Chaitanyananda Saraswati : डर्टी चॅट्स, मुलींच्या डीपीचे स्क्रीनशॉट... स्वयंघोषित बाबाच्या फोनमध्ये पोलिसांना काय सापडलं?
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 30, 2025 11:24 IST2025-09-30T11:21:14+5:302025-09-30T11:24:12+5:30
Chaitanyananda Saraswati : स्वयंघोषित बाबा चैतन्यनंद सरस्वतीचे काळे कारनामे आता एकामागून एक उघड होत आहेत.

Chaitanyananda Saraswati : डर्टी चॅट्स, मुलींच्या डीपीचे स्क्रीनशॉट... स्वयंघोषित बाबाच्या फोनमध्ये पोलिसांना काय सापडलं?
स्वयंघोषित बाबा चैतन्यनंद सरस्वतीचे काळे कारनामे आता एकामागून एक उघड होत आहेत. दिल्ली पोलीस चैतन्यनंदची कसून चौकशी करत आहेत, ज्यामध्ये अनेक मोठे खुलासे समोर आले आहेत. पोलिसांना त्याच्या मोबाईलमध्ये अनेक मुलींसोबतचं चॅट्स सापडलं. चैतन्यनंदच्या मोबाईलमध्ये अनेक मुलींच्या डीपीचे स्क्रीनशॉट देखील होते. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, चैतन्यनंदला त्याच्या कृत्याचा कोणताही पश्चात्ताप नाही.
१७ विद्यार्थिनींवर लैंगिक अत्याचार केल्याचा आरोप असलेल्या चैतन्यनंद सरस्वतीला सोमवारी चौकशीसाठी त्याच्याच संस्थेत नेण्यात आले. पोलिसांनी त्याच्या दुष्कृत्यांचे पुरावे गोळा केले. चैतन्यनंदला आग्रा येथील एका हॉटेलमधून अटक करण्यात आली. त्यानंतर त्याला पटियाला हाऊस कोर्टात हजर करण्यात आलं, जिथे त्याला पाच दिवसांची पोलिस कोठडी देण्यात आली. चौकशीत अनेक महत्त्वाचे खुलासे समोर आले, परंतु त्याला त्याच्या कृत्याचा कोणताही पश्चात्ताप नाही.
"मी फोनचा पासवर्ड विसरलो, मला भीती वाटतेय"; मुलींना छळणाऱ्या चैतन्यनंदची हात जोडून विनंती
चैतन्यनंद चौकशीदरम्यान वारंवार बोलतोय खोटं
पोलिसांचे म्हणणं आहे की, चैतन्यनंद चौकशीदरम्यान वारंवार खोटं बोलत आहे. बाबाच्या दोन महिला सहकाऱ्यांना ताब्यात घेण्यात आलं. चैतन्यनंद सरस्वती संस्थेमधील मुलींना अश्लील मेसेज पाठवत होता. आता बाबाच्या मोबाईलवरून याची पुष्टी झाली आहे. चैतन्यनंदच्या मोबाईलवर मुलींशी झालेल्या चॅट्स सापडल्या आहेत. या चॅट्समध्ये बाबा विविध प्रलोभनं देऊन मुलींना आकर्षित करण्याचा प्रयत्न करताना दिसत आहे.
चैतन्यनंदचे काळे कारनामे! मुलींची निवड करुन त्यांना कसं बनवायचा गुलाम?, खळबळजनक खुलासा
"बेबी, आय लव्ह यू, तू खूप...", स्वयंघोषित बाबा रात्रभर पाठवायचा अश्लील मेसेज, ३५ मुलींचा छळ
मोबाईलमध्ये अनेक मुलींच्या डीपीचे स्क्रीनशॉट
बाबाने अनेक एअर होस्टेससोबत फोटो काढले आहेत आणि ते त्याच्या फोनमध्ये सेव्ह केले आहेत. त्याच्या मोबाईलमध्ये अनेक मुलींच्या डीपीचे स्क्रीनशॉट आहेत. चैतन्यनंद सरस्वती पोलिसांना तपासात अजिबात सहकार्य करत नाही. कठोर चौकशी केल्यानंतर आणि त्याच्याविरुद्ध पुरावे दाखवल्यानंतरच चैतन्यनंद दिल्ली पोलिसांच्या प्रश्नांची उत्तरे देत आहे.