चैतन्यनंदचे काळे कारनामे! मुलींची निवड करुन त्यांना कसं बनवायचा गुलाम?, खळबळजनक खुलासा
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 27, 2025 08:30 IST2025-09-27T08:30:08+5:302025-09-27T08:30:55+5:30
Chaitanyananda Saraswati : दिल्ली येथील एका संस्थेत स्वयंघोषित बाबा चैतन्यनंदने अनेक विद्यार्थिनींचा छळ केला.

चैतन्यनंदचे काळे कारनामे! मुलींची निवड करुन त्यांना कसं बनवायचा गुलाम?, खळबळजनक खुलासा
दिल्ली येथील एका संस्थेत स्वयंघोषित बाबा चैतन्यनंदने अनेक विद्यार्थिनींचा छळ केला. मुलींचे मोबाईल आणि प्रमाणपत्र स्वतःकडे ठेवून तो त्यांचं आयुष्य कंट्रोल करत होता. मुलींना त्याच्या आदेशाचं पालन करण्यास भाग पाडलं होतं. त्यांना गुलाम बनवून ठेवलं असल्याच खळबळजनक दावा पीडित मुलींपैकी एकीच्या मैत्रिणीने केला आहे.
संस्थेत शिक्षण घेणाऱ्या एका मुलीने सांगितलं की, "तो (चैतन्यनंद) आधी विद्यार्थिनी निवडायचा, त्यांना त्यांचे फोन जमा करण्यास सांगायचा जेणेकरून त्या 'त्यांच्या अभ्यासावर लक्ष केंद्रित करू शकतील.' फोन काही काळासाठी त्याच्याकडेच असायचे आणि त्या बदल्यात तो मुलींना त्याच्या पसंतीचा एक नवीन फोन द्यायचा. यामुळे त्यांच्यामध्ये होणाऱ्या संवादावर नियंत्रण राहायचं आणि ते इतरांपर्यंत पोहचायचं नाही."
"बेबी, आय लव्ह यू, तू खूप...", स्वयंघोषित बाबा रात्रभर पाठवायचा अश्लील मेसेज, ३५ मुलींचा छळ
विद्यार्थिनीचं करिअर धोक्यात
"एकदा प्रवेश मिळाल्यावर नियमांनुसार मुलींना सर्व मूळ कागदपत्र आणि प्रमाणपत्र सादर करावी लागायची, जी अभ्यासक्रम पूर्ण झाल्यानंतरच परत केली जात होती. यामुळे भीतीचे वातावरण निर्माण झाले होते, कारण प्रत्येक विद्यार्थिनीचं करिअर धोक्यात आलं होतं. जर कोणी निषेध करण्याचे किंवा तक्रार करण्याचे धाडस केले तर त्यांना भीती होती की त्यांची कागदपत्र त्यांना कधीही परत मिळणार नाही, ज्यामुळे त्यांचं करिअर उद्ध्वस्त होईल."
नापास करण्याची धमकी
विद्यार्थिनींनी चैतन्यनंद किंवा त्याच्या जवळच्या सहकाऱ्यांचं म्हणणं न मानल्यास त्यांना नापास करण्याची किंवा हद्दपार करण्याची धमकी देण्यात आली होती. "मुलींना अनेकदा इशारा देण्यात आला होता की जर त्यांनी त्याचा विरोध केला तर त्यांचं करिअर उद्ध्वस्त होईल. काहींना तर संस्थेतून काढून टाकण्यात आलं. शेवटी, कोणीतरी बोलण्याचे धाडस केलं" असंही सांगितलं आहे.