‘डिजिटल अरेस्ट’च्या नावे फसवणाऱ्यांना बेड्या
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 1, 2025 14:07 IST2025-01-01T14:06:50+5:302025-01-01T14:07:06+5:30
या चौकडीने २१ डिसेंबर रोजी मालाड पोलिस ठाण्याच्या हद्दीत राहणाऱ्या एका ज्येष्ठ नागरिकाला डिजिटल अरेस्टची भीती दाखवत त्याच्याकडून ८ लाख ६० हजार रुपये उकळले होते.

‘डिजिटल अरेस्ट’च्या नावे फसवणाऱ्यांना बेड्या
मुंबई : डिजिटल अरेस्टच्या नावे ज्येष्ठ नागरिकाला फसवणूक करणाऱ्या चौकडीला मालाड पोलिसांनी सुरतमधून अटक केली आहे. जय असोडिया, संदीप केवाडिया, धरम गोहिल आणि जय मोरडिया अशी या आरोपींची नावे आहेत.
या चौकडीने २१ डिसेंबर रोजी मालाड पोलिस ठाण्याच्या हद्दीत राहणाऱ्या एका ज्येष्ठ नागरिकाला डिजिटल अरेस्टची भीती दाखवत त्याच्याकडून ८ लाख ६० हजार रुपये उकळले होते.
अशी केली अटक
पीडित व्यक्तीने दिलेल्या तक्रारीनंतर पोलिसांनी तातडीने तांत्रिक तपास सुरू केला. त्यानंतर परिमंडळ ११ चे पोलिस उपायुक्त आनंद भोईटे आणि वरिष्ठ पोलिस निरीक्षक विजयकुमार पन्हाळे यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक तसेच सायबर अधिकारी नीलेश बच्छाव व दीपक पोवार, निरीक्षक संजीव बेडवाल (गुन्हे), उपनिरीक्षक कल्याण पाटील, शिपाई शेख, पाईकराव यांनी गुजरातमधील सुरतपर्यंत माग काढला. तेथे सापळा रचून चौघांच्या अटक केली.