शिवसेना महिला पदाधिकारीस अश्लील शिवीगाळ करणाऱ्या भाजपा नगरसेविकेवर गुन्हा दाखल

By ऑनलाइन लोकमत | Published: June 21, 2021 08:03 PM2021-06-21T20:03:37+5:302021-06-21T20:40:14+5:30

Crime News Shivsena And BJP : भाजपा नगरसेविका नयना म्हात्रे विरोधात भाईंदर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.

case has been registered against BJP corporator for insulting Shiv Sena women office bearers | शिवसेना महिला पदाधिकारीस अश्लील शिवीगाळ करणाऱ्या भाजपा नगरसेविकेवर गुन्हा दाखल

शिवसेना महिला पदाधिकारीस अश्लील शिवीगाळ करणाऱ्या भाजपा नगरसेविकेवर गुन्हा दाखल

googlenewsNext

मीरा रोड - शिवसेनेच्या महिला उपशहर संघटक तेजस्वी पाटील यांना अश्लील अपशब्द वापरून शिवीगाळ व धमकावले प्रकरणी भाजपा नगरसेविका नयना म्हात्रे विरोधात भाईंदर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. तर भाजपा नगरसेवक विनोद म्हात्रेंविरुद्ध अदखल पात्र गुन्हा दाखल केला आहे. राई गावात राहणाऱ्या तेजस्वी पाटील यांनी १५ जून रोजी प्रभात २३ मध्ये डासांचा प्रादुर्भाव वाढल्याने कीटकनाशक फवारणी करण्यात यावी याकरिता महापालिकेसह आमदार गीता जैन यांना लेखी निवेदन दिले होते.

गुरुवार १७ जून रोजी मुर्धे येथील रेव आगर परिसरात कीटकनाशक फवारणी केली जात असताना स्थानिक नगरसेविका नयना या तेथे आल्या.  त्यांनी मोठमोठ्याने आरडाओरडा करत तेजस्वी यांना अश्लील अपशब्द वापरून शिवीगाळ केली. तसेच दमदाटी व धमकी दिली. गुरुवारी म्हात्रे यांनी सेनेच्या महिला पदाधिकारी तेजस्वी यांना दमदाटी केल्यानंतर शनिवारी राई गावात भाजपा नगरसेवक विनोद म्हात्रे यांनी सुद्धा तेजस्वी यांना दम दिला. दरम्यान नगरसेविका नयना मात्रे यांचा अश्लील शिवीगाळ करणारा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर शिवसेनेतून निषेध होऊ लागला. 

आमदार गीता जैन यांच्यासह शिवसेनेचे नगरसेवक, पदाधिकारी आदींनी भाईंदर पोलीस ठाण्यात पोलीस निरीक्षक मुकुट राव पाटील यांची भेट घेऊन कारवाईची मागणी केली. पोलिसांनी तेजस्वी यांचा जबाब घेत पुरावे म्हणून सादर केलेल्या व्हिडिओ क्लिपची पडताळणी केली. नंतर विविध कलमांखाली रविवारी रात्री पोलिसांनी नयना म्हात्रे विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. तर नगरसेवक विनोद विनोद म्हात्रे यांच्याविरुद्ध अदखलपात्र गुन्ह्याची नोंद पोलिसांनी केली आहे. 

Web Title: case has been registered against BJP corporator for insulting Shiv Sena women office bearers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.