तबलिगी जमातच्या मौलानाविरोधात सदोष मनुष्यवधाचा गुन्हा; दिल्ली पोलिसांची देधडक कारवाई

By ऑनलाइन लोकमत | Published: April 15, 2020 06:40 PM2020-04-15T18:40:52+5:302020-04-15T18:47:10+5:30

आता सदोष मनुष्यवधाचे अतिरिक्त कलम लावण्यात आले आहे. 

Case of homicide against Maulana of Tablighi jamat; Deadly action by Delhi Police pda | तबलिगी जमातच्या मौलानाविरोधात सदोष मनुष्यवधाचा गुन्हा; दिल्ली पोलिसांची देधडक कारवाई

तबलिगी जमातच्या मौलानाविरोधात सदोष मनुष्यवधाचा गुन्हा; दिल्ली पोलिसांची देधडक कारवाई

googlenewsNext
ठळक मुद्देतबलिगी जमातचे मौलाना मोहम्मद साद यांच्यासह तबलिगिंविरोधात भा. दं. वि. कलम ३०४ अंतर्गत सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल केला आहे. निजामुद्दीनच्या स्टेशन हाऊस ऑफिसरच्या तक्रारीवरून ३१ मार्च रोजी मौलानाविरूद्ध एफआयआर दाखल करण्यात आला होता.या कार्यक्रमात सामील झालेल्यांपैकी काहींचा मृत्यू झाला. 

नवी दिल्ली - तबलिगी जमातीच्या सदस्यांविरोधात दिल्ली पोलिसांनी कारवाईचा फास आवळला आहे. तबलिगी जमातचे मौलाना मोहम्मद साद यांच्यासह तबलिगिंविरोधात भारतीय दंड विधानाच्या कलम ३०४ अंतर्गत सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल केला आहे. याआधी तबलिगिंविरोधात साथीच्या आजारासंबंधीचा कायदा आणि इतर अनेक कलमांतर्गत गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. आता सदोष मनुष्यवधाचे अतिरिक्त कलम लावण्यात आले आहे. कारण या कार्यक्रमात सामील झालेल्यांपैकी काहींचा मृत्यू झाला. 

Coronavirus : अखेर मौलाना साद यांचा ठावठिकाणा लागला 

Coronavirus: तबलिगींमुळे पाकिस्तानातही वाढला कोरोना, संमेलनात २.५ लाख लोकं एकत्र जमले

दिल्ली पोलिसांच्या गुन्हे शाखाने १८९० परदेशी तबलिगी जमातीच्या सदस्यांविरोधात लुकआउट सर्क्युलर देखील जारी केले होते. परदेशातून आलेल्या तबलिगी जमातीच्या सदस्यांनी व्हिसाच्या नियमांचे उल्लंघन केले. निझामुद्दीनमधील मरकजच्या कार्यक्रमात आपला सहभाग नोंदवला होता अशी दिल्ली पोलिसांनी माहिती दिली आहे. याआधी तबलिगी जमातचे मौलाना मोहम्मद साद यांना दिल्ली पोलिसांच्या क्राईम ब्रँचने नोटीस बजावली होती. क्राईम ब्रँचचे पथकाने मरकजसंबंधी 26 प्रश्नांची उत्तरे मागितली होती. 

निजामुद्दीनच्या स्टेशन हाऊस ऑफिसरच्या तक्रारीवरून ३१ मार्च रोजी मौलानाविरूद्ध एफआयआर दाखल करण्यात आला होता. दिल्ली पोलिसांनी बुधवारी सांगितले की, त्यांनी दिल्लीस्थित तबलिगी जमात केंद्राच्या प्रमुख मौलाना मोहम्मद साद खंडालवी यांच्याविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आली आहे. मौलाना साद यांचा क्वारंटाईनचा कालावधी संपला असून त्यांनी तपासात सामील व्हावे. एफआयआरमध्ये समाविष्ट असलेल्या सर्व व्यक्तींना पोलिस पुन्हा नोटीस पाठवतील, असे एका पोलीस अधिकाऱ्यांना सांगितले.
 

Web Title: Case of homicide against Maulana of Tablighi jamat; Deadly action by Delhi Police pda

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.