे. गिरीशचंद श्रीवास्तव यांनी कल्याणपूर पोलीस ठाण्यात सांगितले की, धर्मेंद्र इतर धर्मांशी संबंधित अनेक पुस्तके घरात ठेवतात.
पुढे त्यांनी सांगितले की, “धर्मेंद्रला माझी मुलगी स्मिता आणि तिच्या मुलाला जबरदस्तीने मुस्लिम बनवायचे आहे. तिने नकार दिल्यावर तो तिला मारहाण करतो." धर्मेंद्र यांच्यावर धर्मांतर करण्यासाठी दबाव आणल्याबद्दल पोलिसांनी एफआयआर नोंदवला. धर्मेंद्रला पकडण्यासाठी पोलीस जेव्हा त्याच्या घरी पोहोचले तेव्हा त्याने विरोध केला. बराच वेळ हाणामारी झाली.
त्यानंतर खूप प्रयत्नानंतर पोलिसांनी त्याला अटक केली. मात्र, पत्नी आणि मुलावर मारहाण केल्याप्रकरणी त्याला अटक करण्यात आली आहे. तर पोलीस ठाण्यात त्याच्यावर प्राणघातक हल्ला तसेच धर्म बदलण्यासाठी दबाव टाकल्याचा गुन्हा दाखल आहे.
या प्रकरणाची चौकशी सुरू आहे
याप्रकरणी एडीसीपी ब्रजेश श्रीवास्तव यांनी सांगितले की, पत्नी आणि मुलावर हल्ला केल्याप्रकरणी धर्मेंद्रला तुरुंगात पाठवण्यात आले आहे. एफआयआरमध्ये धर्म परिवर्तनासाठी दबाव आणल्याचा आरोप करण्यात आला आहे. त्याचीही चौकशी सुरू आहे. आतापर्यंत धर्मांतराचे कोणतेही पुरावे मिळालेले नाहीत. आरोपी धर्मांतराबाबत विचारल्यास नकार देत आहे.