"बेबी, आय लव्ह यू, तू खूप...", स्वयंघोषित बाबा रात्रभर पाठवायचा अश्लील मेसेज, ३५ मुलींचा छळ
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 25, 2025 11:24 IST2025-09-25T11:24:03+5:302025-09-25T11:24:43+5:30
Chaitanyananda Saraswati : एका आश्रमाचा संचालक असलेला स्वयंघोषित बाबा चैतन्यनंदवर गंभीर आरोप करण्यात आले आहेत.

फोटो - nbt
दिल्लीतील वसंत कुंज येथील एका आश्रमाचा संचालक असलेला स्वयंघोषित बाबा चैतन्यनंदवर गंभीर आरोप करण्यात आले आहेत. दिल्लीतील श्री शारदा इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंटमधील अनेक विद्यार्थिनींनी चैतन्यनंदवर लैंगिक छळ, रात्री त्रास देणं, छेडछाड आणि अश्लील मेसेज पाठवल्याचा आरोप केला आहे. तसेच विद्यार्थिनींच्या मार्कशीटमध्ये छेडछाड करण्याचा आणि त्याच्या मागण्या पूर्ण करण्यासाठी त्यांच्यावर दबाव आणण्याचा आरोप देखील आहे.
एक-दोन नव्हे तर महाविद्यालयातील ३० हून अधिक विद्यार्थिनींनी चैतन्यनंद सरस्वती ही कृत्ये बऱ्याच काळापासून करत असल्याचं म्हटलं आहे. आरोप करणाऱ्यांपैकी एक माजी विद्यार्थिनी आणि इंडियन एअरफोर्सची ग्रुप कॅप्टन आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, विद्यापीठ व्यवस्थापनाला पत्र आणि ईमेल पाठवून चैतन्यनंदविरुद्ध तक्रार करणारी ती पहिली महिला होती. मुली आणि महिला कर्मचाऱ्यांशी गैरवर्तन करत असल्याचं सांगितलं.
व्हॉट्सएप मेसेजद्वारे मुलींना जास्त त्रास
विद्यार्थ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, स्वयंघोषित बाबा चैतन्यनंद हा व्हॉट्सएप मेसेजद्वारे मुलींना जास्त त्रास देत होता. अनेक विद्यार्थ्यांनी सांगितलं आहे की त्यांना रात्रभर चैतन्यनंदांकडून अश्लील मेसेज यायचे. त्यांना "बेबी" म्हणायचा आणि व्हिडिओ बनवून त्यांती चेष्टा करायचा. ३५ मुलींनी आरोप केला की, जूनमध्ये ऋषिकेश टूरला गेल्या होत्या तेव्हा स्वयंघोषित बाबाने रात्री उशिरापर्यंत त्यांना त्रास दिला.
"बेबी, आय लव्ह यू, तू खूप सुंदर आहेस"
स्कॉलरशिपवर शिकणाऱ्या २१ वर्षीय विद्यार्थिनीने सांगितलं की, स्वयंघोषित बाबा पहिल्या भेटीपासूनच तिच्याकडे चुकीच्या हेतूने पाहत होता. क्लास संपल्यानंतर चैतन्यनंद वारंवार तिला "बेबी, आय लव्ह यू, तू खूप सुंदर आहेस" असं म्हणत होता. २००९ पासून त्याच्यावर अनेक वेळा असे गंभीर आरोप झाल्याचं समोर आलं आहे. त्याच्यावर छेडछाड, फसवणूक आणि खोटे ओळखपत्र मिळवण्याचे आरोप आहेत.
नापास करण्याची धमकी देऊन दबाव
मुलींच्या मार्कशीटमध्ये बदल केला आणि त्यांचे नापास करण्याची धमकी देऊन त्यांच्यावर दबाव आणला. यापूर्वी मार्च २०२५ मध्ये त्याने पूजेचं निमित्त करून मुलींना आपल्याकडे बोलावलं होतं आणि परत येत असताना कारमध्ये त्यांचा विनयभंग केला होता. स्वयंघोषित बाबाने छळ केलेल्या बहुतेक मुली गरीब कुटुंबातील होत्या. सध्या या प्रकरणाचा अधिक तपास करण्यात येत आहे.