धर्मांतर, अनेकवेळा अत्याचार..; कर्नाटकातील पीडीतिचे आपबीती, चांगूर बाबा प्रकरणाला नवे वळण
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 14, 2025 18:30 IST2025-07-14T18:29:13+5:302025-07-14T18:30:03+5:30
उत्तर प्रदेशानंतर आता कर्नाटकातील पीडितेनेही चांगूर बाबावर जबरदस्तीने धर्मांतर आणि बलात्काराचा आरोप केला आहे.

धर्मांतर, अनेकवेळा अत्याचार..; कर्नाटकातील पीडीतिचे आपबीती, चांगूर बाबा प्रकरणाला नवे वळण
UP News: उत्तर प्रदेशातील चांगूर बाबाचे प्रकरण सध्या देशभरात चर्चेचा विषय बनले आहे. हजारो हिंदू तरुणींचे बळजबरीने धर्मांतर केल्याप्रकरणी योगी सरकारने त्याच्यावर कठोर कारवाई केली आहे. चांगूरची आलिशान हवेली जमीनदोस्त करण्यात आली असून, त्याची इतर सर्व संपत्तीही जप्त केली जात आहे. दरम्यान, चांगूरचे फक्त युपीतच नाही, तर अनेक राज्यात नेटवर्क होते. कर्नाटकातील एका पीडितेने तिच्यावर झालेल्या अत्याचाराची वेदनादायक कहाणी सांगितली आहे.
पीडितेने सांगितले की, चांगूर बाबा आणि त्याच्या गुंडांनी तिला धमकी देऊन इस्लाम धर्म स्वीकारण्यास भाग पाडले. तसेच, तिच्यावर अनेक वेळा जबरदस्तीने बलात्कार करण्यात आला. महिलेने सहारनपूर पोलिस ठाण्यात लेखी तक्रार केली, परंतु कोणतीही कारवाई झाली नाही. आता चांगूर बाबावर सरकारने कारवाई केल्यानंतर महिला समोर आली आहे. महिलेच्या तक्रारीनंतर चांगूर बाबा प्रकरणात एक नवीन वळण मिळाले आहे.
चांगूर बाबाचे सौदी अरेबियात ५०० हून अधिक एजंट आहेत. तो हिंदू मुलींना सौदी अरेबिया, पाकिस्तान आणि मुस्लिम देशांमध्ये पाठवत होता. औरैया येथील धर्मांतर पीडितेने सांगितले की, सपाचा नेताही धर्मांतराच्या व्यवसायात आरोपीसोबत सहभागी आहे. अलिकडेच, चांगूर बाबाने फरिदाबादमध्ये धर्मांतराचे काम सुरू केले होते. त्यानंतर आता, या प्रकरणात कर्नाटकातील पीडिताही पुढे आली आहे.
अनेकवेळा बलात्कार केला
पीडितेने मुख्यमंत्री योगी यांना न्यायाची विनंती केली आहे. ती म्हणाली, योगी बाबा, हिंदू महिला आणि मुलींचे रक्षण करा. पीडितेनं सांगितले की, तिला मारहाण करुन सौदी अरेबियाला नेण्यात आले. चांगूर बाबा आणि त्याच्या जबरदस्तीने तिचे धर्मांतर करायला लावले. त्यानंतर अनेकवेळा बलात्कार केला. फक्त महिलाच नाही, तर हिंदू पुरुषही बाबाचे बळी ठरले आहेत. बाबा हिंदू लोकांना इस्लाम स्वीकारण्यासाठी दबाव आणायचा. जर त्यांनी इस्लाम स्वीकारण्यास नकार दिला, तर तो त्यांच्यावर खोटा खटला दाखल करत असे.
अनेक देशांमधून निधी मिळत होता
एका पीडितेने सांगितले की, बाबाला पाकिस्तान, दुबई, सौदी अरेबिया आणि इतर देशांमधून अब्जावधींचा निधी मिळत होता. चांगूर बाबा पूर्वी अंगठ्या विकायचा. त्यानंतर त्याने धर्मांतराचा व्यवसाय सुरू केला. बाबा हिंदू मुलींचे धर्मांतर करून अयोध्येचा बदला घेत होता. सध्या सरकारने चांगूर बाबाला अटक केली असून, त्याच्या कूकर्माची चौकशी सुरू आहे. या चौकशीत एकएक करत त्याचे काळे धंदे समोर येत आहेत.