लैंगिक अत्याचारातून अल्पवयीन मुलीची प्रसुती; चौथ्या दिवशीच बाळाचा मृत्यू
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 31, 2022 22:07 IST2022-01-31T22:06:51+5:302022-01-31T22:07:27+5:30
Sexual Abuse : तरुणाविरुध्द बलात्काराचा गुन्हा : अटकेनंतरही केला गुन्हा

लैंगिक अत्याचारातून अल्पवयीन मुलीची प्रसुती; चौथ्या दिवशीच बाळाचा मृत्यू
जळगाव : प्रेमप्रकरणातून लग्नाच्या आमिषाने १७ वर्षीय मुलीवर अत्याचार झाले. त्यातून तिने मुलीला जन्म दिला. चौथ्या दिवशी अर्थात सोमवारी जन्मलेल्या या मुलीचाही मृत्यू झाला. याप्रकरणी मयुर रमेश कोळी (वय २१,रा.रोटवद, ता.जामनेर) या तरुणाविरुध्द सोमवारी जिल्हा पेठ पोलीस ठाण्यात बलात्कार व बाललैगिंक अत्याचाराचा गुन्हा दाखल झाला आहे.
याआधी मयुरविरुद्ध अपहरणाचा गुन्हा दाखल झाला होता, त्यात त्याला अटक झाली होती. आता पुन्हा बलात्काराचा गुन्हा दाखल झाला. मृत पावलेल्या बाळाचे सायंकाळी शवविच्छेदन करण्यात आले. त्यानंतर मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला.
हॅट्स ऑफ मुंबई पोलीस! ३ वर्षांच्या चिमुकला पुन्हा विसावला आईच्या कुशीत