मेट्रो स्थानकावर महिलेला अश्लील स्पर्श करणाऱ्यास बेड्या
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 14, 2019 15:10 IST2019-01-14T15:10:00+5:302019-01-14T15:10:41+5:30
याप्रकरणी अंधेरी पोलिसांनी विनयभंगाचा गुन्हा दाखल केल आहे.

मेट्रो स्थानकावर महिलेला अश्लील स्पर्श करणाऱ्यास बेड्या
मुंबई - मेट्रो स्थानकावर महिलेला अश्लीलरित्या स्पर्श करणाऱ्याला अंधेरी पोलिसांनी शनिवारी अटक केली. प्रवीण बांद्रे (40) असं अटक केलेली आरोपीचे नाव आहे. पीडित महिला नातेवाईकांसोबत मेट्रोतून प्रवास करत होती. त्या असल्फा मेट्रो स्थानकावर उतरल्या असताना बांद्रेने असभ्यपणे तिला स्पर्श केला. या घटनेनंतर महिलेने आरडाओरडा केला असता बांद्रेला तेथील सुरक्षा रक्षकांनी पकडून पोलिसांच्या ताब्यात दिले. याप्रकरणी अंधेरी पोलिसांनी विनयभंगाचा गुन्हा दाखल केल आहे.