सेक्स रॅकेट चालवणाऱ्या काँग्रेस, भाजपाच्या महिला पदाधिकाऱ्यांना अटक 

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 12, 2020 21:51 IST2020-10-12T21:51:02+5:302020-10-12T21:51:53+5:30

Sex Racket : 20 दिवसांपासून ही महिला फरार झाली होती असून तिला राजस्थानमधून या सेक्स रॅकेटप्रकरणात ताब्यात घेतले आहे.

Congress, BJP women office bearers arrested for running sex racket | सेक्स रॅकेट चालवणाऱ्या काँग्रेस, भाजपाच्या महिला पदाधिकाऱ्यांना अटक 

सेक्स रॅकेट चालवणाऱ्या काँग्रेस, भाजपाच्या महिला पदाधिकाऱ्यांना अटक 

ठळक मुद्देभाजपा महिला मोर्चाची सुनीता वर्मा (उर्फ संपत बाई) आणि काँग्रेसप्रणीत सेवा दलाची पूनम चौधरी (उर्फ पूजा) ह्या या सेक्स रॅकेटच्या सूत्रधार असल्याचं उघड झालं आहे.

राजस्थानमधील सवाईमाधोपूरमधून काही दिवसांपूर्वी एक अत्यंत धक्कादायक बातमी समोर आली होती. येथे काँग्रेस आणि भाजपच्या जिल्हा स्तरावरील महिला पदाधिकारी एकत्रित वेश्याव्यवसाय चालवित असल्याची खळबळजनक बाब उघडकीस आली आहे. फरार झालेल्या व सेक्स रॅकेटची म्होरकी असणारी काँग्रेस महिला नेता पूनम उर्फ पूजा चौधरी हिला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. 20 दिवसांपासून ही महिला फरार झाली होती असून तिला राजस्थानमधून या सेक्स रॅकेटप्रकरणात ताब्यात घेतले आहे. पूजाविरोधात अल्पवयीन मुलींचा देहव्यापार केल्याचा आरोप करण्यात आला आहे.


भाजपा महिला मोर्चाची सुनीता वर्मा (उर्फ संपत बाई) आणि काँग्रेसप्रणीत सेवा दलाची पूनम चौधरी (उर्फ पूजा) ह्या या सेक्स रॅकेटच्या सूत्रधार असल्याचं उघड झालं आहे. हा प्रकार समोर आल्यानंतर भाजपने या महिलेला पक्षातून निलंबित केलं होतं. भाजप महिला मोर्चाची माजी जिल्हाध्यक्ष सुनीता वर्मा उर्फ संपत बाई हिला यापूर्वीच अटक करण्यात आली आहे. तर काँग्रेसप्रणीत सेवा दलातील महिला माजी जिल्हाध्यक्ष पूजा उर्फ पूनम चौधरी फरार होती. त्यानंतर पोलीस तिच्या मागावर होते. आज तिला देखील अटक करण्यात आली आहे. या संपूर्ण सेक्स प्रकरणात आतापर्यंत ८ जणांना अटक करण्यात आली आहे. पोलिसांना मिळालेल्या तक्रारीनुसार दोन्ही राजकीय महिला एकत्र येऊन हा गोरखधंदा करत होते. या गैरव्यवहारात अनेक तरुणी आणि महिला अडकल्या आहेत, अशी माहिती न्यूज १८ लोकमतने दिली आहे.

आतापर्यंत ज्यांना अटक करण्यात आली आहे, त्यामध्ये सुनीताचा सोबती हिरालाल, जिल्हा उद्योग केंद्राचा लिपिक संदीप शर्मा, कलेक्टर कार्यालयाचा शिपाई श्योराम मीना आणि इलेक्ट्रिशयन राजूलाल रॅगर यांचा समावेश आहे. त्यांच्यावर वेळीच कारवाई करण्याची मागणी केली जात आहे. एका अल्पवयीन मुलीच्या (१७ वर्षीय) तक्रारीनंतर दोन्ही महिला एकत्रित काम करीत असल्याचे उघडकीस आले आहे. पीडित मुलगी आठवीत शिकत असून तिचं ऑक्टोबर २०१९ ते मे २०२० दरम्यान लैंगिक शोषण करण्यात आलं असल्याचं तिने तक्रारीत म्हटलं आहे. या मुलीच्या तक्रारीमुळे या सेक्स रॅकेटचा पर्दाफाश झाला आहे.

Web Title: Congress, BJP women office bearers arrested for running sex racket

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.